जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियरनं आपल्या ‘रोमियो अँड ज्युलिएट’ या नाटकात म्हटलंय,“नावात काय आहे?” म्हणजेच एखाद्या व्यक्तीची खरी ओळख तिच्या नावात नसून तिच्यातील गुणांत, वागण्या - बोलण्यांत आणि व्यक्तिमत्त्वात असते. तरी आजही आपण नावांना इतकं महत्त्व देतो की, ते आपल्या ओळखीपासून ते आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकतात(Sakshi Malik reveals story behind daughter’s name, inspired by wrestling icon Saori Yoshida).
आई-वडिलांसाठी आपल्या (Sakshi Malik's Baby Name Has A Powerful Backstory) लेकरा - बाळांची नाव ठेवणं ही एक खास आणि आयुष्यभराची गोड आठवण असते. पालक आपल्या मुलांची नावं ठेवताना अनेकदा त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी, आवडणाऱ्या व्यक्ती, प्रसंगावरून किंवा भावना यांच्याशी संबंधित अशी नाव ठेवतात. आपल्या मुलीच्या नावाशी संबंधित असाच काहीसा किस्सा भारताची सुप्रसिद्ध कुस्तीपटू (Sakshi Malik Daughter) साक्षी मलिक हिने सांगितला आहे.
साक्षी मलिकने सांगितली मुलीचं नाव ठेवण्याची गोष्ट...
साक्षी मलिक हिने आपल्या लेकीचं नाव 'योशिदा' (Daughter Yoshida) असं ठेवलं आहे. साक्षीने (Sakshi Malik) लेकीचं नाव ठेवण्यामागे एक कहाणी सांगितली. साक्षी सांगते, खरंतर साओरी योशिदा ही चार वेळा ऑलिम्पिक विजेती आणि एक प्रख्यात जपानी कुस्तीपटू आहे. जेव्हा मी माझ्या कुस्ती खेळाच्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा साओरी योशिदाच कर्तृत्व, चिकाटी आणि अपार मेहनत पाहून मी भारावून गेले होते. तिच्यासारखेच बनण्याची आणि एक दिवस तिला प्रत्यक्ष भेटण्याची माझी तीव्र इच्छा होती. हे केवळ स्वप्न नव्हतं, तर माझ्यासाठी ते एक ध्येय होतं.
टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यास 'कॅमल टो' दिसतो? ऑकवर्ड वाटणार नाही, पाहा ९ सोपे उपाय...
त्यानंतर, कुस्तीच्या मैदानात माझा संघर्ष कायम सुरूच होता. अपयश, दुखापती, मानसिक तणाव यांना तोंड देत मी पुढे चालत राहिले. शेवटी, माझ्या स्वप्नातील तो क्षण एकदाचा आलाच, जेव्हा मी साओरी योशिदाला भेटले. त्या भेटीनंतर मी स्वतःला वचन दिलं जर कधी मला भविष्यात मुलगी झाली, तर तिचं नाव मी ‘योशिदा’ ठेवेन. कारण हे नाव फक्त एका खेळाडूचं नाही, तर चिकाटी, जिद्द आणि प्रेरणेचं प्रतीक आहे.
स्वयंपाक घरातील 'या' पदार्थाने करा मसाज! डार्क सर्कल्स गायब - डोळे दिसतील सुंदर,आकर्षक...
आणखी एक विलक्षण योगायोग म्हणजे, २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मी आणि साओरी योशिदा, आम्ही दोघींनी एकाच स्पर्धेत पदकं जिंकली. हा माझ्या आयुष्यातील कधीही विस्मरणात न जाणारा क्षण आहे. सध्या माझी मुलगी अजून लहान आहे, ती पुढे भविष्यात कुस्ती खेळेल का नाही, हे तिने ठरवायचं आहे. तिच्या आवडीनुसार ती स्वतःचं भविष्य घडवेल. पण माझी एकच इच्छा आहे, ती मोठी होऊन सर्वप्रथम एक चांगली, इतरांच्या भावना जपणारी आणि आदर करणारी आणि सद्गुणी व्यक्ती व्हावी.
'योशिदा' हे नाव साक्षीला नेहमी आठवण करून देतं की, कष्ट, धैर्य आणि स्वप्नांवर विश्वास ठेवल्यास काहीही अशक्य नाही, यासाठीच तिने जपानी कुस्तीपटू 'साओरी योशिदा' (Saori Yoshida) च्या नावावरुन आपल्या लेकीचं देखील नावं 'योशिदा' ठेवलं.