Lokmat Sakhi >Parenting > शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना ३ प्रश्न नक्की विचारा- शाळेत ते नेमकं काय करतात परफेक्ट कळेल

शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना ३ प्रश्न नक्की विचारा- शाळेत ते नेमकं काय करतात परफेक्ट कळेल

Parenting Tips: मुलं शाळेत नक्की काय करतात हे जाणून घ्यायचं असेल तर पालकांनी मुलांना हे काही प्रश्न विचारायलाच हवेत..(parents must ask 3 questions to kids)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2025 15:58 IST2025-08-09T15:03:20+5:302025-08-09T15:58:56+5:30

Parenting Tips: मुलं शाळेत नक्की काय करतात हे जाणून घ्यायचं असेल तर पालकांनी मुलांना हे काही प्रश्न विचारायलाच हवेत..(parents must ask 3 questions to kids)

parents must ask 3 questions to kids after coming from school, communication tips for parents  | शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना ३ प्रश्न नक्की विचारा- शाळेत ते नेमकं काय करतात परफेक्ट कळेल

शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना ३ प्रश्न नक्की विचारा- शाळेत ते नेमकं काय करतात परफेक्ट कळेल

Highlightsमानसोपचारतज्ज्ञांच्या मते पालकांनी त्यांचा प्रश्न विचारण्याचा टोन बदलायला हवा.

बऱ्याचदा असं होतं की मुलं रोजच्यारोज शाळेत जातात. अभ्यास करतात, पण तरीही ते शाळेत जाण्यासाठी विशेष खूश नसतात. अशावेळी त्यांचं शाळेत नेमकं काय चालू आहे, त्यांचा शाळेत जाण्यासाठी का मूड नसतो हे पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. तेच नेमकं समजून घेण्यासाठी पालकांनी मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा त्यांना काही प्रश्न आवर्जून विचारणं गरजेचं आहे. जेणेकरून मुलांचं शाळेत नेमकं काय चालू आहे, हे पालकांना लक्षात येईल.

 

शाळेतून घरी आल्यानंतर पालकांनी मुलांना कोणते प्रश्न विचारावे?

बऱ्याचदा असं होतं की शाळेतून मुलं जेव्हा घरी येतात, तेव्हा पालक मुलांना विचारतात की आजचा दिवस कसा गेला, आज शाळेत काय शिकवलं, आज कोणता अभ्यास दिला आहे.. अशा सर्वसाधारण प्रश्नांमधून नेमकं मुलांचा दिवस कसा गेला असावा, याचं आकलन होत नाही. म्हणूनच मानसोपचारतज्ज्ञांच्या मते पालकांनी त्यांचा प्रश्न विचारण्याचा टोन बदलायला हवा.

डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा त्यांना थोडं रिलॅक्स होऊ द्या. त्यानंतर त्यांना विचारा की आज तु शाळेत कोणती गोष्ट सगळ्यात जास्त एन्जॉय केली. यातून मुलांना कोणत्या गोष्टींची आवड आहे आणि त्यांना कोणती गोष्ट सगळ्यात जास्त मजेशीर वाटते आहे हे लक्षात येतं. यातून मुलांचे इंटरेस्ट कळत जातात.  

 

मुलांना आनंद देणाऱ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांना आवर्जून हे विचारा की आज तुला शाळेतली कोणती गोष्ट आवडली नाही, शाळेत गेल्यानंतर तुला नेमक्या कोणत्या गोष्टीचा त्रास झाला. यातून मुलांना शाळेविषयी किंवा एखाद्या विषयातलं काय नेमकं कळत नाहीये, शाळेत कोणते निगेटीव्ह पॉईंट वाटत आहेत, याचा अंदाज येतो. मुलांच्या बोलण्यातून बऱ्याच गोष्टींचं आकलन होत जातं. 

फाउंडेशन लावल्यावर चेहरा भुरकट होऊन पॅचेस दिसतात? बघा फाउंडेशन परफेक्ट पद्धतीने लावण्याची ट्रिक

त्यानंंतर मित्रमैत्रिणींविषयीही त्यांन प्रश्न विचारा. तु कोणत्या मित्रमैत्रिणींसोबत जास्त गप्पा मारल्या, कोणाशी गप्पा मारताना तुला जास्त मजा आली. कोणत्या शिक्षकांचं शिकवणं जास्त आवडलं हे सगळं विचारा. यातुन मुलांचं फ्रेंड सर्कल कसं वाढत चाललं आहे, हे पालकांच्या लक्षात येतं. 


 

Web Title: parents must ask 3 questions to kids after coming from school, communication tips for parents 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.