Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > फक्त अभ्यास आणि शाळाच पुरेसे नाही, मुलं स्वावलंबी आणि जबाबदारी होण्यासाठी ५ सवयी आवश्यकच...

फक्त अभ्यास आणि शाळाच पुरेसे नाही, मुलं स्वावलंबी आणि जबाबदारी होण्यासाठी ५ सवयी आवश्यकच...

Must have life skills for kids : parents teach these 5 skills to kids : essential skills for children : लहानपणीच कोणत्या ५ महत्त्वाच्या गोष्टी मुलांना शिकवायला हव्यात, ज्यामुळे त्यांचे आयुष्य आनंदी आणि सुंदर होईल....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2025 17:39 IST2025-12-01T17:33:30+5:302025-12-01T17:39:56+5:30

Must have life skills for kids : parents teach these 5 skills to kids : essential skills for children : लहानपणीच कोणत्या ५ महत्त्वाच्या गोष्टी मुलांना शिकवायला हव्यात, ज्यामुळे त्यांचे आयुष्य आनंदी आणि सुंदर होईल....

Must have life skills for kids parents teach these 5 skills to kids essential skills for children | फक्त अभ्यास आणि शाळाच पुरेसे नाही, मुलं स्वावलंबी आणि जबाबदारी होण्यासाठी ५ सवयी आवश्यकच...

फक्त अभ्यास आणि शाळाच पुरेसे नाही, मुलं स्वावलंबी आणि जबाबदारी होण्यासाठी ५ सवयी आवश्यकच...

प्रत्येक पालकांची अशी इच्छा असते की, आपले मूल चांगले, सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक बनावे. मुलांचे भविष्य फक्त त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर अवलंबून नसते, तर त्यांच्या वर्तनावर, मूल्यांवर आणि स्वभावावर देखील अवलंबून असते. चांगली वागणूक आणि उत्तम चारित्र्य हे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांवर संस्कार करण्याची योग्य वेळ म्हणजे त्यांचे लहानपण! या वयात शिकवलेल्या सवयी आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात. जर पालकांनी मुलांना लहानपणापासूनच काही मूलभूत पण महत्त्वपूर्ण गोष्टी शिकवल्या, तर मूल भविष्यात आत्मविश्वासाने उभे राहील आणि सामाजिक जगात उत्तम वागणूक देईल(parents teach these 5 skills to kids).

मुलांच्या उत्तम संगोपनासाठी फक्त अभ्यास आणि संस्कारच पुरेसे नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना काही आवश्यक लाईफ स्किल्स देखील शिकवल्या पाहिजेत, कारण या स्किल्स त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्यांना उपयोगी पडतात. आपल्या मुलाला आदर्श मूल बनवण्यासाठी आणि त्यांची वागणूक सुधारण्यासाठी त्यांना लहानपणीच (essential skills for children) कोणत्या ५ महत्त्वाच्या गोष्टी शिकवायला हव्यात, ज्यामुळे त्यांचे आयुष्य (Must have life skills for kids) आनंदी आणि सुंदर होईल, याविषयी काही खास ५ गोष्टी कोणत्या ते पाहूयात... 

पालकांनी मुलांना लहानपणीच कोणत्या महत्वाच्या ५ स्किल्स शिकवायला हव्यात? 

१. सेल्फ डिसिप्लिन आहे महत्वाचे :- सर्वातआधी मुलांना मुलांना सेल्फ डिसिप्लिनचे महत्त्व समजावून सांगावे. यासाठी तुम्ही मुलांना स्वतःचे वेळापत्रक बनवण्यास आणि त्याचे पालन करण्यास सांगू शकता, ज्यामध्ये ते त्यांच्या खेळण्यासाठी, अभ्यासासाठी आणि आरामासाठी वेळ निश्चित केलेला असेल. यामुळे त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि सोबतच इतर अनेक महत्वाची कामे यांमध्ये संतुलन राखायला शिकण्यास मदत मिळेल. तसेच, सेल्फ डिसिप्लिनची सवय हळूहळू मुलांना लागेल, ज्यामुळे पुढे जाऊन ते वेळेचा योग्य उपयोग करणे सहजपणे शिकू शकतील.

२. बेसिक कुकिंग स्किल्स शिकवा :- पालकांनी आपल्या मुलांना काही बेसिक आणि सोप्या डिशेस बनवायला नक्कीच शिकवावे, जेणेकरून जर त्यांना कधी अशा ठिकाणी राहावे लागले जिथे त्यांना स्वतः स्वयंपाक करावा लागेल, तर ते कोणावरही अवलंबून राहणार नाहीत. तसेच, 'स्वयंपाक करणे' फक्त मुलींनी शिकण्याची गोष्ट आहे, असा विचार अजिबात करू नका. मुलगा असो वा मुलगी स्वयंपाक हे एक आवश्यक लाईफ स्किल आहे आणि ते दोघांनाही आले पाहिजे.

त्यांनी न लाजता सांगितलं आई झाल्यानंतरही रडलो-उदास झालो! पोस्टपार्टम डिप्रेशनविषयी बोलणाऱ्या ५ अभिनेत्री...

३. मनमोकळेपणे बोलणे शिकवा :- प्रत्येक पालकासाठी हे देखील महत्त्वाचे आहे की त्यांनी आपल्या मुलांना त्यांची मते नेहमी स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने मांडायला शिकवावे. आपले मत मांडताना कधीही संकोच करू नये, कारण अनेकदा मनमोकळेपणे न बोलता आल्यामुळे मोठी अडचण येऊ शकते. यासाठीच मुलांना आपले म्हणणे योग्य पद्धतीने मांडता आले पाहिजे. ही स्किल पुढे जाऊन त्यांना नातेसंबंध, अभ्यास आणि करिअरमध्ये अशा प्रत्येक क्षेत्रात मदत करते. जेव्हा मुले मोकळेपणाने बोलायला शिकतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण ते आपल्या भावना दाबण्याऐवजी योग्य प्रकारे व्यक्त करायला देखील शिकतात. म्हणूनच, त्यांच्या कम्युनिकेशन स्किल्स (Communication Skills) कडेही लक्ष द्या.

४. बचत करण्याची सवय लावा :- पैशाचे महत्त्व मुलांना लहानपणापासूनच समजावून सांगणे आवश्यक आहे, कारण ही सवय जीवनातील कठीण काळात त्यांच्या खूप उपयोगी येते. भविष्यात कधी अशी परिस्थिती आली, जेव्हा त्यांच्याकडे पैशाची कमतरता असेल, तर त्यांची छोटी-छोटी बचत देखील वाईट वेळेत आधार बनू शकते. यासाठी हे आवश्यक आहे की पालकांनी मुलांना लहानपणापासूनच बचत करण्याची सवय लावावी. जेव्हा मुलांना हे समजते की पैसे मेहनतीने कमावले जातात आणि विचारपूर्वक खर्च केले जातात, तेव्हा ते जबाबदारी आणि पैशाचे महत्वच दोन्ही शिकतात, जे आयुष्यभर त्यांच्यासोबत राहते.

हिवाळ्यात सर्दीखोकल्याने मुलांचं नाक चोंदलं-ढास लागते? तूप-ओवा-कापराचा ‘हा’ उपाय, विकतच्या इनहेलरपेक्षा भारी...

५. कठीण प्रसंगात संयमाने धैर्याने परिस्थिती हाताळा :- पालकांनी मुलांना हे समजावून सांगायला हवे की, समस्या कितीही मोठी असली तरी, कधीही संयम गमावू नये. सर्वात आधी परिस्थिती काळजीपूर्वक ऐकावी आणि समजून घ्यावी, आणि त्यानंतरच विचारपूर्वक योग्य पाऊल उचलावे. ही सवय त्यांना पुढे जाऊन कठीण परिस्थितीत शांत डोक्याने निर्णय घेण्यास आणि समस्येवर उत्तम उपाय शोधण्यास मदत करेल.

Web Title : सिर्फ पढ़ाई नहीं: बच्चों को आत्मनिर्भर बनाने के लिए 5 आदतें ज़रूरी

Web Summary : बच्चों को सफल होने के लिए पढ़ाई के अलावा जीवन कौशल की भी ज़रूरत है। उन्हें आत्म-अनुशासन, बुनियादी खाना बनाना, खुलकर बात करना, बचत करना और शांति से समस्या का समाधान करना सिखाएं। ये आदतें आत्मविश्वास बढ़ाती हैं और उन्हें ज़िम्मेदार भविष्य के लिए तैयार करती हैं।

Web Title : Beyond Academics: 5 Essential Habits for Raising Independent, Responsible Children

Web Summary : Children need life skills beyond academics to succeed. Teach self-discipline, basic cooking, open communication, saving, and calm problem-solving. These habits build confidence and prepare them for a happy, responsible future, equipping them to navigate life's challenges effectively.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.