मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्या, वाईट गोष्टींपासून, वाईट सवयींपासून त्यांना कसं दूर ठेवावं, याचा विचार नेहमीच प्रत्येक पालकांच्या मनात असतो. पुर्वी एकत्र कुटूंब पद्धतीमुळे मुलांवर आपोआप चांगले संस्कार व्हायचे. त्यासाठी पालकांना खूप विशेष प्रयत्न करण्याची गरज नसायची. पण आता मात्र न्युक्लिअर कुटूंब पद्धतीमुळे पालकांना मुलांकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. त्यात मोबाईल, इंटरनेट यामुळे तर पालकांची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. टीव्ही, मोबाईलपासून दूर करून मुलांना अभ्यासाला बसवणं हे देखील अनेक पालकांसाठी मोठं कठीण काम झालं आहे. म्हणूनच मुलांचा स्क्रिन टाईम आपोआप कमी करून त्यांच्या अभ्यासाचा वेळ वाढवायचा असेल तर त्याचा एक खास उपाय पाहा.. (parenting tips about theory of 10 percent)
मुलांच्या वाईट सवयी घालवून चांगले गूण वाढविणारी १० टक्क्यांची थेअरी
Theory of 10 % म्हणून ही थेअर ओळखली जाते. फक्त मुलांसाठीच नाही तर पालकांसाठीही ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. या थेअरीनुसार जर तुम्ही वागलात तर तुमच्यातल्या वाईट गोष्टी कधी कमी होऊन तुम्ही चांगल्या गोष्टींकडे गेलेले असाल हे तुमच्या लक्षातही येणार नाही.
मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की थेअरी ऑफ १० परर्सेंट म्हणजे तुमच्यातल्या वाईट गोष्टी १० - १० टक्क्यांनी नियमितपणे कमी करायच्या आणि चांगल्या सवयी १०- १० टक्क्यांनी वाढवायच्या. म्हणजेच जर मुलगा दिवसातून २ तास मोबाईल पाहात असेल तर सुरुवातीला १ आठवडा त्याची ही सवय फक्त १० टक्क्यांनी कमी करायची. आणि तो जर एकच तास अभ्यास करत असेल तर त्याचा अभ्यासाचा वेळ फक्त १० टक्क्यांनी वाढवायचा. असं दर आठवड्याला हळूहळू करत जायचं.
या थेअरीचे जर काही आठवडे तंताेतंत पालन केले तर ५ ते ६ महिन्यात खूप अमुलाग्र बदल जाणवतो. कारण आपल्या रोजच्या सवयींमध्ये आपल्याला फक्त १० टक्के बदल करायचा असतो.
बीपी नेहमीच वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ उपाय, ब्लड प्रेशर राहील कंट्रोलमध्ये
१० टक्के हा खूप कमी बदल असून आपलं शरीर आणि मन त्याला खूप विरोध करत नाही. हळूहळू हे बदल अंगवळणी पडत जातात आणि आपण पुर्णपणे बदलून जातात. मुलांच्या बाबतीत हा प्रयोग करून पाहा. पण या प्रयोगादरम्यान त्यांच्यावर चिडू, ओरडू नका. संयम ठेवा, असा सल्लाही मानसोपचार तज्ज्ञ देतात.
Web Summary : The '10 Percent Theory' advises gradually reducing negative habits and increasing positive ones by just 10% weekly. This method, applicable to both kids and adults, promotes sustainable change without overwhelming resistance. Consistent application over months yields significant improvements through small, manageable adjustments.
Web Summary : '10 प्रतिशत सिद्धांत' नकारात्मक आदतों को धीरे-धीरे कम करने और सकारात्मक आदतों को प्रति सप्ताह सिर्फ 10% बढ़ाने की सलाह देता है। यह विधि, बच्चों और वयस्कों दोनों के लिए उपयुक्त है, बिना भारी प्रतिरोध के स्थायी परिवर्तन को बढ़ावा देती है। महीनों तक लगातार प्रयोग करने से छोटे, प्रबंधनीय समायोजनों के माध्यम से महत्वपूर्ण सुधार होते हैं।