Lokmat Sakhi >Parenting > मै मर्द हूं-हा अहंकार येतो कुठून? आई लाडावते म्हणून मुलगे बेजबाबदार वागतात, घरकाम करत नाहीत..

मै मर्द हूं-हा अहंकार येतो कुठून? आई लाडावते म्हणून मुलगे बेजबाबदार वागतात, घरकाम करत नाहीत..

male-ego, Sons behave irresponsibly because their mothers pamper them : वाढीच्या वयात मुलांना घरात काय शिकवलं जातं यापेक्षा घरातलं वातावरण कसं असतं यातून ते घडतात आणि तिथेच सगळं बिनसतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 14:09 IST2025-02-14T18:22:55+5:302025-02-15T14:09:59+5:30

male-ego, Sons behave irresponsibly because their mothers pamper them : वाढीच्या वयात मुलांना घरात काय शिकवलं जातं यापेक्षा घरातलं वातावरण कसं असतं यातून ते घडतात आणि तिथेच सगळं बिनसतं..

male-ego where does this male ego comes from? Sons behave irresponsibly because their mothers pamper them. | मै मर्द हूं-हा अहंकार येतो कुठून? आई लाडावते म्हणून मुलगे बेजबाबदार वागतात, घरकाम करत नाहीत..

मै मर्द हूं-हा अहंकार येतो कुठून? आई लाडावते म्हणून मुलगे बेजबाबदार वागतात, घरकाम करत नाहीत..

नवरा घरात काहीच काम करत नाही, त्याला साधा चहा येत नाही, घरकाम नको, यावरुन अनेकदा बायका कटकट करतात.(male-ego where does this male ego comes from? Sons behave irresponsibly because their mothers pamper them.) नवराच काय भाऊ, मित्र, मेव्हणे यांनाही म्हणतात की काहीच कसं येत नाही. त्यावरुन टोमणेही त्यांना मारले जातात. पण असं का वागतात ते? का मुलगे लहानपणापासून घरकाम करत नाहीत, त्यांना का वाटतं की ‘मै मर्द हूं!’ ही बायकी कामं मी करणार नाही?


सॅपिर-व्हॉर्फच्या सापेक्षता गृहीतकानुसार, मुलं जे अवतीभवती बघतात तेच आत्मसात करतात. त्यांना जसं घडवाल तसं ते घडतात. अर्थात या गृहीतकाला नक्कीच अनेक अपवाद आहेत. पण तरी घरोघर लहान मुलं काय पाहतात? घरात राबराब राबणारा माणूस म्हणजे आई. घरातली सगळी कामं ती करते, वडील बसून असतात. ऑर्डरी सोडतात. म्हणजे मुलगे पाहतात काय तर पुरुष ऑर्डर सोडतो.

एक सोपं उदाहरणं पाहूया. घरात एक मुलगा एक मुलगी आहे. आईला काही काम सांगायचे असेल तर, आपसुकच ती ताईला हाक मारते. दादाने स्वत:हून मदत करायची म्हटलं तरी, राहू दे ताई करेल असं म्हणते. हे तर प्रत्येक मुलीबरोबर घडतेच. मान्य आहे ही काही फार मोठी गोष्ट नाही. पण इथूनच तर त्या मुलाला सगळं आयत मिळण्याची सवय लागते. आईने सगळी कामं ताईला सांगितली. म्हणजे मग तेच बरोबर असणार. असे त्याच्या डोक्यात बसते.


 
त्यात काही पुरुषांमध्ये प्रचंड अहंकार असतो. तो अहंकार जन्मताच असतो का? जर तो जन्मजात असतो तर, सगळ्याच पुरुषांमध्ये का दिसत नाही? आपल्याकडे मुलगा मॅनली असला पाहिजे. त्यामुळे अनेक घरात आयाच सगळं मुलांच्या हातात देतात. तू नको करुस ही कामं म्हणतात. तू मुलगा आहे म्हणत त्याला टफ करण्याच्या नादात आपण करत असलेली कामं दुय्यम आहेत असं त्याच्या मनावर बिंबवतात.
म्हणजे एकप्रकारे आई पण जुन्या समजूतींना खतपाणी घालते. आणि वाढीच्या वयात त्या मजबूत होतात. तरुण मोठे होऊन तसेच वागतात. 

म्हणून आईने..

१. मुलांशी कसं वागायचं हे मुलींना सांगता तसेच एका मुलीशी कसे वागावे हे मुलालाही शिकवा. 
२. मुला-मुलीमध्ये हा जो भेद घरात पालकांमार्फत केला जातो. तो तसाच पुढे सून-मुलगा यांमध्येही केला जातो.
३. पण  मुलींचे विचार बदललेले आहेत. त्या कमावत्या आहेत. त्यामुळे त्यांना हे वागणं जास्त खटकतं. मग लग्नानंतर घरकामामुळे वाद होतात.
४. तरुण मुलांना वाटतं की जसं माझ्या आईने आजीने विनातक्रार सारं केलं तसंच बायकोनं करावं, ती करत नाही.
५. म्हणून घरातूनच आईबाबांनी आपल्या वागण्यातून मुलग्यांनाही जबाबदारी शिकवावं आणि खऱ्या अर्थानं उत्तम माणूस म्हणून घडवणं महत्वाचं.

Web Title: male-ego where does this male ego comes from? Sons behave irresponsibly because their mothers pamper them.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.