जून महिना म्हणजे पावसाळ्याची सुरवात. सगळीकडे छान हिरवळ पसरते आणि मस्त पाऊस पडत असतो. जूनमध्ये फक्त पावसाळाच सुरू होत नाही तर शाळाही सुरु होतात. मे महिन्याची सुट्टी संपते आणि पुन्हा शाळेची घंटा वाजायला लागते. (The school is about to start, are you ready with everything? Take this list, in case you forgot anything)विस्कटलेले वेळापत्रक पुन्हा रुळावर येते आणि मुलांचे खेळायचे तास कमी होतात. वेगवेगळ्या ठिकाणी शाळे वेगळ्या वेळी सुरु होतात. मात्र महिना शक्यतो जूनच असतो. मुले पुढच्या इयत्तेत जातात. त्याचा उत्साह असतो. पहिल्यांदाच शाळेत जाणारी मुले रडून आरडाओरडा करतात. तर काहींना शाळेत जायला मस्त वाटतं.
जूनमध्ये पालकांचेही वेळापत्रक पुन्हा आधीसारखे सुरु होते. सुरवातीचे काही दिवस जरा वेळ लागतो. मेमध्ये सगळेच गणित बदलले असते. त्यामुळे मुलांसाठी जून महिना जरा कठीणच जातो. काही गोष्टींची तयारी आता घरोघरी सुरु झालीच असेल. एक रिमाइंडर हवा असेल तर एकदा ही यादी नक्की वाचा.
१. पावसाळी चपला, छत्री किंवा रेनकोट घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. मुलांच्या आवडीची छत्री घेऊन द्या. म्हणजे शाळेत नक्कीच विसरणार नाहीत. चांगले दप्तर घेऊन या. तसेच पुस्तकांची यादी पाहा सगळी पुस्तके घेतली का नाही ते तपासा.
२. तुमचे मुल जर पहिल्यांदा शाळेत जात असेल. तर त्याला काही सवयी लावायला आधीच सुरवात करायला हवी. लवकर उठायची सवय लावा. तुमच्याशिवाय काही तास राहता येईल यासाठी मुलाला तयार करायचे. त्यांच्या आवडत्या पदार्थांची यादी काढा. डब्यासाठी छान पदार्थ द्या.
३. पुस्तकांना कव्हर घाला. खाकी कव्हर करा वर्तमानपत्राचे नको. चांगल्या वह्या घेऊन या. पेन , पेन्सिल, कंपास सगळ्या वस्तू एका ठिकाणी काढून ठेवायच्या. दप्तर छान लावून ठेवायचे. शाळकरी मुलांना फॅन्सी वस्तू वापराव्या वाटतात. मात्र पालक सतत नकार देतात. तसे न करता काही गोष्टी मुलांच्या मनानुसारही विकत घ्या.
४. सुट्टीतला अभ्यास केला आहे का ते तपासून पाहा. नवीन वर्षातील त्यांच्या इच्छा आवडी बदलतील त्यासाठी तुम्हीही तयार राहा. चिडचिड करु नका.