Join us

‘फक्त एक गोष्ट कर, सक्सेस मिळणारच!’- बाप म्हणून शाहरुख खानने आर्यन खानला दिला जाहीर सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 17:49 IST

Shah Rukh Khan's Heartfelt Advice to Son Aryan Khan on His Directorial Debut : Shah Rukh Khan advice to Aryan Khan : Shah Rukh Khan heartfelt words for Aryan : Shah Rukh Khan inspiring advice to son : फक्त खान आडनाव पुरेसं नाही! बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी शाहरुख खान लेकाला सांगतो...

'बापाची चप्पल मुलाला झाली' की मुलगा मोठा आणि जबाबदार झाला असं आपल्याकडे म्हटलं जातं. या वाक्याचा अर्थ फक्त शारीरिक वाढ नसून, तो आता वडिलांच्या भूमिकेत येऊन कुटुंबाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहण्यास तयार झाला आहे, असे मानले जाते. असंच काहीसं सध्या बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि त्याच्या मुलाच्या बाबतीत घडत आहे. बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खान फक्त अभिनयासाठीच नाही, तर आपल्या मुलांवर असलेल्या प्रेमासाठी आणि त्यांना दिलेल्या योग्य शिकवणीसाठी देखील ओळखला जातो(Shah Rukh Khan's Heartfelt Advice to Son Aryan Khan on His Directorial Debut).

शाहरुखचा मुलगा आर्यन खान लवकरच एका वेब सिरीजच्या माध्यमातून  दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. अशा परिस्थितीत, वडील म्हणून शाहरुखने त्याला दिलेला सल्ला चर्चेचा विषय ठरत आहे. आर्यनला ( Shah Rukh Khan advice to Aryan Khan) सिनेमाच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी शाहरुखने असे काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत, जे केवळ त्याच्या करिअरसाठीच नाही, तर एक माणूस म्हणूनही त्याला योग्य मार्गदर्शन करतील(Shah Rukh Khan inspiring advice to son).

शाहरुख खान लेकाला सांगतो मेहेनतीचे फळं... 

शाहरुख खानचा लेक आर्यन खान हा नुकतेच एका वेब सिरीजचा दिग्दर्शक म्हणून या बॉलिवूडच्या झगमगत्या, ग्लॅमरस दुनियेत आपले पहिले पाऊल टाकत आहे. एखादं तान्ह बाळ ज्याप्रमाणे पहिले पाऊल टाकून चालायला शिकते तेव्हा ते पडते - धडपडते पण आई - वडिलांच्या मदतीने पुन्हा हिंमत करुन चालायला शिकते. अगदी त्याचप्रमाणे, लेकाने दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना, खास त्याच्या वेब सिरीजच्या लॉंचिंग शो मध्ये किंग खानने त्याला एक महत्वाचा संदेश दिला आहे.सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी आपल्या मुलाने योग्य मार्गावर चालावे, मेहनतीला प्राधान्य द्यावे आणि स्वतःची ओळख निर्माण करावी, यासाठी शाहरुखने त्याला खास सल्ला दिला. स्टार किड असल्यामुळे सहज संधी मिळाली तरी त्या संधीला न्याय देण्यासाठी मेहनत आणि शिस्त हीच खरी किल्ली आहे, असा ठाम संदेश शाहरुखने दिला आहे. त्याच्या या शब्दांमधून वडिलांचे मार्गदर्शन आणि मुलाप्रती असलेले प्रेम दोन्हीही स्पष्टपणे दिसून येते.

बॉलिवूडमध्ये नाव कमवणं जितकं आकर्षक दिसतं तितकंच ते कठीणही असतं. शाहरुख खानने आपल्या मुलाला फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी स्पष्ट सांगितलं की, फक्त खान आडनावामुळे यश मिळत नाही, फक्त बॉक्स ऑफिस गाजवलं म्हणजे सगळं जिंकल असं होत नाही तर खऱ्या अर्थाने मेहनत, प्रामाणिकपणा आणि टॅलेंट यांमुळेच प्रेक्षकांची मने जिंकता येतात.

शाहरुख खान हा फक्त एक अभिनेता नाही तर लाखोंच्या हृदयावर राज्य करणारा सुपरस्टार आहे. पण मुलाच्या करिअरच्या बाबतीत तो एक काळजी करणारा साधासुधा बाप होतो. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने मुलाला दिलेला सल्ला म्हणजे यशस्वी होण्यासाठीचा खराखुरा मंत्रच. मेहनत, संयम हेच सर्वात महत्त्वाचं, हे त्याने विशेष करून सांगितले आहे. 

वडील शाहरुख खान यांनी दिलेल्या खास सल्ल्यावर लेक आर्यन खानने देखील अतिशय सहज - सोप्या शब्दांत व्यक्त होऊन आपले वडिलांप्रतीचे प्रेम मोठ्या  आदराने व्यक्त केले आहे. लेक आर्यन खान म्हणतो, " ही भाषण करण्याची माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आज भाषणात काही चुका होऊ नयेत म्हणून मी गेले कित्येक दिवस या भाषणाचा सराव करत आहे. इतकेच नाही तर या झगमगत्या, ग्लॅमरच्या दुनियेत मी माझे पहिले पाऊल टाकत आहे, त्यामुळे माझ्या कडून काही चुका झाल्या तर मला माफ करा. यासोबतच, वारंवार माझ्या हातून चुका होत राहिल्या तर वडील म्हणून ते कायम माझ्या पाठीशी उभे असतील, असे म्हणत वडिलांप्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे.

टॅग्स :पालकत्वशाहरुख खानआर्यन खानबॉलिवूड