आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान जगात प्रत्येक पालकाला आपल्या मुलाची बुद्धिमत्ता वाढावी, स्मरणशक्ती चांगली व्हावी आणि मेंदू अधिक तल्लख व्हावा असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. आपलं मूल हुशार असावं आणि त्याने प्रत्येक स्पर्धेत पुढे असावं यासाठी सगळ्या पालकांचा आटापिटा सुरु असतो. परंतु बरेचदा आपण प्रत्येक घरोघरी पाहतो की, 'मुलं सतत मोबाईलमध्ये असतात आणि सांगितलेली गोष्ट त्यांच्या लक्षात राहत नाही.' खरंतर, मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होत आहे(sharp mind activities for kids).
मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी (brain growth activities for children) योग्य आहार, पुरेशी झोप, खेळ, सवयी आणि सकारात्मक वातावरण यांचा समतोल असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. लहान वयातच योग्य सवयी लागल्या तर मुलांची एकाग्रता वाढते, विचारशक्ती विकसित होते आणि आत्मविश्वासही बळकट होतो. मुलांची बुद्धिमत्ता ही केवळ जन्मजात नसते, तर ती योग्य व्यायाम आणि सवयींनी विकसित करता येते. जर तुम्हाला तुमच्या मुलाला मोबाईलच्या जाळ्यातून बाहेर काढून मानसिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल, तर त्यांच्याकडून काही खास ब्रेन गेम्स आणि एक्सरसाइज करून घेणे गरजेचे आहे. बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी (how to develop kids brain fast) केवळ बदाम खाणे पुरेसे नाही, तर मेंदूला योग्य पद्धतीने ट्रेनिंग देणे फायदेशीर ठरते, यासाठी नेमकं काय करायच ते पाहूयात.
मुलाचा मेंदू 'सुपरफास्ट' वेगाने काम करण्यासाठी नेमकं काय करावं ?
१. मैदानी खेळ किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटी :- मुलांचा मेंदू तल्लख करण्यासाठी आणि त्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी फिजिकल अॅक्टिव्हिटी अत्यंत आवश्यक आहे. धावपळीचे खेळ जसे की फुटबॉल, क्रिकेट किंवा सायकलिंगमुळे मेंदूतील ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो. यामुळे मुलं अधिक अॅक्टिव्ह राहतात आणि त्यांना गोष्टी लवकर लक्षात राहण्यास मदत होते.
इन्स्टाग्राम-फेसबूक पेज हॅक, फोटो व्हायरल झाले तर..? ‘एवढंच करा’-डिजिटल मदत करेल तातडीने बंदोबस्त...
२. बौद्धिक खेळ :- घरात असताना मुलांसोबत लुडो, कॅरम किंवा बुद्धिबळ यांसारखे खेळ खेळा. या खेळांमुळे मुलांची विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि त्यांचा मेंदू अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते. या खेळांमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते, मुलांमधील 'प्रॉब्लेम सॉल्व्हिंग' म्हणजेच समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित होते. घरामध्ये खेळले जाणारे काही खेळ मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणतात.
३. कोडी सोडवणे :- जर तुम्हाला तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता वाढवायची असेल, तर त्यांना विविध प्रकारची कोडी सोडवायला द्या. कोडी सोडवताना मुलं आपलं डोकं चालवतात, ज्यामुळे त्यांच्या ब्रेन सेल्समधील कनेक्शन मजबूत होते आणि त्यांची स्मरणशक्ती वाढते.
४. पुरेशी झोप आणि वाचन :- मुलांच्या मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी ८ ते ९ तासांची शांत झोप आवश्यक आहे. तसेच, दररोज किमान १५ ते २० मिनिटे अवांतर वाचनाची सवय लावल्याने त्यांची कल्पनाशक्ती आणि शब्दसंग्रह वाढतो. वाचनाची सवय मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात महत्वाची भूमिका बजावते. मुलांना गोष्टींची पुस्तके मोठ्याने वाचण्याचा सराव करायला सांगा. स्वतःचे शब्द कानावर पडल्यामुळे भाषेवरची पकड सुधारते. यामुळे एकाग्रता म्हणजेच फोकस करण्याची शक्ती वाढते.
Web Summary : Enhance your child's intelligence by incorporating physical activities, brain games, puzzles, and sufficient sleep with reading. These habits improve concentration, problem-solving skills, and memory, leading to a sharper and more capable mind.
Web Summary : शारीरिक गतिविधियाँ, दिमागी खेल, पहेलियाँ और पर्याप्त नींद के साथ पढ़ने को शामिल करके अपने बच्चे की बुद्धि को बढ़ाएँ। ये आदतें एकाग्रता, समस्या-समाधान कौशल और स्मृति में सुधार करती हैं, जिससे तेज और अधिक सक्षम दिमाग बनता है।