Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > मुलांचा आत्मविश्वास वाढवणारी जादू! ५ सोप्या सवयी, मुलं होतील धीट- प्रत्येक परिस्थितीत राहतील खंबीर...

मुलांचा आत्मविश्वास वाढवणारी जादू! ५ सोप्या सवयी, मुलं होतील धीट- प्रत्येक परिस्थितीत राहतील खंबीर...

parenting tips for confident children : how to build confidence in kids : how parents can help kids be confident : लहान वयातच मुलांना सुपर कॉन्फिडंट बनवण्यासाठी पालकांनी नेमकं काय करावं याच्या ५ सोप्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2025 16:46 IST2025-11-11T16:06:00+5:302025-11-11T16:46:47+5:30

parenting tips for confident children : how to build confidence in kids : how parents can help kids be confident : लहान वयातच मुलांना सुपर कॉन्फिडंट बनवण्यासाठी पालकांनी नेमकं काय करावं याच्या ५ सोप्या टिप्स...

parenting tips for confident children how to build confidence in kids how parents can help kids be confident | मुलांचा आत्मविश्वास वाढवणारी जादू! ५ सोप्या सवयी, मुलं होतील धीट- प्रत्येक परिस्थितीत राहतील खंबीर...

मुलांचा आत्मविश्वास वाढवणारी जादू! ५ सोप्या सवयी, मुलं होतील धीट- प्रत्येक परिस्थितीत राहतील खंबीर...

आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांमध्ये आत्मविश्वास असणं हे त्यांना यश मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असते. मुलांमध्ये असणाऱ्या आत्मविश्वासामुळे मुले भविष्यात प्रत्येक येणाऱ्या संधीच नक्कीच सोन करु शकतात पण प्रत्येक मूल जन्मतः आत्मविश्वासी नसतं, हा गुण पालकांच्या मार्गदर्शनाने, वातावरणाने आणि प्रोत्साहनाने विकसित होतो. मुलं जर सतत घाबरलेली, संकोची किंवा स्वतःवर विश्वास नसलेली वाटत असतील, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि पुढच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो(parenting tips for confident children).

चांगले गुण मिळवूनही अनेक मुले सार्वजनिक ठिकाणी बोलताना किंवा नवीन आव्हाने स्वीकारताना घाबरतात किंवा संकोच करतात, याचे मुख्य कारण आहे आत्मविश्वास कमी असणे. ज्या मुलांमध्ये आत्मविश्वास असतो, ती मुले शाळेत, खेळात आणि सामाजिक जीवनात पुढे राहतात आणि अपयशालाही धैर्याने तोंड देतात. जर आपल्या पाल्यामध्ये देखील असाच आत्मविश्वास कमी असेल तर, फक्त चांगले शिक्षण देऊनच नाही, तर काही सोप्या आणि सध्या सहज कृतींमधून सुपर कॉन्फिडंट करु शकता. मुलांमधील (how to build confidence in kids) आत्मविश्वासाची कमतरता भरुन काढण्यासाठी (how parents can help kids be confident) पालकांनी नेमकं काय करावं याच्या काही खास टिप्स पाहूयात... 

मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल तर पालकांनी काय करावं ? 

१. मुलांना निवडण्याची संधी द्या :- काही गोष्टी मुलांना स्वतःच्या स्वतःहून निवडण्याची संधी द्या. मुलांना स्वतःचे अगदी साधेसोपे छोटे-छोटे निर्णय स्वतःहून घेऊ द्या. जसे की, त्यांना विचारा आज त्यांना कोणता शर्ट घालायचा आहे किंवा नाश्त्यात काय खायला आवडेल. जेव्हा मुले स्वतःची निवड स्वतः करतात, तेव्हा त्यांना जाणवते की त्यांचे मत महत्त्वाचे आहे. ही 'निर्णय घेण्याची शक्ती' हळूहळू त्यांच्या आत्मविश्वासाला आतून मजबूत करते.

२. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा :- आपण अनेकदा मुलांचे कौतुक त्यांच्या चांगल्या गुणांसाठी किंवा काही खास गोष्ट चांगली केल्यास करतो. पण खरी जादू तेव्हा होते, जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रयत्नांच्या प्रयत्नांचे कौतुक करता. जर ते एखाद्या खेळात हरले असतील किंवा एखाद्या विषयात कमी गुण मिळाले असतील, तरीही त्यांना म्हणा "तू खूप मेहनत केलीस, मला तुझा अभिमान आहे." यामुळे ते अपयशाला घाबरणार नाहीत आणि पुढच्या वेळी अधिक जोमाने प्रयत्न करतील.

मुलांना लागली 'W' सिटिंगमध्ये बसण्याची सवय ? ३ योगासन - ही सवय मोडून मुलांची बसण्याची स्थिती सुधारेल... 
 

३. चुकांना 'शिकण्याची संधी' म्हणा :- चुका करणे अगदी सामान्य आहे. जेव्हा आपले मुलं काही चुका करते, तेव्हा त्याला रागावण्याऐवजी समजावून सांगा की ही शिकण्याची एक प्रक्रिया आहे. अशावेळी पालकांनी मुलांना विचारायला हवे , "या चुकीतून तू काय शिकलास?" जेव्हा मुलांना हे कळेल की चुकीचा अर्थ 'अपयश' नाही, तर 'पुढचे पाऊल' किंवा काहीतरी नवीन करण्याची संधी आहे, तेव्हा ते नवीन गोष्टी करून पाहण्यास कचरणार नाहीत.

४. घरातील छोट्या - छोट्या कामांमध्ये सामील करा :- मुलांना त्यांच्या वयानुसार छोटी-छोटी कामे करण्याची जबाबदारी द्या जसे की, स्वतःची खेळणी आवरणे  किंवा पाण्याची बाटली भरणे, शाळेचे दप्तर भरणे. जेव्हा ते ही कामे यशस्वीरित्या पूर्ण करतात, तेव्हा त्यांना 'सक्षम' असल्याची भावना येते. ही कामे मी देखील न चुकता करु शकतो अशी भावना त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. 

५. प्रेम आणि वेळ द्या :- मुलांना नेहमी हे जाणवून द्या की, तुमचे त्यांच्यावरील प्रेम कोणत्याही अटीवर अवलंबून नाही. जरी मुलं वर्गात नापास झाले किंवा एखादा खेळ हरले, तरी त्यांना मिठी मारा आणि म्हणा, "तू माझ्यासाठी सर्वात खास आहेस." त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम घालवा, त्यांच्या गोष्टी ऐकून घ्या. एक सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणच आत्मविश्वासाचा सर्वात मजबूत पाया असतो. पालकांनी जर आजपासूनच हे ५ छोटे उपाय करायला सुरुवात केली, तर तुम्ही पाहाल की तुमचे मुलं फक्त 'सुपर कॉन्फिडंटच' बनेल असे नाही, तर जीवनाच्या प्रत्येक मार्गावर निर्भीडपणे पुढे जाईल शिकेल.

मुलांच्या हातांतून मोबाईल हिसकावून घेता सतत ओरडता ? थांबा, ५ पर्याय - मुलांचा स्क्रीन टाईम होईल कमी... 

Web Title : बच्चों का आत्मविश्वास बढ़ाएँ: उज्ज्वल भविष्य के लिए 5 सरल आदतें।

Web Summary : बच्चों में आत्मविश्वास बढ़ाने के लिए विकल्प दें, प्रयास की सराहना करें, गलतियों को सीखने का अवसर मानें, कार्य सौंपें और बिना शर्त प्यार दें। ये कदम बच्चों को चुनौतियों का बहादुरी से सामना करने में मदद करते हैं।

Web Title : Boost Your Child's Confidence: 5 Simple Habits for a Bright Future.

Web Summary : Nurture confidence in children by providing choices, praising effort, framing mistakes as learning, assigning tasks, and offering unconditional love. These steps help kids face challenges bravely.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.