- शालिनी सिन्नरकर
पूर्वी पोस्ट व्हेकेशन डिप्रेशनची चर्चा असे, म्हणजे काय तर सुटीहून परत आल्यावर अनेकांना औदासीन्य येतं. पैसा फार खर्च झाला, वेळ वाया गेला ते कामात मन नाही लागत असं वाटून उदास वाटतं. काही दिवसात रुटीन नीट सुरू होतं. आता टीनएज मुलांच्या संदर्भात व्हेकेशन डिप्रेशन अशी एक समस्या असल्याची चर्चा आहे. (Summer Holiday : Why children stay angry all day ? why they behave like this ? parenting tips )म्हणजे काय तर शाळांना सुटी लागल्यावर काही दिवस चांगले जातात आणि मग घरोघर मुलं चिडचिड करू लागतात. एकेकटे उदास दिसतात. झोपूनच राहतात, रात्री जागतात, टीव्हीच पाहतात, अबोल घुमे होतात. नीट जेवतही नाहीत, बाहेर जात नाहीत, काहीजण तर कितीतरी दिवस आंघोळही करत नाहीत.सुटी आनंदाची होण्याऐवजी घरोघर भांडणंच सुरू होतात.
प्रश्न असा आहे की असं का होतं?
आजची मुलं सोशल मीडियाच्या प्रभावाखाली मोठ्या प्रमाणावर आहे. Instagram आणि Snapchat सारख्या ॲप्सवर दिसणाऱ्या इतरांच्या सुट्ट्यांच्या आकर्षक पोस्ट्स पाहून मुलांच्या मनात आदर्श सुट्टीचे चित्र तयार होतं. पण सगळ्याच पालकांना देश-विदेशात मुलांना सहलीला नेणं शक्य नसतं.(Summer)त्यामुळे आपली सुटी फालतू आहे, काही मजाच नाही असं वाटू लागतं.दुसरं म्हणजे हाताशी एकदम आलेला रिकामा वेळ. किशोरवयात नियमित दिनक्रम महत्त्वाचा असतो. शाळा, मित्रमैत्रिणी, क्लास, खेळ यामुळे दिवसाला एक ठरावीक लय येते. सुटीत ती लय तुटते. काय करावं कळत नाही. म्हणून मग झोपेच्या वेळा बदलतात. मोबाइल आणि स्क्रीन टाइम वाढतो. शारीरिक हालचाल कमी होते. मित्र भेटत नाहीत.म्हणून मग बोअर होतं, चिडचिड होते. एकटेपणा छळू लागतो.
मग उपाय काय?
तर सुटीतही एक दिनक्रम पाळणं. काहीतरी नवीन शिकण्यासाठी दिवसाचा तासभर देणं.जेवण नीट करणं, झोप वेळेवर, फार जागरण टाळणं, मित्रांना भावंडांना घरी बोलावणं, लहानशा जवळच्या ट्रिप प्लान करणं.(Vacation)मुख्य म्हणजे सुटीत असं होणं नॉर्मल आहे हे मुलांना सांगणं आणि त्यांना शोधू देणं त्यांच्या आवडीचं काही काम.पालक मुलांना फार नावं ठेवून वातावरण अजून बिघडवून टाकतात, तसं होऊ नये.
Web Summary : Children become irritable and sad during holidays due to social media influence, lack of routine, and boredom. Maintaining a routine, learning new things, and socializing can help. Parents should avoid excessive criticism and encourage children to explore their interests.
Web Summary : सोशल मीडिया के प्रभाव, दिनचर्या की कमी और बोरियत के कारण छुट्टियों में बच्चे चिड़चिड़े और उदास हो जाते हैं। एक दिनचर्या बनाए रखना, नई चीजें सीखना और सामाजिकता मदद कर सकती है। माता-पिता को अत्यधिक आलोचना से बचना चाहिए और बच्चों को उनकी रुचियों का पता लगाने के लिए प्रोत्साहित करना चाहिए।