वय लहान असलं की, मुलांच्या शरीरासोबत उंची वाढणे, केसांची वाढ होणे यांसारखे शारीरिक बदल होत असतात.(kids white hair issue) सध्या केसांच्या समस्यांना प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला सामोरे जावे लागत आहे. पण जर लहानपणी केस पांढरे होऊ लागले तर?.(Hair falls problem) सध्या ८ ते १० वर्षांच्या मुलांचे केस प्रचंड गळतात, अकाली केसही पिकतात.(premature white hair) पांढरे केस किंवा केसगळती हा वाढत्या वयाचा परिणाम आहे, पण जेव्हा लहानग्यांमध्ये हे दिसू लागतं तेव्हा यामागचं कारण शोधणं गरजेचं ठरतं. डॉक्टर सांगतात यामागचे कारण अनहेल्दी पदार्थ, वाढलेला स्क्रीन टाइम आणि केसांची योग्य निगा न राखणं. जाणून घेऊया पालकांनी काळजी कशी घ्यायला हवी. (hair loss treatment for kids)
मुले ऐकत नाहीत- हट्टी झाली, सतत उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचं पटेल छान
1. डॉक्टर म्हणतात मुलांना आवश्यक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत नसतील तर त्याचे परिणाम त्यांच्या केसांवर आणि त्वचेवर दिसून येतात. व्हिटॅमिन बी १२, लोह, तांबे, जस्त आणि प्रथिने यांची कमतरता केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरतात.
2. जर पालकांपैकी घरात एकाचेही लहानपणी केस पांढरे असतील तर ही समस्या मुलांमध्ये असू शकते. याला अनुवांशिकता असं म्हणतात. कमी वयातच मुलांना अभ्यासाचा जास्त ताण घ्यावा लागतो. जास्त स्क्रीन टाइम किंवा इतर गोष्टींची ताण सहन करावा लागतो. यामुळे ताण वाढतो आणि झोपेचा अभाव होतो. ज्यामुळे केस पांढरे होतात.
3. हार्मोन्स असंतुलित होणे, थायरॉईड सारख्या हार्मोनल समस्यांमुळे देखील केस पांढरे होऊ शकतात. याव्यतिरिक्त कमी वयात पालक मुलांच्या केसांवर केमिकल्स असणारे शाम्पू वापरतात. यामुळे केसांचा नैसर्गिक रंग देखील लवकर खराब होतो.
4. कमी वयात मुलांचे अकाली केस पिकत असतील तर पालकांनी मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी रोजच्या आहारात दूध, अंडी, हिरव्या भाज्या, डाळी, काजू आणि फळे यांचा समावेश करा. मुलांना वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. ज्यामुळे त्यांची झोप पूर्ण होईल. मोबाईल आणि इतर स्क्रीन टाइम त्यांचा सेट करा. त्यांच्या केसांसाठी सौम्य किंवा रसायनमुक्त शाम्पूचा वापर करा. याशिवाय केस खूप लवकर पांढरे होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Web Summary : Early graying and hair fall in children are concerning. Doctors cite poor diet, excessive screen time, and inadequate hair care as key reasons. Vitamin deficiencies, genetics, hormonal imbalances, and harsh shampoos can also contribute. Parents should focus on nutritious food, regulate sleep and screen time, and use mild shampoos.
Web Summary : बच्चों में कम उम्र में बाल झड़ना और सफेद होना चिंताजनक है। डॉक्टर खराब आहार, अत्यधिक स्क्रीन समय और अपर्याप्त बालों की देखभाल को मुख्य कारण बताते हैं। विटामिन की कमी, आनुवंशिकी, हार्मोनल असंतुलन और कठोर शैंपू भी योगदान कर सकते हैं। माता-पिता को पौष्टिक भोजन पर ध्यान देना चाहिए, नींद और स्क्रीन समय को विनियमित करना चाहिए और हल्के शैंपू का उपयोग करना चाहिए।