कौन बनेगा करोडपती १७ च्या या टीव्ही शोमध्ये सध्या ज्युनियर्स मुलांनी धुमाकूळ घातला आहे.(junior kbc ishit bhatt sparkshow) लेटेस्ट एपिसोडमध्ये पाचवीतील विद्यार्थी इशित भट यांच्या खेळाने केवळ मनोरंजनच नाही तर मुलांच्या वागण्यावर प्रकाश टाकण्यात आला.(how to deal with stubborn kids) आपली मुलं हुशार, नेहमीच पुढे असायला हवी. असं पालकांना वाटतं.(parenting tips for discipline) पण बरेचदा अतिउत्साहामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. केवळ ज्ञान पुरेसे नाही तर मुल्ये संयम देखील तितकेच महत्त्वाचे आहे. (how to control rude children)
टीव्ही शो ज्युनियर कौन बनेगा करोडपतीचा अलीकडील एपिसोड सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला.(parenting mistakes to avoid) इशित भटच्या वागण्यामुळे पालकत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले.(discipline techniques for kids) आजच्या मुलांना केवळ ज्ञानच नाही तर पालकांनी संयम शिकवणं देखील महत्त्वाच आहे. कधी कधी अतिआत्मविश्वासामुळे मुलांचे नुकसान होते.
मुलांचं मोबाइलचं व्यसन सोडवणाऱ्या ७ गोष्टी; मुलं मोबाइल हातातून खालीच ठेवत नसतील तर काय कराल?
1. संयम हा असा गुण आहे जो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडतो. मग तो परीक्षा असो, स्पर्धा असो किंवा नातेसंबंध असतो. मुलांना संयम शिकवायला हवा. पालकांनी मुलांना शिस्त लावण्यासाठी या ५ गोष्टी लक्षात ठेवा.
2. पालक जे करतात तेच मुलं करतात. पालकांना पाहून मुले शिकतात. जर तुम्ही शांत राहून इतरांचे ऐकले तर तुमचे मुलही तेच शिकतील.
3. मुलांना शिकवा की सर्वकाही लगेच मिळणार नाही. काही गोष्टींसाठी मुलांना वाट पाहायला शिकवा. मुलांना प्रत्येक गोष्ट हट्ट करुन मिळाल्यावर त्यांना त्या गोष्टीची किंमत उरत नाही.
4. मुलांना काही नैतिकचे किंवा व्यावहारिकतेचे धडे द्या. ज्यामुळे त्यांना संयम कसा राखावा याविषयी समजेल. खेळताना मुलांना असे काही गेम्स शिकवा ज्यामुळे त्यांना जिंकण्याची वाट पाहावी लागेल. ज्याच्यामुळे मुले संयम राखतील.
5. मुलांना प्रत्येक गोष्टीत फटकारण्याऐवजी त्यांना हळुवारपणे समजावून सांगा. सकारात्मक संवाद मुलांना लवकर शिकण्यास मदत करतात. ज्ञानासोबत मुलांचे वर्तन देखील खूप महत्त्वाचे आहे. मोठ्यांचे ऐकून घेणे आणि त्यांचे ऐकायला लावणे याकडे लक्ष द्या. जर मुलं जास्त प्रमाणात स्क्रीन टाइम बघत असतील तर ते काय पाहतात. याकडे पालकांनी लक्ष द्या. मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यात पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते.