सध्याच्या बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते की, मुले अभ्यास तर खूप करतात पण त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही. याचे मुख्य कारण कमकुवत स्मरणशक्ती असू शकते. अशा परिस्थितीत, मुलांची स्मरणशक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक असते, जेणेकरून त्यांनी केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहील. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचा अभ्यास, स्मरणशक्ती आणि एकाग्रता मजबूत असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शाळेचा अभ्यास, गृहपाठ, परीक्षा आणि इतर उपक्रमांमुळे मुलांच्या मेंदूवर मोठा ताण येतो. अशावेळी फक्त तासंतास अभ्यास करण्यापेक्षा, मेंदूला पोषण देणारा योग्य आहार अधिक महत्त्वाचा ठरतो(brain boosting shake for kids).
मुलांची स्मरणशक्ती वाढावी, लक्ष केंद्रित राहावे आणि केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहावं यासाठी खास तयार केलेला स्पेशल ब्रेन बूस्टिंग शेक हा एक उत्तम आणि सोपा पर्याय ठरू शकतो. घरातच तयार केलेला चविष्ट आणि पोषणमूल्यांनीयुक्त हा शेक मुलांना नक्कीच आवडेल आणि त्यांच्या अभ्यासात सकारात्मक बदल घडवून आणेल. या स्पेशल ब्रेन बूस्टिंग शेकमध्ये, अशा पदार्थांचा वापर करण्यात आला आहे जे मुलांच्या मेंदूला अॅक्टिव्ह करतात आणि शरीरासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतात. सुप्रसिद्ध पोषणतज्ज्ञ राजमनी पटेल यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून व्हिडिओ शेअर करत खास मुलांसाठीच्या ब्रेन बूस्टिंग शेकची साधीसोपी रेसिपी दिली आहे. मुलांसाठी हा (memory boosting shake for children) खास ब्रेन बूस्टिंग शेक कसा तयार करायचा आणि तो मुलांसाठी कसा फायदेशीर ठरतो ते पाहूयात...
ब्रेन बूस्टिंग शेकसाठी लागणारे साहित्य :-
१. केळ - १ (पिकलेलं)२. अक्रोड - ५ ते ६ (भिजवलेले)३. दूध - १ ग्लास४. मध किंवा खजूर - १ टेबलस्पून५. दालचिनी पावडर - चिमूटभर
कसा तयार करायचा 'ब्रेन बूस्टिंग शेक'?
न्यूट्रिशनिस्ट राजमनी सांगतात की, 'ब्रेन बूस्टिंग शेक' शेक घरच्याघरीच तयार करणे अत्यंत सोपे आहे. सर्वातआधी अक्रोड रात्रभर किंवा किमान ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ब्लेंडर किंवा मिक्सरमध्ये एक केळ, भिजवलेले अक्रोड, दूध आणि मध किंवा खजूर घाला. हे मिश्रण जोपर्यंत एकजीव आणि क्रीमी होत नाही, तोपर्यंत चांगले फिरवून घ्या. शेक तयार झाल्यावर त्यावर वरून थोडी दालचिनी पावडर भुरभुरवून घ्यावी.
'ब्रेन बूस्टिंग शेक' कधी घ्यावा ?
हा शेक तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी अभ्यासाला बसण्यापूर्वी मुलांना देऊ शकता. हा शेक प्यायल्याने मुलांना अभ्यासात ऊर्जा मिळेल आणि त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होईल.
पन्नाशी उलटली तरी इतकी कशी हॉट दिसते शिल्पा शेट्टी? फिटनेससाठी ६ गोष्टी न चुकता करते...
'ब्रेन बूस्टिंग शेक' पिण्याचे फायदे...
१. केळ :- अभ्यास करताना केळ शरीराला झटपट ऊर्जा आणि नॅचरल ग्लुकोज देते, ज्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
२. अक्रोड :- अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करतात.
३. दूध :- दूध हे प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन - बी १२ चा उत्तम स्त्रोत आहे. हे मेंदू आणि मज्जासंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
४. दालचिनी :- दालचिनीची पूड शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि मेंदू अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते.
या गोष्टींची काळजी घ्या...
१. लॅक्टोज इनटॉलरन्स :- ज्या मुलांना दुधाची ॲलर्जी (Lactose Intolerance) आहे, त्यांच्यासाठी प्लांट-बेस्ड दूध (उदा. बदाम दूध किंवा सोया मिल्क) वापरले जाऊ शकते.
२. अक्रोडचे प्रमाण :- अक्रोड अतिप्रमाणांत खाऊ नका, अन्यथा पोट फुगणे किंवा ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.
३. शेक पिण्याची योग्य वेळ :- हा शेक सकाळी किंवा संध्याकाळी अभ्यासापूर्वी पिणे सर्वात उत्तम मानले जाते. लक्षात ठेवा, रात्री उशिरा हा शेक पिऊ नये, कारण यामुळे मुलांच्या पोटात जडपणा जाणवू शकतो.
Web Summary : Struggling with your child's memory? This brain-boosting shake, packed with bananas, walnuts, milk, and cinnamon, can enhance focus and memory. Nutritionist Rajmani Patel shares this simple recipe to fuel your child's studies.
Web Summary : क्या आपका बच्चा याददाश्त की समस्या से जूझ रहा है? केला, अखरोट, दूध और दालचीनी से भरपूर यह ब्रेन-बूस्टिंग शेक, एकाग्रता और स्मरणशक्ति को बढ़ा सकता है। पोषण विशेषज्ञ राजमणि पटेल ने आपके बच्चे की पढ़ाई के लिए इस आसान रेसिपी को साझा किया है।