आजच्या डिजिटल युगात मोबाइल हा मुलांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. अभ्यास, माहिती, करमणूक यासाठी मोबाइल उपयुक्त ठरतो. मुलांना आम्ही मोबाइल देणारच नाही वगैरे ठरवलं तरी काही ना काही कारणास्तव त्यांच्या हातात मोबाइल पडतच असतो. १८ वर्षांखालील मुले मोबाइलवर चुकीच्या, वयाला न साजेशा, मानसिकतेसाठी हानिकारक गोष्टी पाहू लागली, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. (Parents are responsible for children using mobile in wrong way, make these changes in the settings to avoid children from getting wrong information)अनेक पालकांना ही जाणीव असूनही नेमकी काळजी कशी घ्यावी, किती नियंत्रण ठेवावे आणि मुलांशी कसे वागावे हे समजत नाही. त्यामुळे या विषयाकडे समजूतदारपणे आणि जबाबदारीने पाहणे आवश्यक आहे.
मोबाइलवर चुकीच्या गोष्टी पाहिल्याने मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम होतो. वयाच्या या टप्प्यात मेंदू अजून घडत असतो. अशा वेळी हिंसक, अश्लील किंवा विकृत आशय पाहिल्यास मुलांची विचारसरणी गोंधळते. चुकीच्या गोष्टी योग्य वाटू लागतात, चांगले-वाईट यातील फरक धूसर होतो. काही मुलांमध्ये आक्रमक वर्तन वाढते, चिडचिड, राग, हट्टीपणा दिसू लागतो. तर काही मुले सगळे मनात साठवून ठेवतात ज्यामुळे नैराश्य, भीती किंवा एकटेपणा वाढतो.
चुकीच्या वयात अश्लील काही पाहीले तर मुलांची उत्सुकता वाढते त्यातून गुन्हे आणि चुकीच्या वर्तनाला सुरवात होते. सगळा पोरखेळ वाटायला लागतो. त्यामुळे १८ वर्षापर्यंतच्या मुलांना मोबाइल देताना पालकांनी सतर्क राहणे फार गरजेचे असते.
म्हणूनच पालकांची भूमिका येथे खूप महत्त्वाची ठरते. सर्वात आधी पालकांनी मोबाइल पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मुलांशी खुलेपणाने संवाद साधला पाहिजे. मोबाइलवर काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे त्यांच्या वयानुसार शांतपणे समजावून सांगावे. भीती दाखवणे किंवा सतत ओरडणे टाळावे, कारण त्यामुळे मुले अधिक लपवाछपवी करतात.
शक्य असल्यास पालक नियंत्रण (parental control) असलेले सेटिंग्स वापरावेत, जेणेकरून वयाला न साजेसा कंटेंट आपोआप ब्लॉक होईल. मात्र जर ते करता येत नसेल तर अगदी काही सोपे उपायही करता येतात. युवट्यूब आणि गुगल सर्चच्या सेटींग्समध्ये थोडा बदल करुन मोबाइल सर्च सेफ ठेवता येतो.
१. यूवट्यूबच्या सेटींग्समध्ये जायचे. तिकडे जनरल असा ऑपशन असतो. त्यावर जाऊन रिस्ट्रीक्ट मोडचा पर्याय दिसतो. तो ऑन करायचा.
२. गुगलच्या सर्चबारवर जायचे, तिकडे जाऊन सेफ टाईप करायचे. खाली पर्यायात पहिलेच सेफ सर्चचा ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करायचे. त्यात सेफ सर्च ऑफ असेल तर त्यासोबतचा दुसरा ऑपशन म्हणजेच फिल्टर हा ऑपशन निवडायचा. त्याला टिक करायचे.
या दोन्ही मोडवर असताना मोबाइल फक्त चाईल्ड फ्रेंडली कनटेंटच दाखवतो. इतर काहीही दिसत नाही. सर्च केले तरी काही दिसणार नाही. त्यामुळे लहान मुलांच्या हातात मोबाइल देताना पहिले हे पर्याय निवडा आणि मगच द्या.
