Lokmat Sakhi >Parenting > एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटतं की माझ्या मुलीला मी कधीच..... राणी मुखर्जी सांगतेय मनातलं दु:ख

एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटतं की माझ्या मुलीला मी कधीच..... राणी मुखर्जी सांगतेय मनातलं दु:ख

Rani Mukharjee Feel Sad For Daughter Adira: राणी मुखर्जीला एक गोष्ट दिवसरात्र छळते. ती गोष्ट तिच्या मुलीबाबत म्हणजेच अदिराबाबत असून ती खंत नेमकी कोणती ते बघा....(most painful thing for Rani mukharjee)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2024 02:25 PM2024-03-30T14:25:41+5:302024-03-30T14:26:31+5:30

Rani Mukharjee Feel Sad For Daughter Adira: राणी मुखर्जीला एक गोष्ट दिवसरात्र छळते. ती गोष्ट तिच्या मुलीबाबत म्हणजेच अदिराबाबत असून ती खंत नेमकी कोणती ते बघा....(most painful thing for Rani mukharjee)

Rani Mukharjee feel sad for her daughter Adira, Rani mukharjee open up about her second child and abortion, most painful thing for Rani mukharjee | एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटतं की माझ्या मुलीला मी कधीच..... राणी मुखर्जी सांगतेय मनातलं दु:ख

एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटतं की माझ्या मुलीला मी कधीच..... राणी मुखर्जी सांगतेय मनातलं दु:ख

Highlightsराणी मुखर्जीच्या मुलाखतीचा एक भाग सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत असून यामध्ये राणीने तिच्या मनातली खंत बोलून दाखवली आहे.

आदित्य चोप्राशी लग्न झालं आणि अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या बॉलीवूड करिअरपासून थोडी दूरच गेली. मध्यंतरीच्या काही वर्षांमध्ये राणी तिच्या संसारात, मुलगी अदिरा हिच्या संगोपनात पुर्णपणे गुंतून गेली होती. त्यामुळे ती अगदी क्वचितच बॉलीवूड इव्हेंट्समध्ये दिसायची. आता तिची मुलगी ८ वर्षांची झाली असून मागच्या एक- दोन वर्षांपासून राणी पुन्हा ॲक्टिवली वेगवेगळ्या कार्यक्रमांना, पार्ट्यांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे (Rani Mukharjee Feel Bad For Daughter Adira). राणी मुखर्जीच्या मुलाखतीचा एक भाग सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत असून यामध्ये राणीने तिच्या मनातली खंत बोलून दाखवली आहे. (most painful thing for Rani mukharjee)

 

इतर स्टार किड्सची जशी चर्चा असते, तशी चर्चा राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्या लेकीची म्हणजेच अदिराची कधीच नसते. राणीने जाणूनबुजून तिला या चमचमत्या दुनियेपासून दूर ठेवलं आहे. राणी कधीच मुलीबाबत विशेष बोलतानाही दिसत नाही.

राहा कपूर होणार बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार-किड, आई- वडिलांकडून तिला मिळतोय २५० कोटींचा बंगला

पण यावेळी मात्र राणीने स्वत:च्या मुलीबाबतच्या भावना मोकळेपणाने बोलून दाखवल्या आहेत. shethepeopletv या पेजवरून राणीच्या मुलाखतीचा छोटा भाग व्हायरल करण्यात आला आहे. ती म्हणते की मागील ७ ते ८ वर्षे आम्ही दुसरे अपत्य होण्यासाठी प्रयत्न करत होतो. एकदा त्या प्रयत्नांना यश आले आणि मी प्रेग्नंट झाले. पण दुर्दैवाने काही दिवसांतच माझे ॲबॉर्शन झाले. (Rani mukharjee open up about her second child and abortion)

 

आता माझं वय ४६ आहे. त्यामुळे हे वय दुसऱ्यांना गरोदर राहण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे मी आता दुसऱ्या अपत्याचा नाद सोडून दिला असला तरी मनातून मात्र मी खूप दु:खी आहे कारण मी माझ्या मुलीला तिचं सख्खं भावंडं देऊ शकत नाही, याचं मला खूप वाईट वाटतं.

पोट फुगल्यासारखं वाटतं- गॅसेसचा त्रास होतो? भाग्यश्री सांगते ५ पदार्थ खा- अपचन होणार नाही

पण तरी एकाच गोष्टीचं समाधान आहे की किमान मला एक अपत्य तरी आहे. एखादं तरी मुल व्हावं म्हणून वर्षांनुवर्षांपासून प्रयत्न करणारे लोक जेव्हा मी पाहाते, तेव्हा माझी मुलगी मला माझ्यासाठी एक प्रकारचा चमत्कार वाटते. 

 

Web Title: Rani Mukharjee feel sad for her daughter Adira, Rani mukharjee open up about her second child and abortion, most painful thing for Rani mukharjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.