Lokmat Sakhi >Parenting > एवढूशा लेकानं आईला वाढला नाश्ता.. करिना कपूरची व्हायरल पोस्ट, जेहची तारीफ करत म्हणाली...

एवढूशा लेकानं आईला वाढला नाश्ता.. करिना कपूरची व्हायरल पोस्ट, जेहची तारीफ करत म्हणाली...

Kareena Kapoor's Sunday Breakfast Was Served By Son Jeh : करीना कपूर आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करते सांगते गोष्ट मायलेकाच्या प्रेमाची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 03:10 PM2023-04-25T15:10:14+5:302023-04-25T15:24:26+5:30

Kareena Kapoor's Sunday Breakfast Was Served By Son Jeh : करीना कपूर आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करते सांगते गोष्ट मायलेकाच्या प्रेमाची...

Kareena Kapoor's Sunday Breakfast Was Served By Son Jeh | एवढूशा लेकानं आईला वाढला नाश्ता.. करिना कपूरची व्हायरल पोस्ट, जेहची तारीफ करत म्हणाली...

एवढूशा लेकानं आईला वाढला नाश्ता.. करिना कपूरची व्हायरल पोस्ट, जेहची तारीफ करत म्हणाली...

झिरो फिगरसाठी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली बेबो नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या अ‍ॅक्टिव्हिटीसह तिच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. करीना कपूर सोशल मीडियावर मुलगा तैमूर आणि जेह यांचे फोटोज, व्हिडीओज अपलोड करत असते. करीनाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मुलगा जहांगीर अली खान याने रविवारचा नाश्ता सर्व्ह करत असतानाचे फोटोज शेअर  केले आहे. करीना कपूर आपल्या मुलांना खूप वेळ देते. अशा परिस्थितीत त्यांची मुलेही त्यांच्या आईची काळजी घेतात. याचा एक नमुना समोर आला आहे. ज्यामध्ये जेह त्याच्या आईसाठी नाश्ता करताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अलीकडेच त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा जहांगीर नाश्ता करतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून यूजर्स जहांगीरवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत(Kareena Kapoor's Sunday Breakfast Was Served By Son Jeh).

नेमकं जेहने काय केलं.... 

करिनाच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, तिचा मुलगा जेह (जहांगीर अली खान) जमिनीवर बसून नाश्ता सर्व्ह करतांना दिसत आहे. या पोस्टमध्ये, एका मोठ्या ट्रे मध्ये काचेच्या बशीत पोहे दिसत आहेत. त्यासोबत एका मगमध्ये कॉफी ठेवलेली आहे. पोह्यांसोबत खाण्यासाठी लिंबाची फोड व हिरवी चटणी एका छोट्या वाटीत वाढलेली दिसत आहे. प्लेटमध्ये नाश्ता सर्व्ह करताना जेह खूप गोंडस दिसत आहे. या छानशा फोटोला करीनाने साजेसे असे कॅप्शनदेखील दिले आहे. कॅप्शन देताना करीना म्हणते, हा रविवारचा नाश्ता माझ्या जेह बाबाने मला सर्व्ह केला आहे. या कॅप्शनसह पोस्ट केला आणि लाल हार्ट इमोजी देखील शेअर केला. चित्रात जेह निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाची शॉर्ट्स घातलेला दिसत आहे. करीना कपूरला टशन चित्रपटासाठी झिरो फिगर मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी देखील या क्युट जेह ची पोस्ट शेअर केली आहे.  

मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? ८ टिप्स - मोबाइलशिवाय मुले जेवत झोपत नाही ही तक्रार संपेल...

कुटुंबासोबत केनियाची सुट्टी साजरी करून करीना परतली... 

करीना नुकतीच आपल्या कुटुंबासोबत केनियात सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत तिचा पती आणि अभिनेता सैफ अली खान, तैमूर खान आणि जेह होते.करिनाच्या या ट्रिपचे अनेक फोटो सोशल मीडियावर सध्या भरपूर व्हायरल होत आहे.

Web Title: Kareena Kapoor's Sunday Breakfast Was Served By Son Jeh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.