सगळ्यांचे आई-वडील किती चांगले, फक्त तुम्ही एवढे स्ट्रिक्ट का?
असं वाक्य पालकांना मुलांकडून कायमच ऐकायला मिळतं. अनेकदा या वाक्यामुळे आपलं मन दुखावलं जातं. आपण आपल्या मुलांसाठी प्रत्येक गोष्ट आवडीने करतो.(Emotional blackmail by children) त्यामागे प्रेम, काळजी आणि त्यांच्या भविष्याची चिंता आपल्याला सतावते.(Parenting tips) पण तरीही मुलं असं का म्हणतात? त्यांच्या मनात या गोष्टी कुठून येतात. असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. (How to handle manipulative behavior in kids)
खरं तर मुलांचं जग आपल्यापेक्षा वेगळं असतं. त्यांना आनंद हा आता हवा असतो. हा क्षण त्यांना जगायचा असतो. बाहेर जाणं, मित्रांसोबत खेळणं, सायकल चालवणं, मोबाईलवर गेम खेळणं हीच त्यांच्या दृष्टीने त्यांचं स्वातंत्र्य. पण आपण पालक म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीला नाही म्हणतो, नियम लावतो.(Kids comparing parents) सतत अभ्यास करा, हे करु नका किंवा हे करायला हवं अशा सगळ्या गोष्टींमुळे मुलांच्या मनावर ताण येतो.
अप्सरा आली..! लग्नसोहळ्यात मानानं मिरवावे ५ अस्सल मराठी दागिने, काठापदराची साडी की नऊवारी-साज मराठीच
1. मुलांना वाटतं इतरांचे आई-बाबा त्यांच्यावर लवकर रागवत नाही, मागे माझेच का? मित्रांचे आई-बाबा हवं ती वस्तू त्यांना घेऊन देतात. आपली मुलं देखील आपल्या काही गोष्टी इमोशल ब्लॅकमेल करत असतील तर काही टिप्स लक्षात ठेवा, ज्यामुळे आपलं नात अधिक घट्ट होईल.
2. मुलं अनेकदा पालकांना एकच प्रश्न वारंवार विचारतात. ज्यामुळे पालकांना वैताग येतो. आणि ते त्या गोष्टीवर होकार दर्शवतात. पण अशावेळी आपण मुलांना दुसऱ्या गोष्टी गुंतवायला हवे. अनेकदा मुलं आपल्या भावंडांसोबत स्वत:ची तुलना करतात. माझ्या मित्रांकडे फोन आहे, पण तूच तो मला देत नाहीस. अशावेळी मुलांचे शांतपणे ऐकून घ्या.
3. पालकांनी मुलांचे सगळे हट्ट पूर्ण करायला हवे असे नाही. मुलांना कायम बरोबर आणि चूक यातील फरक समजावून सांगा. कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ न शकल्याने अनेकदा पालकांना अपराधी वाटते. ज्यामुळे ते मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण करतात.
4. मुले किशोरवयीन अवस्थेत असताना पालकांना भीती वाटते. टोकाचे पाऊल उचलेल किंवा काही चुकीचे करेल. त्यामुळे अनेकदा ते मुलांच्या रागाला किंवा हो ला हो करण्याचा प्रयत्न करतात. पण पालकांनी काही गोष्टी मुलांना वेळीच समजावून सांगायला हवे.
