Join us

फक्त पैसे आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून करतात इंस्टाग्रामवर भयंकर पोस्ट, त्या ट्रॅपमध्ये मुलीही अडकतात कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2025 11:53 IST

They make terrible posts on Instagram just to get money and fame, girls also fall into that trap because : सोशल मिडियावर काय पोस्ट करावे काय नाही याची शिकवण पालकांनी द्या. पाहा काय चालू आहे तरुण वर्गात.

सध्या जमाना ऑनलाइनचा आहे. सगळे काही ऑनलाइन होते. भाजी विकत घेण्यापासून बँकेच्या व्यवहारापर्यंत सगळ्या गोष्टी ऑनलाइन करता येतात. सोशल मिडियाचा वापर करुन अनेक लोक आता करोडपती झालेले आहेत. माध्यमाचा योग्य वापर करायला जमल्यावर त्याचा उपयोग करुन प्रसिद्धी मिळवता येते. पैसेही कमवता येतात. आजकाल सोशल मिडियामुळे प्रसिद्ध होण्याच्या अनेक संधी मिळतात. मात्र त्याचा गैरवापर ही वाढला आहे.

अनेक तरुण मुलींनी इंस्टाग्रामवरुन किंवा इतर सोशल मिडिया आकाऊंटवरुन कपडे, पदार्थ, विविध कलात्मक वस्तूंचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या कष्टांना फळही मिळते. मात्र असे कष्ट घेणाऱ्या मुलींपेक्षा नकोते पोस्ट करणाऱ्या मुलींना फॉलो करणारे जास्त आहेत. 

 फक्त पाश्चात्य पोशाख व व्यसने म्हणजे आधुनिक असणे असा गैरसमज  काहींचा दिसतो.  याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंस्टाग्राम. काही तरूण मुलींची मानसिकता बदलत आहे. फॉलोअर्स मिळवण्यासाठी काहीजणी आजकाल सोशल मिडियावर अगदी कमी कपडे घालून फोटो पोस्ट करतात. अश्लील भाषेतही लिहितात. काही फक्त मजेसाठी करतात तर काही पैसे कमवण्यासाठी. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अंगप्रदर्शन केले जाते. प्रत्येकीला तिच्या मनासारखे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य आहे हे जरी बरोबर असले तरी केवळ फॉलोअर्स मिळवण्यासाठी आपण काय करतो आहोत याचे भान सुटता कामा नये.

इंस्टावर सध्या ओन्लीफॅन्स फार चालते. काही कॉमेडीयन असे अकाऊंट वापरतात. मात्र तेथे अनेक महिला शरीर प्रदर्शन करतात.  अगदी १५ व १६ वर्षाच्या मुलींचेही असे अकाऊंट आहे. पालकांनी मुलांना मोबाइल लहान वयात द्यावा का? असा प्रश्न पडतो. तसेच दिल्यावर तो वापरायला शिकवणे किती गरजेचे आहे हे सध्य परिस्थिती पाहून कळते. तुमच्याही मुली अशा ट्रेंड्स ना बळी तर पडत नाहीत ना याची काळजी घ्या. सध्या सर्वत्र सुरू असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना फार भयंकर आहेत. मात्र काही मुली स्वत:हून अशा जाळ्यांमध्ये जाऊन पडतात. शरीर हे पैसे कमवण्याचे किंवा प्रसिद्धी मिळवण्याचे साधन नाही याची शिकवण नव्या पिढीला देणे अत्यंत गरजेचे आहे.

टॅग्स :इन्स्टाग्राममहिलासोशल मीडियासोशल व्हायरल