हल्ली घरोघरी असं चित्र दिसत आहे की आई आणि बाबा दोघेही वर्किंग असतात. त्यामुळे घरकाम आणि ऑफिसचं काम या दोन्हींचा ताण आईवर वाढू नये म्हणून घरात मदतीला मदतनीस महिला असतात. त्यामुळे मग मुलांवर घरात अशी कोणती विशेष जबाबदारी येत नाही. त्याउलट काही घरांमध्ये असेही चित्र असते की आई आणि बाबा दोघेही कामानिमित्त घराबाहेर असल्याने मुलं अधिक सजग असतात आणि जबाबदारीने घरातली छोटी- मोठं काम करून आईला मदत करतात. आता नुकताच एक अभ्यास करण्यात आला असून त्यानुसार असं समोर आलं आहे की जी मुलं दुसऱ्या प्रकारातली आहेत आणि ज्यांना घरकामामध्ये मदत करण्याची सवय आहे, ती मुलं त्यांच्या करिअरमध्ये आणि आयुष्यातही अधिक यशस्वी झालेले आहेत.
हल्ली एकेकटं मूल असल्याने आई- बाप त्याला अगदी लाडाकोडात वाढवतात. आपल्या मुलावर कसलाच ताण येऊ नये असं त्यांना वाटतं आणि म्हणून ते मुलांना अतिजास्त संरक्षणात ठेवतात. पण त्याचा उलटाच परिणाम मुलांच्या व्यक्तीमत्त्वावर होत असतो.
ढोकळा फुगतच नाही, चिकट- चपटा होतो? २ टिप्स- ढोकळा टम्म फुगून कापसासारखा मऊ होईल
याविषयी Harvard Grant यांनी नुकताच एक अभ्यास केला आहे. या अभ्यासात असं सांगितलं आहे की मुलांना अगदी अलगदपणे वाढवू नका. त्यांना लहानपणापासूनच घरातली वेगवेगळी कामं करायला शिकवा. साध्या सोप्या घरकामामध्ये मुलांना तुमच्या मदतीला घ्या. अशी जर सवय त्यांना लहानपणापासूनच लागली तर यामुळे त्यांच्यातल्या कित्येक गुणांचा विकास होतो. ही मुलं जशी जशी मोठी होत जातात तशी तशी ती अधिक सक्षम, जबाबदार आणि भावनिक दृष्ट्या खंबीर होत जातात.
घरातल्या मोठ्या माणसांना घरकामामध्ये मदत करणारी मुलं टीमवर्क शिकतात. सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांना सवय लागते. शिस्त लागते आणि वेळेचे नियोजन कसे करायचे हे देखील ते शिकतात. University of Minnesota यांनीही असाच एक अभ्यास केला होता.
पोहे कोरडे होतात- खाताना घशात अडकतात? पोह्यांमध्ये ओलसरपणा राहण्यासाठी ३ गोष्टी करून पाहा
त्यानुसार असं लक्षात आलं की अशी मुलं अभ्यासातही हुशार निघतात. त्यांचं करिअरही ते उत्तम पद्धतीने घडवतात आणि शिवाय लहानपणापासूनच छोट्या छोट्या गोष्टी शिकत गेल्याने आयुष्य उत्तम पद्धतीने आनंदी जगण्यासाठी त्यांना त्या गोष्टी मदत करतात. काही दिवस मुलांच्या बाबतीत हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. बघूया त्यांच्यात काय फरक पडतोय...