पालक आणि मुलं यांचं नात सगळीकडे सारखंच. मग ते एखाद्या लहानशा गावातले पालक असो किंवा मग शाहिद कपूर आणि मीरा कपूरसारखे सेलिब्रिटी दाम्पत्य असो.. मुलांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, करिअर या सगळ्याच गोष्टींबद्दल थोड्याफार फरकाने पालकांच्या चिंता एकसारख्याच असतात. हल्ली तर मुलांचं आरोग्य हा एक चिंतेचा विषय झाला आहे. कारण मैदानी खेळांचं कमी झालेलं प्रमाण, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेला बदल, जंकफूड, पॅकफूड, प्रोसेस्ड फूडचं वाढलेलं प्रमाण, अभ्यासाचा ताण या सगळ्या गोष्टींमुळे मुलांच्या तब्येतीवर परिणाम होतो. त्यामुळे काही पालक आता या समस्येबाबत जागरुक झाले असून ते मुलांच्या तब्येतीकडे, आहाराकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. त्यापैकीच एक आहेत शाहिद कपूर आणि मीरा कपूर (Shahid Kapoor and Meera Kapoor shared parenting tips). मुलांसाठी त्यांना कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात याविषयी त्यांनीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.(Parenting Tips Shared by Shahid Kapoor and Meera Kapoor)
मुलांचं आरोग्य जपण्यासाठी शाहिद कपूर आणि मीरा कपूर कोणत्या गोष्टी करतात?
१. सगळ्यांना माहितीच आहे की मीरा कपूर ही अतिशय हेल्थ फ्रिक आहे. त्यामुळे ती मुलांनाही त्या शिस्तीत मोठं करण्याचा प्रयत्न करते. शाहिद आणि मीरा दोघांनाही व्यायामाचं महत्त्व माहिती आहे. त्यामुळे ते दोघे रात्री जेवण झाल्यानंतर मुलांना आवर्जून शतपावली करायला लावतात. शतपावली केल्यामुळे पचन आणि मेटाबॉलिझम या दोन्ही गोष्टी चांगल्या होतात.
दिवसभर उभ्याने काम करून रात्री टाचा, गुडघे, पोटऱ्या दुखतात? फक्त १० मिनिटांचा व्यायाम करून पाहा..
२. मीरा सांगते की ती मुलांना रोज फळं खायला देते. पण कोणत्याही दोन वेगवेगळ्या प्रकारची फळं एकत्र होणार नाहीत याची काळजी घेते. हल्ली नाश्ता करताना फ्रुट प्लेट घेण्याचा ट्रेण्ड आहे. फ्रुट प्लेटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फळं एकत्र केलेली असतात. पण वेगवेगळे गुणधर्म असणारी फळं एकत्र खाणं अजिबातच आरोग्यदायी नाही.
३. रात्री झोपण्यापुर्वी ते मुलांना आवर्जून हळदीचं दूध प्यायला देतात. या दुधामध्ये गूळ आणि तूप घातलेलं असतं. आपल्याला माहितीच आहे की रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळदीचं दूध पिणं उत्तम असतं. पण मुलं मात्र हळदीचं दूध प्यायला टाळाटाळ करतात.
काश्मिरी लाल मिरच्यांची झणझणीत चटणी! रेसिपी पाहूनच तोंडाला सुटेल पाणी, लगेचच बघा...
४. मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत शाहिदने सांगितलेली चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दोघेही एकत्र बसून मुलांचा महिनाभराचा मेन्यू ठरवतात आणि तो मुलांना पाळावा लागतो. त्यामुळे आपोआपच मुलांचं जंकफूड, प्रोसेस्ड फूड खाणं कंट्रोलमध्ये येतं.
