पालक जसे मुलांसमोर वागतात त्याचं अनुकरण करुन मुले वागायला सुरुवात करतात असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.(Parenting tips) सध्याच्या डिजिटल युगात पालकांसह मुलांच्या झोपेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. मोबाईल, टीव्ही, व्हिडीओ गेम्स आणि इंटरनेटमुळे मुलांच्या झोपण्याच्या वेळेत व्यत्यय येत आहे.(kids bedtime) लहान वयात मुलांना पुरेशी झोप मिळाली नाही की, त्यांच्या शारीरिक- मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. झोप ही एकाग्रतेसाठी महत्त्वाची मानली जाते. (Kids sleep schedule)
अनेकदा मुलं मोबाइल वापरण्यासाठी झोपण्याच नाटक करतात.(Healthy sleep for children) पालक झोपल्यानंतर आपल्याला आणखी थोडावेळ स्क्रीन टाइम बघता येईल असा त्याता अट्टाहास असतो. परंतु, मोबाइलच्या अतिवापरामुळे त्यातून निघणारा निळा प्रकाश मेंदूवर परिणाम करतो.(Parents tips for kids sleep) ज्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात. मुलांच्या बुद्धीची वाढ होत नाही. मुलं अधिक हट्टी किंवा चिडचिडे बनतात. डॉक्टर सांगतात मुलं जर योग्य वेळी झोपली नाही तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यासाठी मुलांची झोपण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया.(Sleep routine for kids)
काजोलची लेक का म्हणते, मला नको मुलगी व्हायला..?, काजोलनेच सांगितलं कारण..
डॉ. पवन मांडवीया म्हणतात की मुलांनी झोपण्याची योग्य वेळ ही रात्री ९ ते १० दरम्यानची असावी. या वेळेत मुले झोपलेली असावी. हे वेळ हार्मोनचा स्त्राव सुरळीत करणारी असते. मुलांच्या स्नायू आणि मानसिक वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी डॉक्टर म्हणतात आपली मुलं जर रात्री उशिरा झोपत असतील आणि सकाळी उशिरा उठत असतील तर ही सवय बदलायला हवी.
मुलं झोपलेले असते तेव्हा त्याच्या शरीरातील संप्रेरक वाढत असतात. मुलं जितके शांतपणे झोपते तितकाच चांगला शारीरिक आणि मानसिक विकास मुलांचा होत असतो. जर मुलं रात्री उशिरा झोपले आणि त्याला पुरेशा प्रमाणात झोप मिळाली नाही तर त्याचा मेंदूवर आणि वाढीवर परिणाम होत असतो. तसेच शिकण्या आणि एकाग्रतेसंबंधित समस्या येऊ लागतात. यामुळे मुलं दिवसभर चिडचिड आणि रडरड करतात. त्यांची प्रतिकारशक्ती देखील कमी होऊ लागते. सतत चिंता आणि नैराश्य देखील त्यांच्यात वाढते.
- कोणत्या वयातील मुलाने कधी झोपावे?
- डॉक्टर सांगतात जर बाळ ६ महिन्यांचे असेल तर रात्री ८ वाजता झोपावे.
- ६ ते १२ महिन्यांच्या बाळाला संध्याकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान झोपवावे.
- १ ते २ वर्षांच्या बाळासाठी झोपण्याची योग्य वेळ ही संध्याकाळी ७ वाजताची असावी.
- ३ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांनी रात्री ८ वाजता झोपावे.
- ६ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी रात्री ९ वाजता झोपण्याची योग्य वेळ आहे.
- तर १४ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांनी रात्री १० वाजता झोपायला हवे.
डॉक्टर म्हणतात की मूल रात्री ९ ते १० दरम्यान झोपत असेल तर त्याने सकाळी ७ च्या सुमारास उठायला हवे. यामुळे त्याची झोप किमान ८ ते १० तासांची व्यवस्थित होईल. ज्यामुळे मेंदूचा विकास नीट होईल.