नव्यानेच आई झालेल्या कुणाही महिलेला बाळ सांभाळून करिअर म्हणजे कसरतच असते. बाळ, करिअर, घर, ऑफिस अशा एकाचवेळी अनेक भूमिका पार पडत असताना तिची दमछाक होते. पण ती करते सारं सांभाळून आपलं काम. स्वत:च्या हिमतीवर बॉलिवुडमध्ये नाव कमवणारी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हे नाव प्राधान्याने घेतले जाते(Radhika Apte balances breastfeeding and champagne at the BAFTAs).
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती आई झाली. त्यानंतर राधिकाने कित्येकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बाळाला स्तनपान करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. सध्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणांत ट्रोल होत आहे(Radhika Apte BALANCES motherhood & work at BAFTAs with a breast pump and a glass of Champagne).
राधिकाने शेअर केलेल्या फोटोत नेमकं आहे तरी काय ?
लग्नाच्या बारा वर्षांनंतर राधिका आई बनली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. नुकतीच तिने ‘ब्रिटीश अकॅडमी फिल्म अवॉर्ड्स 2025’ला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात राधिकाच्या ‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. या पुरस्कार सोहळ्यातील पडद्यामागचा एक फोटो राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला.
बाळाला स्तनपान करणं गरजेचं असल्याने राधिकाने ब्रेस्ट पंपिंगचा पर्याय निवडला. वॉशरुममध्ये ब्रेस्ट पंपिंग एकीकडे तर दुसरीकडे तिच्या दुसऱ्या हातात शॅम्पेनचा ग्लास आहे. 'नव्याने आई होणे आणि त्याचवेळी करिअर देखील सांभाळणे फारच कठीण आहे' असं ती कॅप्शनमध्ये म्हणते. पण अनेकांना तो फोटो पाहून प्रश्न पडला की आपण नक्की कशाचं उदात्तीकरण करतो आहोत? बाळाला स्तनपान सुुरु असताना शॅम्पेन पिणं चूक आहे, त्यात अल्कोहोल असतंच.
डॉक्टर सांगतात, परीक्षेच्या काळात मुलांना काय खायला द्यावे, काय अजिबात देऊ नये? स्ट्रेस नको तर...
मॉडर्न असणं म्हणजे स्तनपान करताना दारु पिणं का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. यापूर्वीही तिने विविध गॅजेट्सवर काम करताना बाळाला स्तनपान करत असल्याचा फोटो पोस्ट केला होता. आणि त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे, ब्रेस्ट पंपिंग करणं हे काही लपून करण्याचं काम नाही. किंवा वॉशरुममध्ये जाऊन करावं असं तर अजिबात नाही. हायजिनचा विचार करता योग्यही नाही. या सगळ्या कारणांमुळे ती ट्रोल होते आहे. ट्रोलिंग सोडून देऊ, पण काम आणि मूल सांभाळताना आपला प्राधान्यक्रम काय याचा विचारही व्हायलाच हवा. मूल सांभाळून काम अनेकजणी करतात, दमछाक त्यांचीही होते. पण नशा आणि बेजबाबदारपणाचे समर्थन कसे करणार? हा ही प्रश्न आहेच..