Join us  

आपण चांगले पालक आहोत हे आईबाबांनी कसे ओळखायचे? सद्गुरू सांगतात एक खास गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 9:11 AM

Parenting Tips By Sadguru Jaggi Vasudev: पालक म्हणून मुलांना चांगल्या पद्धतीने कसं वाढवावं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर एकदा सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी दिलेला सल्ला वाचाच..

ठळक मुद्देपालक म्हणून मुलांना चांगल्या पद्धतीने कसं वाढवावं हा प्रश्न पडला? बघा सद्गुरुंनी सांगितलेला उपाय

मुलांना कसं वाढवायचं? हा हल्ली बऱ्याच पालकांना पडलेला प्रश्न. मुलांना वाढवण्याचं त्यांना भयंकर टेन्शन असतं. मुलांचे क्लास, त्यांच्या शाळा, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे मित्र, मुलांच्या सवयी या सगळ्या गोष्टींकडे ते अतिशय काटेकोरपणे लक्ष देतात. आणि तोलूनमापून मुलांबद्दलच्या सगळ्या गोष्टींचं मुल्यमापन करतात. पण तरीही एवढं करून मुलांना थोडं अपयश आलं किंवा आपली मुलं इतर मुलांच्या स्पर्धेत कुठं कमी आहे असं लक्षात आलं तर पालकांना प्रचंड अस्वस्थ होतं. आणि मग एकच प्रश्न आ वासून त्यांच्यासमोर उभा राहतो आणि तो प्रश्न म्हणजे मुलांना मी उत्तम पद्धतीने कसं वाढवू? तुमच्याही समोर हाच प्रश्न असेल आणि तुमचीही थोडीबहुत अशीच अवस्था झाली असेल तर सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी दिलेला मोलाचा सल्ला तुम्ही एकदा वाचायलाच पाहिजे...(Parenting Tips By Sadguru Jaggi Vasudev)

 

सद्गुरु सांगतात की "What is the best possible way to raise a child?" हा प्रश्न जर तुम्हाला एक पालक म्हणून पडला असेल तर तिथेच तुमचं सगळं चुकतंय. मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवायचं असा काही एक ठराविक साचा नसतो.

उन्हाळा स्पेशल दही- भात रेसिपी, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- बघा चवदार रेसिपी 

असं चांगल्या पद्धतीने वाढविण्याचं काम फक्त पाळीव प्राण्यांच्या बाबतीत होऊ शकतं, मुलांच्या बाबतीत नाही. मुलांना चांगल्या पद्धतीने शिस्तीत वाढवायला जाऊ नका. असं कराल तर त्यांची वाढ कधीच परिपूर्ण नसेल. कारण तुम्ही मुलांना त्याच पद्धतीने वाढवाल ज्या पद्धतीने त्यांनी तयार होणं तुम्हाला अपेक्षित आहे. 

 

फक्त करिअरबाबतच नाही तर एकूणच मुलांनी त्यांच्या आयुष्यात काय करावं, काय करू नये याबाबत पालकांच्या काही ठाम संकल्पना असतात. त्यापद्धतीने ते मुलांना वाढवायला बघतात.

फक्त २० रुपयांत चमकेल चेहरा, बघा कोरियन तरुणींसारखी सुंदर त्वचा मिळविण्याचा खास उपाय

पण यामुळे मुलांच्या आवडीनिवडी, कलागूण मागे पडत जातात. त्यामुळे मुलांना एका विशिष्ट पद्धतीने वाढवायच्या फंदात पडू नका. तर त्यांना त्यांच्या अनुभवातून समजून उमजून घडू द्या. मग बघा ते कसे बहरतात... असा फार महत्त्वाचा सल्ला जग्गी वासुदेव यांनी पालकांना दिला आहे. 

 

टॅग्स :पालकत्वजग्गी वासुदेवलहान मुलं