Join us  

मुलांच्या भविष्याची चिंता वाटते? सद्गुरु सांगतात ३ चुका टाळा; मुलं होतील यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 12:41 PM

Sadhguru Jaggi Vasudev Parenting Tips Mother Father : रोजच्या जगण्यात या चुका टाळल्या तर मुलं आज्ञाधारी बनतील. 

एखाद्या मुलाला जन्म देण्यापेक्षा कठीण असतं त्याला चांगले संस्कर देत मोठे करणं. चांगल्या पद्धतीने पालक पोषण  केल्याने मुलं आत्मनिर्भर आणि जबााबदार होतात. (Parenting Tips) खूप कमी पेरेंट्स असे असतात जे सफल होतात. जास्तीत जास्त  लोक हे कॉन्शियसस नसतात.ज्यांना माहीत नसते की आपल्या मुलांना कोणत्या प्रकारे समजावून सांगावं. कारण प्रत्येक मुलांना ओरड्याची आणि रागवण्याचीच भाषा कळते असं नाही. (Mother Father Should Never Do These Things)

काहीवेळा शांतपणे, समजूतदारपणे समजावल्यानंतरही मुलांना आपलं म्हणणं पटतं. सद्गगुरू आपल्या आई वडीलांना सल्ला देताना सांगतात की मुलं ही तुमची जाहागिर नाही. ( Top 3 Things Parents Should Never Do to Their Children) म्हणून त्यांच्याशी आपल्या मनाप्रमाणे वागू नका. त्यांना जीवन जगण्यासाठी तयार करणं कर्तव्य आहे. अशावेळी आई-वडीलांनी काही चुका करणं टाळायला हवं.  रोजच्या जगण्यात या चुका टाळल्या तर मुलं आज्ञाधारी बनतील. 

१) मुलांना अजिबात वेळ न देणं

प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. ज्यात मुलं खेळू शकतील आणि त्याचे ऐकू शकतील.  मुलांसाठी थोडा वेळ काढल्यास  त्याच्यावर लक्ष ठेवणं सोपं होतं. त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. मुलांचा छंद  जोपासण्यात त्यांची मदत करा. त्यांना समजून घ्या. 

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिवळे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

२) आपल्या मुलांवर अपेक्षाचे ओझे ठेवू नका

जास्तीत जास्त आई वडील आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे ठेवतात. ज्या गोष्टी आपण पूर्ण करू शकलो नाही ते मुलांनी कराव्यात अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. जर तुम्ही आयुष्यात काही खास करू शकला नसाल तरी मुलांकडून अपेक्षा ठेवू नका.  मुलांना  त्यांच्या क्षमतेनुसार स्वप्न पूर्ण करण्यास प्रोत्साहन द्या.

'या' कारणामुळे वडील आणि मुलाचे अजिबात पटत नाही; बाप-लेकाचं नातं घट्ट होण्यासाठी सद्गुरू सांगतात....

३) मुलांना प्रत्येक दिवशी शिस्तीत ठेवू नका

आपल्या  मुलांना अगाऊपणा करू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच मुलांना नेहमीच डिसिप्लिनचे लेक्चर देऊ नका. असं केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. मुलांना शिस्त लावा पण  नेहमीच कडक शिस्तिचे वातावरण ठेवू नका. यामुळे मुलं तुमच्यासमोर व्यवस्थित व्यक्त होणार नाहीत आणि तुमच्याशी बोलताना विचार करतील. मुलांनी शिस्तीचे पालन न केल्यास त्यांना शिक्षा द्या. पाढे पाठ करणं,  घरात आवराआवरण करणं अशा शिक्षा  द्या. ज्यातून मुलं व्यवस्थित शिकतील.

टॅग्स :पालकत्वजग्गी वासुदेव