Join us

सकाळी उठल्यावर मुलांना सांगा फक्त ५ गोष्टी ! वाढेल आत्मविश्वास- मुलं कायम राहतील आनंदी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2025 10:05 IST

Tell Your Kids These 5 Things Every Morning To Boost Their Confidence & Focus On Studies : morning affirmations for kids : confidence boosting tips for children : what to tell kids every morning : daily positive words for kids : parents tips to boost child confidence : positive morning routine for kids : पालक म्हणून छोट्यांच्या मनात आत्मविश्वास, सकारात्मकता वाढवण्यासाठी करा फक्त ५ गोष्टी...

आपल्याकडे बहुतेकवेळा असे म्हटले जाते की, जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. म्हणूनच, सकाळी उठल्यावर फक्त चांगल्या गोष्टी बोलल्या आणि ऐकल्या पाहिजेत. त्यामुळे पालक म्हणून तुमची ही जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक आणि प्रेरणादायी (positive morning routine for kids) शब्दांनी करावी. यासाठीच, मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी किंवा त्यांच्या दिवसाची सुरुवात करण्याआधी त्यांना काही प्रेरणादायी आणि प्रेमळ शब्द नक्की ऐकवायला हवेत(Tell Your Kids These 5 Things Every Morning To Boost Their Confidence & Focus On Studies).

पालक म्हणून आपल्या छोट्यांच्या मनात आत्मविश्वास, सकारात्मकता आणि शिकण्याची उमेद निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठीच, अशा काही पाच साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या, तुम्ही दररोज तुमच्या मुलांना नक्कीच सांगितल्या पाहिजेत. यामुळे फक्त त्यांचा दिवसच  चांगला जाणार नाही, तर त्यांचा आत्मविश्वासही वाढेल आणि ते अभ्यासावर (parents tips to boost child confidence) व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकतील. 

सकाळी उठल्याबरोबर मुलांना सांगा या ५ गोष्टी...

१. तू सर्वोत्तम किंवा सगळ्यात बेस्ट आहेस :- पालकांनी दररोज सकाळी मुलांना सांगावे की, 'तू सर्वोत्तम आहेस', मग ती गोष्ट अभ्यासाची असो वा खेळाची. जर कधी मुलाने तुम्हाला सांगितले की तो त्याच्या मित्रांपेक्षा मागे पडला आहे किंवा त्याला चांगले गुण मिळाले नाहीत, तर त्याला प्रेमाने समजावून सांगा की यात काहीच वाईट नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने खऱ्या अर्थाने पूर्ण प्रयत्न केला हेच महत्त्वाचे आहे. 

२. चूक करणे वाईट नाही :- पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना दररोज हा विश्वास द्यायला हवा की, चूक करणे ही काही वाईट गोष्ट नाही. तुम्ही हे एका सोप्या उदाहरणाने समजावून सांगू शकता, जसे की- जर मुलाने अभ्यास करताना एखाद्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले, तर त्याला ओरडण्याऐवजी समजावून सांगा की माणूस चुका करूनच शिकतो आणि तू देखील शिकशील. यामुळे त्याचा अभ्यासावरचा फोकसही वाढतो.

कोणतंही स्ट्रिक्ट डाएट नाही, ना जिम! तरीही भूमी पेडणेकरने केले तब्बल ३५ किलो कमी - पाहा फिटनेसचे सिक्रेट... 

३. आम्हांला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे :- तुम्ही तुमच्या मुलांना दररोज सकाळी हेही सांगा की, 'आम्हांला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.' ही गोष्ट मुलाचा आत्मविश्वास वाढवते आणि कोणताही चुकीचा निर्णय घेण्याआधी त्याला तुमचे हे शब्द नक्की आठवतील. त्यामुळे, पालकांनी या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यावी.

४. तू एक चांगली व्यक्ती आहेस :- लहानपणापासूनच मुलांना योग्य-अयोग्यमधील फरक शिकवणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते मोठे झाल्यावर चांगले आणि जबाबदार बनू शकतील. त्यामुळे, दररोज सकाळी त्यांना नक्की सांगा की तो किंवा ती किती चांगली व्यक्ती आहे. लहान मुलांना ही गोष्ट सोप्या उदाहरणांनी समजावून सांगता येते, जसे की- जर त्याने एखाद्या मित्राला मदत केली किंवा त्याचे खेळणे शेअर केले, तर त्याला सांगा की हीच चांगल्या माणसाची ओळख असते.

फार मेहेनतीने वजन कमी केलं, पण पुन्हा वाढू नये म्हणून ७ ट्रिक्स - वजनाचा आकडा राहील कायम मेंटेन्ड!

५. तुझ्यावर आमचे खूप प्रेम आहे :- सर्वात शेवटी, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे तुमच्या मुलांवर खूप प्रेम आहे  हे सांगा. त्यांना याची जाणीव दररोज करून द्या. कारण तुमच्या या शब्दांमुळे त्यांना फक्त सुरक्षित आणि आपुलकीची भावनाच मिळत नाही, तर त्यांचा संपूर्ण दिवस आनंदमयी होतो.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं