Lokmat Sakhi >Parenting > मुलांनी भरपूर यश मिळवावं असं वाटतं? रोज १ गोष्ट करा; सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा पालकांना सल्ला

मुलांनी भरपूर यश मिळवावं असं वाटतं? रोज १ गोष्ट करा; सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा पालकांना सल्ला

Sadhguru's Parenting Tips : पॅरेंटीग एक्सपर्ट्स सांगतात की मुलांना कोणत्या पद्धतीने सांभाळायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 11:14 AM2024-07-04T11:14:47+5:302024-07-04T13:16:31+5:30

Sadhguru's Parenting Tips : पॅरेंटीग एक्सपर्ट्स सांगतात की मुलांना कोणत्या पद्धतीने सांभाळायला हवं.

Sadhguru's Parenting Tips Just A Few Minutes Daily Can Transform Your Childs Life | मुलांनी भरपूर यश मिळवावं असं वाटतं? रोज १ गोष्ट करा; सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा पालकांना सल्ला

मुलांनी भरपूर यश मिळवावं असं वाटतं? रोज १ गोष्ट करा; सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा पालकांना सल्ला

मुलांच्या पालनपोषणाबाबत सद्गुरूचे म्हणणे असते की पालकांनी आपल्या मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा.  (Parenting Tips) काही पालक मुलांना गॅजेट्स किंवा खेळणी देऊन शांत बसवतात हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुलांच्या पालनपोषणाबाबत पालकांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले मिळत असतात. तर कधी घरातील वयस्कर व्यक्तींकडूनही मुलांना खूप शिकायला मिळते. पॅरेंटीग एक्सपर्ट्स सांगतात की मुलांना कोणत्या पद्धतीने सांभाळायला हवं. (Sadhguru's Parenting Tips Just A Few Minutes Daily Can Transform Your Childs Life)

आजकाल मुलांना सांभाळणं खूप कठीण झालंय. सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार पालकांनी आपल्या मुलांसोबत  वेळ घालवायला हवा. मुलांसोबत वेळ घालवल्याने कोणते फायदे मिळतात समजून घेऊ. मुलं आणि पालंकांमधलं बॉन्डींग स्ट्राँग होण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. 

मुलांसोबत वेळ घालवण्याचे फायदे (Parenting Tips  A Few Minutes Daily Can Transform Your Childs Life)

१) मुलांसोबत नियमित बोलल्याने त्यांचे कम्युनिकेशन्स स्किल्स सुधारतात. विचार आणि भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त करता येतात.

२) मुलं पाहतात आणि आई वडीलांना त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे. जर त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि ते स्वत:ला महत्वपूर्ण समजतात.

३) मुलांसोबत वेळ घालवल्याने भावनात्मक संबंध मजबूत होतात आणि ते स्वत:ला सुरक्षित समजतात आपल्यावर कोणीतरी प्रेम करत असं त्यांना जाणवतं.

कॅल्शियम हवं पण दूध नको? दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ, हाडं होतील बळकट

४) मुलांसोबत असा वेळ घालवा की त्यांना निसर्गाचे महत्व कळेल आणि ते जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहतील. पार्कमध्ये फिरणं, बागकाम करणं, खेळात सहभाग घेणं, शारीरिक स्वरूपात एक्टिव्ह आणि निरोगी राहण्यास मदत होते.

५) जी मुलं पालकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतात ती अभ्यासात हूशार होतात. होमवर्क किंवा इतर एक्टिव्हिटीज एकत्र करतात. मुलांना अभ्यासाचे महत्व समजते आणि मुलांना अभ्यासातही मदत होते.

ढेरी दिसते-कंबर जाड वाटतं? डॉक्टरांनी सांगितल्या ३ टिप्स; ७ दिवसांत वजन होईल कमी

६) मुलांना कधीच घरात  रागाचे किंवा ताण-तणावाचे वातावरण जाणवू देऊ नका. नेहमी मुलांशी प्रेमानेच बोला. हताश, डिप्रेस्ड चेहरे पाहिल्यानं मुलांनाही तीच सवय लागेल. मुलांना नेहमी आनंदी चेहरे दिसायला हवेत.

Web Title: Sadhguru's Parenting Tips Just A Few Minutes Daily Can Transform Your Childs Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.