घरात मुले असली की, घर अगदी आनंदी वाटतं.(Parenting tips) पण हीच मुले जेव्हा नखरे करायला लागतात तेव्हा पालकांच्या नाकी नऊ येतात. हल्ली मुलांच्या खाण्यापिण्याचे अधिक नखरे असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलांची रडरड सुरु असते.(Parenting tips for cranky kids) मुलांना अभ्यासाला बस्स म्हटंल की त्यातही ते अधिक चिडचिड करु लागतात.(Child nutrition and focus) जर आपली मुले देखील अभ्यास करताना किंवा खाताना नाटक करत असतील.(Study tips for kids) मुलांमध्ये चिडचिडपणा, हट्टीपणा वाढला असेल तर या ५ सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. मुलांना राग येणे, त्यांची चिडचिड होणं कमी होईल.
मुलं शाळेत जाताना रडतात-घाबरतात? ५ गोष्टी करा, मुलं रोज आनंदानं जातील शाळेत-छान रमतील
1. नियम बनवा
खाताना किंवा अभ्यास करताना मुलांसाठी नियम सेट करा. घरातील नियमांविषयी त्यांना समजावून सांगा. रात्री ८ नंतर नो स्क्रीन टाइम असं ठणकावून सांगा. मुलांसोबत पालकांदेखील त्या नियमांचे पालन करा. आपणच जर त्या नियमांचे पालन केले नाही तर मुले सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात.
2. पर्याय द्या
मुलांवर कोणतेही गोष्ट लादू नका. त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न देखील करु नका. मुलांना काय खायला आवडेल? असा प्रश्न त्यांना विचारा, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवा. जंक फूडऐवजी हेल्दी फूडवर जास्त प्रमाणात भर द्या. मुलांना अभ्यासाला बसवताना त्यांच्या आवडीच्या विषयांपासून सुरुवात करा.
मोबाइल दाखवला नाही तर मुले जेवतच नाहीत? ३ सोपे उपाय लवकर करा, नाहीतर पस्तावाल-तज्ज्ञ म्हणतात...
3. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
मुले जेव्हा चांगले वागतात तेव्हा त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप जरुर मारा. त्यांना लहान गिफ्ट्स किंवा चॉकलेट देऊन त्यांचे कौतुक करा. त्यांच्या चुकांना पाठीशी न घालता चांगल्या वर्तनाकडे दुर्लक्ष करु नका. यामुळे मुले आपले सहज ऐकतील.
4. मुलांचे ऐका
कधीकधी मुलांना असं वाटतं की पालकांनी त्यांच ऐकावं यासाठी ते काही गोष्टी करतात. परंतु, पालकांनी देखील आपला वेळ मुलांसोबत घालवावा. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. जेव्हा आपण मुलांशी भावनिकरित्या जोडले जाऊ तेव्हा मुलं तुमचं अधिक ऐकतील.
5. धीर धरा
मुलांमध्ये बदल होण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी पालकांनी सातत्याने त्याचे पालन करायला हवे. मुलं त्यांच्या पालकांकडे पाहून शिकतात. जर आपण सगळ्या गोष्टी शांत आणि संयमाने हाताळल्या तर मुले देखील तेच अनुकरण करुन शिकतील.