Lokmat Sakhi >Parenting > चालताना मुलांचे पाय वाकतात- उभेही तिरके राहतात? डॉक्टर सांगतात उपाय - आईबाबांनी काय काळजी घ्यायची..

चालताना मुलांचे पाय वाकतात- उभेही तिरके राहतात? डॉक्टर सांगतात उपाय - आईबाबांनी काय काळजी घ्यायची..

children legs bending while walking : Parenting Tips : मुलांचे पाय वाकतात, तिरके उभे राहतात अशी समस्या दिसू लागली की, पालक डॉक्टरांचा सल्ला घेतात. अशावेळी काय करायला हवं पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2025 12:41 IST2025-08-17T12:41:27+5:302025-08-17T12:41:59+5:30

children legs bending while walking : Parenting Tips : मुलांचे पाय वाकतात, तिरके उभे राहतात अशी समस्या दिसू लागली की, पालक डॉक्टरांचा सल्ला घेतात. अशावेळी काय करायला हवं पाहूया.

Parenting tips why does my child’s leg bend while walking home remedies for bowed legs in toddlers doctor recommended treatment for bent legs in children | चालताना मुलांचे पाय वाकतात- उभेही तिरके राहतात? डॉक्टर सांगतात उपाय - आईबाबांनी काय काळजी घ्यायची..

चालताना मुलांचे पाय वाकतात- उभेही तिरके राहतात? डॉक्टर सांगतात उपाय - आईबाबांनी काय काळजी घ्यायची..

बाळ जन्माला आलं की घरात आनंदाचं वातावरण असते. बाळ जन्मल्यानंतर त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते त्याच्या कपड्यांपर्यंत सगळ्याच गोष्टी पालक विशेष काळजी घेतात. (child standing with tilted legs) या काळात बाळाचा आजारपण, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि शरीराची होणारी वाढ यासगळ्यांकडे देखील विशेष महत्त्व दिलं जातं. पण बाळाच्या काही गोष्टी उशिराने होऊ लागल्या की, पालकांसाठी चिंतेचा विषय ठरतो. (causes of bowed legs in kids) आपल्या मुलांच्या आरोग्याची आणि शारीरिक गोष्टींची चिंता वाटणं जरा स्वाभाविकच. मुलं ७ ते ८ महिन्यांचं झाले की ते गुडघ्यांवर उभे राहण्याचा प्रयत्न करते. कधी कधी आधार मिळाला तर पूर्णपणे उभे राहते. पण अनेकदा पालक त्यांना बोट धरुन चालायला शिकवतात तेव्हा मात्र त्यांचे पाय वाकडे पडतात. पायावर अधिक जोर पडला तर मूल रडू देखील लागते. (treatment for bent legs in children)

मुलं फार चिडचिड करतात, नाकावर राग? आईबाबांच्या ५ चुकाही ठरतात त्रासदायक, पाहा काय करायचे..

लहान मुलांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात. (Parenting tips) काही मुले उशिरा चालू लागतात तर काही उशिरा बोलू लागतात. काहींचे वजन वाढत नाही. अशा विविध समस्यांना मुलांसह पालकांना सामोरे जावे लागते. मुलांचे पाय वाकतात, तिरके उभे राहतात अशी समस्या दिसू लागली की, पालक डॉक्टरांचा सल्ला घेतात. अशावेळी काय करायला हवं पाहूया.

बालरोगतज्ज्ञ डॉ. निमिषा अरोरा सांगतात की १० महिन्यांच्या बाळाचे पाय देखील वाकतात किंवा तिरके उभे राहतात. अशावेळी पालकांनी काळजी करण्याची गरज नाही. बाळाच्या जन्माच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात पाय बाहेरुन किंचित वाकणे ही समस्या सामान्य असते. याला फिजियोलॉजिकल जेनुव्हेरम किंवा पायांचे सामान्य वाकणे असं म्हटलं जातं.

आईच्या पोटात असताना बाळ एका वाकलेल्या स्थितीमध्ये असते. त्यामुळे बाळाचे पाय थोडे बाहेरच्या दिशेने वाकतात. यामुळे सुरुवातीलाच नवजात किंवा लहान मुलांचे पाय थोडे वाकडे दिसू लागतात. डॉक्टर म्हणतात की, अशावेळी पालकांना बाळाच्या पायांची मालिश करायला हवी. यावर कोणत्याही प्रकारचा उपचार करु नका. मूल मोठे होऊ लागले की, ते स्वत:हून गुडघ्यावर रेंगाळू लागते. आणि नंतर चालू लागते. बाळाची वाढ होऊ लागली म्हणजेच साधारणत: दोन वर्षानंतर देखील बाळाचे पाय वाकलेले किंवा उभेही तिरके राहत असतील तर रिकेट्सची समस्या असू शकते. जर बाळाला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळाले नसेल तर ही समस्या जाणवते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.


Web Title: Parenting tips why does my child’s leg bend while walking home remedies for bowed legs in toddlers doctor recommended treatment for bent legs in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.