Join us  

मोठ्यांसारखा लहान मुलींनाही भरमसाठ मेकअप करता? कॉस्मेटिक्स वापरता?- पालकांची हौस मुलांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2024 3:15 PM

Side Effects Of Applying Makeup To Small Girls: लहान मुलींना मेकअप करणं म्हणजे आपण त्यांच्या सेल्फ इमेजशी खेळतो का याचा पालकांनीही विचार करायला हवा.

ठळक मुद्देआपण सुंदरच आहोत हे न कळता आपण सुंदर नाहीच असं त्या मुलींना वाटू लागलं तर?

लहान मुलींचं बाहूल्यांशी खेळण्याचं वय, पण त्या मुली बाहूल्यांनाही खूप नटवतात. आणि स्वत:ही नटतात. कुठलाही सण समारंभ, लग्न, वाढदिवस असो लहान मुलींना भरपूर मेकअप केलेला दिसतो. अगदी डार्क लिपस्टिक ते डार्क आयमेकअप. मोठ्यांसारखेच कपडे, भरमसाठ कॉस्मेटिक्स लावलेला चेहरा. लहान मुलींना असा मेकअप करावा का? त्याच्या नाजूक, नितळ त्वचेचं त्यानं काय हाेतं? आणि त्याहून मुख्य म्हणजे ‘सुंदर’ दिसण्याच्या इमेजचं, स्वप्रतिमेचं काय होतं? आपण सुंदरच आहोत हे न कळता आपण सुंदर नाहीच असं त्या मुलींना वाटू लागलं तर?

 

अगदी पहिली दुसरीमध्ये शिकणाऱ्या किंवा त्यापेक्षाही लहान वयाच्या मुलींनाही हल्ली त्यांच्या आईचं, मावशीचं, काकूचं पाहून मेकअप करावासा वाटतो. मुलींची ही हौस काही आई अगदी सहज पुरी करतात.

भर उन्हाळ्यातही घर राहील थंडगार! बघा महागडा एसी न घेताही घर कसं ठेवायचं गारेगार

सध्या तर लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे जवळपास सगळ्याच लग्नांमध्ये लिपस्टिक, ब्लश, आयशॅडो असं सगळंच लावून सुंदर नटलेली आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी एखादी तरी चिमुकली दिसतेच. आपल्या मुलीचं ते गोंडस रूप पाहून हुरळून जात असाल तर थोडं थांबा आणि पुन्हा तिला मेकअप करण्याआधी काही गोष्टींचा जरुर विचार करा. 

 

लहान मुलींचा मेकअप केल्याने त्यांच्या त्वचेवर कोणते वाईट परिणाम होऊ शकतात, तसेच मुली मेकअप करून घ्यायचा हट्ट करत असतील तर त्यांना कसं समजवावं, किंवा अशावेळी त्यांच्या आईचं वागणं कसं असावं, याविषयी महत्त्वाची माहिती पॅरेण्टिंग कोच, फॅमिली काऊन्सिलर, पर्सनॅलिटी ॲनालिस्ट रुचिरा दर्डा आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगतात.

गुढीपाडवा विशेष: मराठी नववर्षाची सुरुवात गोड करणारे ६ पारंपरिक पदार्थ; यातला तुमच्या आवडीचा कोणता?

लहान मुलांसाठीच्या कॉस्मेटिक्सची बाजारपेठ वाढते आहे. लहान मुलांच्या नाजूक त्वचेसाठी अतिशय हानिकारक आहेत. याविषयी अमेरिकेत नुकतेच संशोधन झाले असून त्याद्वारे हे कॉस्मेटिक्स मुलांसाठी कॅन्सरचा धोकाही निर्माण करू शकतात.

 

आपणही सुंदर दिसण्यासाठी मेकअप करावा, असं लहान मुलींना वाटण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्या त्यांच्या आईला मेकअप करताना रोज पाहतात. मात्र आईलाही असं वाटायला हवं की आपण सुंदरच आहोत.

कोण म्हणतं श्रीखंड करायला खूप वेळ लागतो? बघा ५ मिनिटांत कसं करायचं पातेलंभर श्रीखंड

आपण ज्या वजनाचे, वयाचे, रंगरुपाचे आहोत तसे आपण सुंदरच आहोत. मेकअप करुन आपण आपला टापटिपपणा वाढवतो, सौंदर्य खुलवतो. मुळात आपण सुंदरच आहोत. मेकअप केल्यामुळे आपण सुंदर दिसतो असं नाही तर आपण सुंदर आहोत. मेकअप आवडतं म्हणून करतो हे मुलामुलींना सांगायला हवं. प्रत्येक आईने एकदा असं करून पाहायला हरकत नाही.

 

टॅग्स :पालकत्वमेकअप टिप्सलहान मुलंत्वचेची काळजी