Lokmat Sakhi >Parenting > Kids School Lunch Box : मुलांच्या शाळेचा डबा : पोषण की अपाय? मुलांची खुरटते वाढ, पडतात कायमच आजारी...

Kids School Lunch Box : मुलांच्या शाळेचा डबा : पोषण की अपाय? मुलांची खुरटते वाढ, पडतात कायमच आजारी...

Kids School Lunch Box : Simple ways to add more nutrition to your kids' lunch box : मुलांचा शाळेचा डबा आनंदाचा तर हवाच; पण त्यातून पुरेसं पोषणही मिळायला हवं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 10:05 IST2025-07-01T10:00:00+5:302025-07-01T10:05:02+5:30

Kids School Lunch Box : Simple ways to add more nutrition to your kids' lunch box : मुलांचा शाळेचा डबा आनंदाचा तर हवाच; पण त्यातून पुरेसं पोषणही मिळायला हवं!

Kids School Lunch Box Simple ways to add more nutrition to your kids' lunch box | Kids School Lunch Box : मुलांच्या शाळेचा डबा : पोषण की अपाय? मुलांची खुरटते वाढ, पडतात कायमच आजारी...

Kids School Lunch Box : मुलांच्या शाळेचा डबा : पोषण की अपाय? मुलांची खुरटते वाढ, पडतात कायमच आजारी...

मंजिरी कुलकर्णी, (आहारतज्ज्ञ)

शाळा सुरू झाली की, मुलांच्या डब्याच्या विचार करताना आपण फार वेगवेगळे पदार्थ ट्राय करत नाही. म्हणजेच एखाद्या वेळी आपण वेगळं काहीतरी करून देऊ; पण त्यामध्येसुद्धा आपण घरातलं, एरव्ही रेग्युलर डब्यात जे देतो ते बेसिक अन्नच देतो; पण ते देतानाही विचार करायला हवा की मुलांना त्यातून पूर्ण पोेषण मिळतं आहे का? डब्यात पदार्थ देताना मुलांचं पोषण कसं करता येईल त्याचाच विचार करायला हवा. घरातलेच नेहमीचे घटक वापरून आपण मुलांसाठी बॅलन्स डाएट ठरवू शकतो.

साधारणतः मुलांना डबा देताना आपण भाजी पोळी असा डबा देतो. पराठे किंवा सँडवीच देतो; परंतु कितीही प्रयत्न केला तरी यामध्ये फक्त फायबर आणि कार्बोहायड्रेट याचाच समावेश होतो. मुलांच्या डब्यात प्रोटिन डब्यामध्ये कसे देता येईल, याचा विचार करायला हवा. आजकाल मुलांना शाळेत दोन डबे दिले जातात. त्यामध्ये एक छोटा डबा आणि एक मुख्य डबा असतो. तर या दोन्ही डब्यांमध्ये प्रोटिनचा एक भाग असणं अत्यंत आवश्यक आहे.

प्रश्न असा आहे की, त्याचा विचार आणि नियाेजन कसं करायचं?
डब्याचा विचार करताना घरातील पारंपरिक पदार्थांचा समावेश करायला हवा. डाळी घातलेल्या भाज्या, भाज्या घातलेले भाजणीचे थालीपीठ, दही किंवा ताकाचा समावेश दिवसभराच्या एकातरी जेवणात आवश्यकच आहे. अर्थात पालकच जर पौष्टिक खात नसतील, व्यायाम करत नसतील तर मुलांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही.

डब्यात काय काय देता येईल?

१. आपल्या दैनंदिन घटकांमध्ये प्रोटिन कशाकशात आहेत हे आपण पाहू. प्रोटिन हे मुख्यतः डाळींमध्ये असते, पनीर, दही, सोयाबीन, टोफूमध्येसुद्धा प्रोटिन बऱ्याच अंशी असतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन डब्यामध्ये या गोष्टींचा समावेश कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करायला हवा.
२. त्याचबरोबर कार्बोहायड्रेट म्हणजेच कर्बोदके यांना आपण उगाचच गुन्हेगार असल्यासारखे वागवतो. मध्यंतरी हाय प्रोटिनचे स्तोम माजले होते, पण लक्षात घ्या कर्बोदके जर कमी पडली तर मुलांना थकल्यासारखे होते, एनर्जी नसणे असे त्रास होऊ शकतात. म्हणूनच प्रोटिनबरोबरच कार्बोहायड्रेटचे प्रमाणसुद्धा व्यवस्थित असणे आवश्यक आहे.
३. म्हणजे आपण डबा ठरवताना असा विचार करू शकतो की मुख्य भाग कर्बोदकांचा त्यानंतर व्हिटॅमिन मिनरल्स आणि फायबर्स असणाऱ्या भाज्या आणि त्यानंतर बरोबरीने एक भाग प्रोटिनचा.
४. आपल्या डब्यामध्ये दोन पोळ्या आणि भाजी असा आहार असतो. मग यामध्ये आपण प्रोटिन वाढवलं तर मुलं डबा पूर्ण संपवणार नाहीत, कारण डबा जास्त होईल असं वाटतं. त्यामुळे दोनऐवजी एक पोळी आणि भाजी द्या. आणि एक भाग डाळींचा किंवा पनीरचा किंवा दह्याचा असा द्या.

५. दह्यामध्ये प्रोटिनसोबतच पचनासाठी अत्यंत आवश्यक असणारे प्रोबायोटिक्स असतात. त्यामुळे मुलांची पचनशक्ती सुधारून त्यांचा गट फ्लोरा चांगला राहू शकतो.
६. आता जर काही मुलांना डाळी आणि दही आवडत नसेल तर ते वेगळ्या फॉर्ममध्ये कसं द्यायचं याचा विचार करायला हवा. म्हणजे मग तुम्ही कणकेमध्ये दही मिक्स करू शकता. डाळीचे पीठ कणकेत मिक्स करून त्याच्या पोळ्या करा. डाळ घालून भाज्या करा.
७. शॉर्ट टिफिनमध्येसुद्धा तुम्ही चिवडा दिलात तर त्यामध्ये डाळ्या किंवा डाळवं जास्त, फुटाणे जास्त घाला. वा त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला. त्यातलं प्रोटिन वाढवू शकता. लक्षात घ्या फक्त कर्बोदके देऊन मुलांची एनर्जी मेंटेन होऊ शकते; परंतु त्यामध्ये प्रोटिनचा समावेश केला तरच मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो.
८. याबरोबरच सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन. पाणी मुलं किती पितात ते पाहा. बऱ्याच वेळा मुलं घरी आल्यानंतर लक्षात येतं की त्यांची पाण्याची बाटली तशीच भरलेली आहे. त्याकडे लक्ष देऊन त्यांना समजावून सांगायला हवं की, प्रमाणात पाणी पिणं किती गरजेचं आहे.

जंकफूडचा धोका

आपल्याकडे छोट्या ब्रेकसाठी दिलेल्या डब्यात जंकफूड अनेक मुलांना दिले जाते. पॅकेट फूडही अत्यंत वाईट. त्यामध्ये चव निर्माण करण्यासाठी विविध विषारी रंग आणि केमिकलचा वापर केलेला असतो. ते आकर्षक दिसावे आणि कुरकुरीत राहावे म्हणून त्यात अमोनिया गॅसचा वापर केला जातो. जे लहान मुलांच्या लिव्हरसाठी अत्यंत घातक असते. आजकाल मुलांचे बैठे काम अभ्यासामुळे वाढलेले असल्यामुळे मुलांच्या मनावर अतिरिक्त तणाव दिसून येतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये स्थूलता खूपच वाढली आहे. मुलांनी भरपूर खेळायला हवंच; पण मुलं स्पोर्ट्समध्ये असतील तर मात्र त्यांचा आहार चौरस असणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर त्यांना अशक्तपणा येऊन त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. एकंदरीतच मुले अनुकरणप्रिय असल्यामुळे पालकांनी स्वतःच्या वागणुकीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. किराणा सामान आणतानाच पॅकेट फूड अनेक घरात आणले जाते. ते बंद करायला हवे.

मंजिरी कुलकर्णी, (आहारतज्ज्ञ)
durvamanjiri@gmail.com

Web Title: Kids School Lunch Box Simple ways to add more nutrition to your kids' lunch box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.