Join us

धाक आणि रट्टे की प्रेम आणि शाबासकी? कोणत्या प्रकारचे आईबाबा मुलांसाठी ‘चांगले’ पालक ठरतात, अभ्यास सांगतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2025 14:48 IST

Parenting Tips: तुम्ही कसे पालक आहात- खूप शिस्तीचे की एकदम फ्रेंडली? बघ याविषयी नुकतेच झालेले सर्व्हेक्षण काय सांगते...

ठळक मुद्देब्रिटनच्या SEED या संस्थेच्या वतीने लंडनमध्ये राहणाऱ्या ६००० मुलांचा २०१३ पासून अभ्यास करण्यात आला.

काही पालक खूप कडक शिस्तीचे असतात. अशा पालकांची मुलांना सतत भीती वाटते. आपल्याकडे मागच्या पिढीत काही अपवाद सोडले तर बहुतांश पालक याच प्रकारातले होते. पण आता त्या शैलीमध्ये थोडा बदल झाला आहे. पालक मुलांच्या बाबतीत बरेच मृदू, हळूवार झाले आहेत. ते काही दृष्टीने निश्चितच चांगलंही आहे. पण यामुळे मुलं शेफारतात, लाडावतात, हट्टी होतात असं बोललं जातं. तर कडक शिस्तीच्या पालकांच्या सहवासातील मुलं बुजरी होतात, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांच्या नात्यात खूप जवळीकता नसते असंही म्हटलं जातं. एकंदरीतच काय तर या दोन्ही प्रकारच्या पॅरेण्टींग स्टाईलचे काही सकारात्मक मुद्दे आहेत तर काही नकारात्मक मुद्दे आहेत. मग पालकत्त्वाची नेमकी कोणती पद्धत बरोबर आहे, याविषयी माहिती सांगणारा एक अहवाल ब्रिटनच्या SEED या संस्थेने नुकताच जाहीर केला आहे.(Parenting Tips)

 

या संस्थेच्या वतीने लंडनमध्ये राहणाऱ्या ६००० मुलांचा २०१३ पासून अभ्यास करण्यात आला. मुलं ज्या वातावरणात राहात आहेत, शिक्षण घेत आहेत, त्याचा त्यांच्या अभ्यासावर, व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम होतो,

चिमूटभर हळद घेऊन 'या' पद्धतीने ब्रश करा- दातांना किड लागणार नाही, मजबूत, पांढरेशुभ्र होतील

याविषयीचा अभ्यास बारकाईने करण्यात आला. त्यामध्ये असं दिसून आलं की जे पालक कडक शिस्तीचे असतात, त्यांची मुलं अभ्यासात प्रगती करतात. ही मुलं विज्ञानासारख्या विषयात जास्त प्रगती करताना दिसून येतात. 

 

जे पालक मृदू स्वभावाचे असतात, त्यांची मुलं भावनिकदृष्ट्या जास्त परिपक्व हाेतात. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या पॅरेण्टिग स्टाईलचा सुवर्णमध्ये साधता आला तर ते मुलांच्या भविष्यासाठी जास्त चांगले ठरते असं अभ्यास सांगतो..

दिवसभर अख्ख्या घराची स्वच्छता करता; पण नेमकी 'ही' चूक केल्याने वाढतो सर्व्हायकल कॅन्सरचा धोका

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं टाळलंच पाहिजे, हे आपल्याकडे अगदी लहानपणापासून शिकवलं जातं. पालकत्वाच्या बाबतीतही तेच आहे. योग्य वेळी शिस्त आणि योग्यवेळी पालकांनी दाखवलेला समजूतदारपणा, हळूवारपणा मुलांना पालकांप्रती जास्त आश्वस्त करतो. त्यामुळे पालकांना या दोन्ही गोष्टींचा मध्य गाठता यायला हवा. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं