प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन फक्त अभिनयासाठीच नाही तर आपल्या पालकत्व कौशल्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. नुकताच एका कार्यक्रमात आर. माधवननं पालकत्वाबाबत त्याचे विचार शेअर केले आहेत. जे पालकांना रोजच्या मुलांच्या संभाषणात, पालन पोषणात बरेच उपयोगी ठरतील. मुलांमध्ये शिस्त रुजवण्याचा आणि मुलांना यशस्वी करण्याचा एक मंत्र आहे तो म्हणजे मुलांना जास्त फावला वेळ देऊ नका. (R Madhvan Shares Ultimate Parenting Advice To Raise Disciplined Successful Kids)
माधवन जेव्हा कॅनडामध्ये गेले होते तेव्हा अशा कुटुंबांसोबत राहिले जे बऱ्याच पालकत्वाच्या समस्यांनी वेढलेले होते जसं की मुलांमध्ये अमली पदार्थांचं व्यसन. ज्यामुळे मुलांचे भविष्य खराब होत होते. या वातावरणातही माधवन यांच्या घरातील मुलं नेहमीच योग्य मार्गावर होती आणि त्यांना वास्तवाचे भान होते. इतर अनेक कुटूंबांमध्ये नेहमी भांडणं होत असताना त्यांनी स्वत:च्या कुटूंबाची व्यवस्थित बांधणी केली. R Madhvan Shares Parenting Tips)
माधवन सांगतात जेव्हा मुलांना अनियोजित आणि बिनदेखरेखीचा वेळ मिळतो तेव्हा ते वाईट सवयी, धोकादायक, आकर्षणांना बळी पडतात. चुकीच्या गोष्टींची प्रलोभनं त्यांना जाळ्यात अडकवतात. जास्त मोकळा वेळ दिल्यानं मुलांच्या आयुष्यातील ध्येय आणि उद्देश कमी होते. यावर त्यांनी काही उपायही सांगतले आहेत.
मुलांना चांगलं वळण लागावं म्हणून आर. माधवन काय उपाय सांगतात?
1) नियोजनबद्ध दिनचर्या
पालकांनी मुलांना एक निश्चित उद्देश,एक वेळापत्रक आणि अर्थपूर्ण कामं नियोजन करून द्यायला हवी. मुलांना कामांमध्ये व्यस्त ठेवल्यास नक्कीच ते नकारात्मक गोष्टींपासून दूर राहतील. अनियोजित आणि जास्त रिकामा वेळ मुलांना चुकीच्या गोष्टी आणि नुकसानकारक सवयी शिकण्यासाठी आमंत्रण देतो. (Ref)
कुकरमध्ये १५ मिनिटांत करा विकतसारखा मऊसूत ढोकळा; जाळीदार ढोकळ्याची सोपी रेसिपी
मुलांना जबाबदारीची कामं द्या
मुलांना छोटी का होईना पण जबाबदारीची आणि अर्थपूर्ण कामं सांगा. ज्यामुळे त्यांना जीवनात एक उद्देश आणि जबाबदारीची भावना मिळते. फावल्या वेळेऐवजी मुलांना नवीन स्किल्स शिकण्यासाठी प्रोत्साहन द्या. जसं की संगीत, स्विमिंग किंवा कोणताही खेळ. त्यांना त्यांच्या आवडीच्या छंदात सक्रियपणे गुंतवून ठेवा.
मुलं रिकाम्या वेळात नेमकं काय करतात ते पाहा
मुलं कोणत्या गोष्टीत वेळ घालवत आहेत. मित्रांसोबत काय करत आहे. यावर सक्रिय देखरेख राहू द्या. मुलांना सतत सकारात्मक कामांमध्ये गुंतवून ठेवा. पालकांनीसुद्धा मुलांना काय आवडतं, काय नाही यावर लक्ष द्यायला हवं.