Join us  

मुलांना चांगले मार्क मिळावेत, हुशार व्हावेत असं वाटतं तर करा फक्त १ गोष्ट, तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 12:27 PM

One basic Tip To Succeed in School Parenting Tips : प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करतात.

आपल्या मुलांनी सगळ्या गोष्टीत हुशार असावं, त्यांना शिकवलेलं सगळं नीट यावं असं पालक म्हणून आपल्याला कायमच वाटत असतं. मुलांनी चांगला अभ्यास करुन परीक्षेत चांगले मार्क मिळवावेत यासाठी आपण त्यांना चांगल्या शाळा, क्लासेस लावतो. अभ्यास करण्यासाठी त्यांच्या सारखे मागे लागतो. मात्र तरीही मुलांना चांगले मार्क मिळाले नाहीत की आपण खट्टू होतो आणि काय करावं ते आपल्याला कळत नाही. पण मुलांनी अभ्यासात हुशार असावं आणि त्यांना सगळं यावं यासाठी पालकांनी एक गोष्ट आवर्जून करायला हवी. ती कोणती याबद्दल प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करतात. पालकत्व सोपे होण्याच्या दृष्टीने त्या कायमच अगदी सोप्या टिप्स देत असतात. आता त्यांनी नेमके काय सांगितले पाहूया (One basic Tip To Succeed in School Parenting Tips)...

पालकांनी करायला हवी फक्त १ गोष्ट

मुलं लहान आहेत म्हणून अनेकदा पालक अगदी सहज त्यांची शाळा बुडवतात. सणवार, घरी पाहुणे येणार म्हणून किंवा कोणाचे लग्नकार्य, काही कामानिमित्त गावाला जायचे म्हणून शाळा बुडवली जाते. त्यामुळे शाळेत त्या दिवसांमध्ये घेतलेला अभ्यास बुडतो आणि नंतर मुलांना त्याची लिंक लागायला बराच वेळ जातो. बुडलेला अभ्यास भरुन काढलाच जातो असे नाही आणि मग मुलांच्या विशिष्ट विषयाच्या बुडलेल्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे मुलांना नियमित शाळेत पाठवणे अतिशय महत्त्वाचे आहे.

मुलं नक्कीच हुशार असतात, त्यांना शाळेत शिकवलेलं कळतं आणि बहुतांश गोष्टी त्यांच्या लक्षातही राहतात. मात्र हे शिकवताना मूल शाळेत नसेल तर त्यामुळे ते अभ्यासात मागे राहण्याची शक्यता जास्त असते. मुलांनी एकदा ४ किंवा ८ दिवसांची सुट्टी घेतली की त्यांची गाडी पुन्हा रुळावर यायला पुढचे आणखी २ ते ३ दिवस जावे लागतात. यामुळे त्यांचा अभ्यास जास्त प्रमाणात बुडण्याची शक्यता असते. त्यामुळे शाळा बुडवू नये ही अतिशय साधी गोष्ट वाटत असली तरी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ती महत्त्वाची असते हे पालकांनी आवर्जून लक्षात घ्यायला हवे. तसेच मुलांना एकप्रकारची शिस्त लागावी आणि त्यांचे नेहमीचे रुटीन बिघडू नये यासाठीही ते लहान असतील तरी त्यांना नियमित शाळेत पाठवणे आवश्यक असते हे लक्षात घ्यायला हवे. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंशाळा