Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना लहानपणापासूनच 'या' ३ गोष्टी शिकवा-शिस्तबद्ध, हूशार होतील मुलं, सुधा मूर्तींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 19:35 IST

Sudha Murthy Parenting Tips : सुधा मूर्ती सांगतात की मुलांशी चांगली मैत्री करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मुलाचं आणि तुमचं चांगलं नातं तयार होईल.

मुलांना लहान वयापासून फक्त शालेय शिक्षण नाही तर चांगले संस्कार देणंही खूप महत्वाचं आहे. लहानपणापासूनच साधेपणा, स्वत:ची कामं स्वत:करणं,  इतरांचा आदर करणं, यांसारख्या सवयी लावल्यामुळे मुलांमध्ये उत्तम माणूस घडवण्यासाठी लागणारे गुण आपोआप येतात. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी काही पेरेटींग टिप्स सांगितल्या आहेत. त्यांच्यामते आई-वडील हे मुलांसाठी एक उत्तम उदाहरण असायला हवेत कारण मुलं जे घरात पाहतात त्याच सवयी त्यांना पुढे जाऊन लागतात.  जर तुम्ही  साधे राहाल तर मुलं ही साधं राहणीमान ठेवतील.  लहान वयातच छोटे छोटे निर्णय घेण्यासाठी दिलेलं स्वातंत्र्य मुलांचा आत्मविश्वास वाढवतात. (Sudha Murti Gives Parenting Advice to Parents)

सुधा मूर्ती पालकांना देतात या ३ गोष्टींचा मोलाचा सल्ला (Sudha Murthy Parenting Tips)

१) साधं राहणीमान

लहान मुलांना कमी वयात साधेपणानं राहणं शिकवायला हवं. आजकाल मुलांना जी हवी ती वस्तू सहज मिळते. त्यामुळे मुलांना त्या वस्तूची किंमत नसते.  पालकांनी मुलांना प्रत्येक वस्तू ही मेहनतीनं मिळते हे लहानपणापासूनच समजावून सांगायला हवं. जास्त खर्च करणं टाळायला हवं हे मुलांना शिकवावं आणि स्वत:ही कमी खर्च करावा ज्यामुळे मुलांना शिस्त लागते.

२) मुलांना स्वत:ची कामं स्वत: करायला शिकवा

 सुधा मूर्ती सांगतात की मुलांनी आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे. जर आई वडीलांनी मुलांसमोर स्वत:ची काम स्वत: केली तर मुलं सुद्धा वयात आल्यानंतर त्यांची काम स्वत:करू लागतील.  मुलांना लहानपणापासूनच छोटी छोटी कामं स्वत:ची स्वत: करायला सांगा. सुरूवातीला त्यांच्याकडून चुका होतील पण या चुकांमधून मुलं शिकतील.

३) मुलांशी मित्रासारखे नाते ठेवा

सुधा मूर्ती सांगतात की मुलांशी चांगली मैत्री करणं खूप  गरजेचं आहे.  त्यामुळे मुलाचं आणि तुमचं  चांगलं नातं तयार होईल. म्हणून मुलांशी एका मित्राप्रमाणे कोणत्याही विषयावर चर्चा करा. काही आई वडील मुलांना फक्त आदेश देतात, ओरडतात. ज्यामुळे मुलं खुलेपणानं चर्चा करू शकत नाहीत आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. तसंच मुलं मानसिकरित्या मजबूत होत नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sudha Murthy's tips: Teach kids these 3 things early.

Web Summary : Sudha Murthy advises parents to teach children simplicity, independence, and respect from a young age. Encourage simple living, self-reliance by assigning small tasks, and open communication like a friend to boost confidence and create strong bonds.
टॅग्स :सुधा मूर्तीपालकत्व