Join us

मूल झालं -घरी बस, दीपिका पादूकोण-राधिका आपटेलाही असे सल्ले मिळतात, करिअर की मातृत्व निवड एकच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2025 17:04 IST

Radhika Apte says the film industry isn't ‘conducive’ to new mothers : Radhika Apte feels film industry isn’t conducive to needs of new mothers: ‘I don’t know how I’m going to navigate it going forward : राधिका आपटेही म्हणाली सोपं नाही आई झाल्यावर करिअर करणं, दीपिकाला सोडावा लागला सिनेमा, हे चित्र काय सांगतं?

प्रियांका निर्गुण

‘मग मूलच सांभाळ, घरी बस!’ असं अप्रत्यक्षपणे आपल्याकडे दीपिका पादूकोणलाही (Deepika Padukone) सांगितलं जातं. सध्या चर्चा त्याच विषयाची आहे. मुलगी लहान असल्याने सहा तासांपेक्षा जास्त काम करणारी नाही असं ती म्हणाली म्हणून एका बिगबजेट सिनेमातून तिची गच्छंती झाल्याची ही चर्चा. क्षेत्र कुठलंही असो आई झालेल्या कुठल्याही महिलेला बाळ लहान असताना दमछाक होईपर्यंत तारेवरची कसरत करावीच लागते. आणि मी दमले असं तिनं नुसतं म्हंटलं तरी लोक तिला सांगतात, मग काम होत नसेल तर घरी बस! थोडक्यात तिला मदत होईल असं काही करणं-वागणं म्हणजे तिचं कन्सेशन मागणं असं गृहित धरलं जातं(Radhika Apte says the film industry isn't ‘conducive’ to new mothers).

बॉलिवूडमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थितीत असल्याचे समोर येत आहे. फिल्म इंडस्ट्री जितकी झगमगती दिसते, तितकीच ती स्पर्धात्मक आणि आव्हानात्मकही आहे, विशेषतः महिलांसाठी.मोठमोठ्या बॉलिवूड अभिनेत्रींना देखील आई झाल्यावर स्वतःच करिअर टिकवणं अवघड जात आहे. याच मुद्द्यावर नुकतेच राधिका आपटे (Radhika Apte) हिनेही आपलं मत व्यक्त केलं. 

राधिका आपटेने गेल्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुलीला जन्म दिला. मातृत्वाच्या या नव्या टप्प्यात आईपणाची जबाबदारी आणि आपले करिअर या दोघांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न ती ही करते आहे. इंडियन एक्सप्रेस स्क्रिनला दिलेल्या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, भारतीय चित्रपटसृष्टी नव्याने आई झालेल्या महिलांसाठी कितपत अनुकूल आहे? यावर उत्तर देताना राधिका म्हणाली, भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये आई झालेल्या महिलांना फारसा आधार मिळत नाही.  प्रसूतीनंतर लगेचच कामावर परतणं सहज शक्य झालं नाही. शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर ही प्रक्रिया आव्हानात्मक होती.करिअर आणि मातृत्व या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं सध्या तिच्यासाठी एक मोठं कोडं बनलं आहे, आणि ती अजूनही हे सर्व एकाचवेळी योग्य पद्धतीने सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहे. 

नव्याने खांद्यावर पडलेली मातृत्वाची जबाबदारी आणि करिअर यामधला समतोल साधणं सोपं नाही, असं स्पष्टपणे सांगताना राधिका म्हणाली, " आई झाल्यावर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणं खरंच खूप कठीण आहे. कामाचे तास खूप जास्त असतात, शूटिंगची पद्धत खूप वेगवेगळ्या प्रकारची असते, आणि शुटिंग दरम्यान तासंतास आपल्या बाळाला न पाहता राहणं हे सगळं मानसिकदृष्ट्या थकवणारं असत. त्यामुळे आता हे सगळं कसं सांभाळायचं, हे मला हळूहळू शोधावं लागणार आहे." आईपणाच्या नव्या जबाबदाऱ्यांमुळे तिचं करियर आणि आईपणाची नवी भूमिका यांच्यात संतुलन ठेवणं ही तिच्यासाठी कायमची कसरत ठरते आहे.

बाळ सांभाळत करिअर कर, नाहीतर घरी बस असं चित्र वरकरणी ग्लॅमरस असलेल्या क्षेत्रातही दिसतं. बाकी ठिकाणीही ते तसं असतंच..पण ज्यांना करिअर करायचं, नोकरीची गरज आहेच त्या महिला मात्र आपला संघर्ष आपण करत वाट शोधतात.ती वाट सुकर होण्यासाठी मदत झाली तर किती बरं होईल..

टॅग्स :पालकत्वदीपिका पादुकोणराधिका आपटेमहिलाप्रेग्नंसीगर्भवती महिला