Join us

आर.माधवन सांगतो, माझा मुलगा रोज रात्री ८ वाजता झोपतो-पहाटे ४ वाजता उठतो! बाप म्हणून मी फक्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2025 17:25 IST

R Madhavan opens up on his son Vedaant: अभिनेता आर. माधवन याने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्याच्या मुलाचे म्हणजेच वेदांतचे भरभरून कौतूक केले आहे...

ठळक मुद्दे आर. माधवन मुलाकडून काहीतरी शिकावं म्हणतोय, स्वत:चा अवगुण कबुल करतोय हे त्याच्यातला पालकाचा मोठेपणाच दाखविणारे आहे... 

'रेहेना है तेरे दिल मे', 'तनू वेड्स मनू' अशा चित्रपटांमधून झळकलेला अभिनेता आर. माधवन त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे.. हल्ली तो चित्रपटांमध्ये कमी दिसत असला तरी त्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. अभिनय क्षेत्रात काम करून त्याने जे नाव कमावले आहे, तसेच नाव आता त्याचा मुलगा वेदांत स्विमिंगच्या क्षेत्रात कमावत आहे. वेदांंत अतिशय उत्तम स्विमर असून त्याने आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कित्येक स्पर्धा गाजवल्या आहेत. आपल्या या लेकाचे आर. माधवनला एक 'बाप' म्हणून अतिशय कौतूक असून त्याच्यातला १ गुण त्याला विशेष आवडतो..(R Madhavan opens up on his son Vedaant's disciplined lifestyle)

 

मुलाचे कौतूक करताना आर. माधवन म्हणतो..

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आर. माधवन म्हणतो की मी जेव्हा माझ्या मुलाचे रुटीन पाहातो, स्विमिंगबद्दल त्याची ओढ पाहातो तेव्हा मला हमखास असं वाटतं की त्याच्यामध्ये जी कमालीची शिस्त आहे, ती थोडीतरी माझ्यामध्ये असायला पाहिजे होती.

फक्त चमचाभर हळद घेऊन 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा- १५ मिनिटांत टॅनिंग निघून जाईल 

वेदांत कमालीचा शिस्तप्रिय असून तो पहाटे ४ वाजता उठतो. त्यानंतर व्यायाम, स्विमिंग असं त्याचं संपूर्ण दिवसभराचं शेड्यूल पुर्णपणे पॅक असतं. रात्री ८ वाजता कोणत्याही परिस्थितीत तो त्याचा दिवस संपवतो आणि झोपायला निघून जातो. एवढंच नाही तर अगदी जेवतानाही तो त्याची शिस्त बाजुला ठेवत नाही. जेवताना तो किती कॅलरी घेत आहे, पानात काय काय आहे असं त्याचं मनातल्या मनात गणित सुरूच असतं.

 

त्यामुळे त्याच्याकडे पाहताना मला असं नेहमी जाणवतं की जेवण हे देखील त्याच्यासाठी एक रिलॅक्सेशन नाहीये. तर ते सुद्धा त्याच्यासाठी एखाद्या व्यायामाप्रमाणेच आहे. लेक एवढा शिस्तप्रिय असताना आपण मात्र कमालीचे आळशी आहोत.

ना जीम ना डाएट, तारक मेहता-फेम जेठालालले दिड महिन्यात घटवलं १६ किलो वजन-ते कसं?

आपल्या आळशीपणाला आपण क्रियेटीव्हीटीचे गोंडस नाव देऊन लपवून टाकलं आहे, असं मात्र माधवन प्रांजळपणे कबूल करतो. बहुतांश पालकांचा हा हेका असतो की आपण त्याचे बाप आहोत, त्याच्यापेक्षा मोठे आहोत, म्हणजे प्रत्येक गोष्टीतच त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. अशावेळी आर. माधवन मुलाकडून काहीतरी शिकावं म्हणतोय, स्वत:चा अवगुण कबुल करतोय हे त्याच्यातला पालकाचा मोठेपणाच दाखविणारे आहे... 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं