आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणी असं वाटायचं की, जेव्हा आपण स्वतः आई-वडील होऊ तेव्हा आपल्या मुलांवर कधीच ओरडणार किंवा रागावणार नाही. कारण आपल्याला स्वतःवर कोणी ओरडलेलं अजिबात आवडायचं नाही. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष पॅरेंटिंगची वेळ आली, तेव्हा लक्षात आलं की हे वाटतं तितकं सोपं नाही. आपण कितीही 'जेंटल पेरेंटिंग' करण्याचा प्रयत्न केला, तरी दिवसातून असे काही क्षण येतातच जेव्हा आपला संयम सुटतो(21 day no yelling formula gentle parenting techniques).
दिवसभराचा कामाचा ताण, घरची जबाबदारी आणि त्यात मुलांच्या खोड्या...अशावेळी अनेक पालकांचा संयम सुटतो आणि नकळत मुलांवर ओरडतो. ओरडल्यामुळे मुलं तात्पुरती शांत बसतात खरी, पण त्यांच्या बालमनावर याचे खोलवर आणि नकारात्मक परिणाम होत असतात. मानसशास्त्रानुसार, कोणतीही चांगली सवय लागण्यासाठी २१ दिवसांचा काळ (parenting impact of yelling on children) पुरेसा असतो. जर तुम्ही ठरवलं की पुढचे २१ दिवस आपण मुलांवर अजिबात ओरडायचं नाही, तर तुमच्या घरात आणि मुलांच्या स्वभावात काय बदल होईल? हा केवळ एक प्रयोग नसून मुलांच्या मानसिक विकासासाठी अत्यंत फायद्याचे ठरु शकते. जर पालकांनी काही दिवस जाणीवपूर्वक मुलांवर ओरडणं टाळलं आणि शांतपणे त्यांच्याशी संवाद साधला, तर मुलांच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसू लागतात. अगदी २१ दिवस मुलांवर न ओरडता संयमाने वागण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्या स्वभावात आणि वर्तनात चांगले बदल दिसून येऊ शकतात.
केवळ २१ दिवस आपला आवाज आणि राग नियंत्रणात ठेवल्याने मुलांच्या व्यक्तिमत्त्वात कोणते ३ आश्चर्यकारक आणि सकारात्मक बदल घडून येतात. हा बदल पाहून तुम्हालाही जाणीव होईल की, रागापेक्षा प्रेमाची भाषा मुलांवर जास्त परिणामकारक ठरते. तज्ज्ञांच्या मते, आपल्याला वारंवार असं वाटतं की ओरडल्याशिवाय मुलं ऐकणार नाहीत, पण यामागे काही खोलवर मानसशास्त्रीय कारणं दडलेली आहेत. आपल्या आयुष्यातील पहिली सात वर्षे आपल्या मेंदूची 'प्रोग्रामिंग' कशी असावी हे ठरवत असतात. जर लहानपणी आपल्यावर कोणी ओरडलं असेल, तर आपला मेंदू तणावाच्या किंवा रागाच्या क्षणी आपोआप त्याच जुन्या पॅटर्नची पुनरावृत्ती करतो. त्याचवेळी, जेव्हा आपण प्रचंड तणावाखाली असतो, तेव्हा आपल्या मेंदूचा विचार करणारा आणि सारासार विवेक बुद्धी असणारा भाग (Prefrontal Cortex) मागे पडतो आणि आपण केवळ भीती प्रतिक्रिया (React) देऊ लागतो.
मुलांवर ओरडण्याचे परिणाम...
सतत मुलांवर ओरडल्यामुळे त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो. यामुळे मुलांच वागणं - बोलणं बिघडून त्यांच्यात आक्रमकता वाढते. मुलांची शिकण्याची आणि स्वतःला सावरून घेण्याची क्षमता कमी होते. आई - वडील आणि मुलांमधील नातं कमकुवत होऊ लागते आणि मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील खोल परिणाम होतो.
बाहेरचं खाणं तर लांबच, तैमूर साधा केकही खात नाही! आई करीनाची शिस्त, लेकाचं डाएट कडक...
२१ दिवसांचे ‘नो येलिंग’ चॅलेंज (No Yelling Formula) म्हणजे नेमकं काय ?
इंस्टाग्रामवरील shikainnamacchhan या अकाऊंटवरून पालकांसाठी २१ दिवसांचे ‘नो येलिंग’ चॅलेंज या विषयावर अधिक माहिती दिली आहे.
१. पहिल्या ७ दिवसांत :- मुलांवर न ओरडल्याने पहिल्या ७ दिवसांत मुलांचा मेंदू पुन्हा ॲक्टिव्ह होऊ लागतो. यादरम्यान ते भीतीपोटी नाही तर समजूतदारपणे गोष्टींकडे पाहायला सुरुवात करतात. मुलांच्या मनात आपण सुरक्षित आहोत अशी भावना तयार झाल्यावर त्यांचा मेंदू अधिक शांत होतो. मेंदू शांत झाल्याने आणि आपण सुरक्षित आहोत याची खात्री झाल्यावर मुलं इतर गोष्टींचा स्वतंत्र विचार करु लागते.
२. पुढच्या १४ दिवसांत :- दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुलांचा ‘ट्रस्ट सर्किट’ (Trust Circuit) मजबूत होऊ लागतो. त्यांना विश्वास वाटू लागतो की ते सुरक्षित आहेत आणि आपली गोष्ट सांगण्यासाठी घाबरण्याची कसलीही गरज नाही. पालकांच शांत व समजूतदारपणाच वागणं - बोलणं आणि स्वभावातील आपलेपणा पाहून पालक आणि मुलांमधील नातं अधिक घट्ट होत. यामुळेच मुलं पालकांना आपलंस मानू लागतात.
३. पुढच्या २१ दिवसांत :- तीन आठवडे पूर्ण होताच मुलांच्या वागणुकीत कायमस्वरूपी चांगले आणि सकारात्मक बदल दिसू लागतात. जेव्हा पालकांचा स्वभाव शांत आणि समजूतदारपणाचा होतो तेव्हा याचे प्रतिबिंब मुलांवरही पडते. पालकांनी ओरडणं थांबवल्यावर मुलांच्या मनातील स्ट्रेस हार्मोन्स रिलॅक्स होतात, यामुळे मुलं देखील दंगामस्ती न करता पालकांचं ऐकू लागतात.
हा बदल नेमका होतो तरी कसा ?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा बदल कोणत्याही भीतीमुळे किंवा शिक्षेमुळे येत नाही, तर तो पालकांशी असलेल्या एका मजबूत नात्यामुळे (Strong Connection) निर्माण होतो. जेव्हा तुम्ही मुलांवर ओरडणं थांबवता, तेव्हा तुमचं मूल केवळ भीतीपोटी नाही, तर तुमच्याबद्दल असलेल्या आदर आणि प्रेमापोटी तुमचं ऐकायला सुरुवात करतं.
