प्रत्येक पालकांना आपल्या मुलाने आयुष्यात यशस्वी व्हावं, आत्मविश्वासाने निर्णय घ्यावेत आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहावं असं मनापासून वाटत असतं. मात्र केवळ अभ्यासात हुशार असणं पुरेसं नसतं; मुलांमध्ये शिस्त, जबाबदारीची भावना, सहकार्याची सवय आणि स्वावलंबी विचारसरणी विकसित होणं तितकंच गरजेचं असतं. आजच्या डिजिटल युगात मुलं आई - वडिलांवर अधिक अवलंबून आणि कमी संयमी होत चालली आहेत, त्यामुळे योग्य पॅरेंटिंग पद्धतीची निवड करणे सध्याच्या पालकांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. याउलट, जपानी पॅरेंटिंग हे जगभरात एक आदर्श पॅरेंटिंग म्हणून ओळखलं जात. जपानमध्ये मुलांना लहानपणापासूनच स्वयंशिस्त, वेळेचं महत्त्व, समूहात एकत्रित काम करण्याची सवय आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची शिकवण दिली जाते. विशेष म्हणजे, तिथे मुलांना केवळ नियम शिकवले जात नाहीत, तर अनुभवातून शिकण्याची संधी दिली जाते. त्यामुळे ही मुलं आत्मविश्वासी, संवेदनशील आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होतात(Japanese parenting techniques for kids).
जर तुम्हालाही तुमच्या मुलांमध्ये लहानपणापासू.नच चांगल्या सवयी रुजवायच्या असतील, त्याला स्वावलंबी, समजूतदार आणि तल्लख बनवायचं असेल, तर जपानी पॅरेंटिंगमधील काही सोप्या (Japanese parenting rules for smart kids) पण अत्यंत उपयुक्त टिप्स आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर असणाऱ्या (Japanese parenting tips) जपानी पॅरेंटिंगच्या खास ५ टिप्स नेमक्या कोणत्या ते पाहूयात...
जपानी पॅरेंटिंगच्या ५ खास टिप्स...
१. जबाबदारी शिकवा :- मुलांना त्यांची स्वतःची छोटी - मोठी कामे स्वतः करू द्या आणि शिकू द्या. यामुळे मुल आपली कामे स्वतः करण्यास सुरुवात करेल, जसे की, आपली प्लेट उचलून किचनमध्ये ठेवणे, स्वतः पाणी पिणे, हात धुणे, कपडे घालणे यांसारखी साधीसोपी कामे. जबाबदारीची कामं केल्याने मुलांचा आत्मविश्वासही वाढतो.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज खा १ वाटी 'हा' पदार्थ, स्मार्ट डाएट, हेल्दी हार्ट...
२. स्वातंत्र्य द्या :- लहान - मोठ्या समस्या मुलांना स्वतः सोडवू द्या. प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप केल्यास मूल पूर्णपणे पालकांवर अवलंबून राहते आणि अडचण आली की स्वतः विचार करण्याऐवजी लगेच पालकांकडे धाव घेते. प्रत्येक अडचणीतून मुलांना वाचवणे म्हणजेच प्रेम नसते; उलट त्यातून शिकण्याची संधी देणे अधिक महत्त्वाचे असते.
३. डेली फिक्स रूटीन ठेवा :- मुलांच्या प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य डेली रुटीन ठरवा. दिवसभरातील झोपणे, खाणे, पिणे, खेळणे, बाहेर जाणे या सर्व गोष्टी ठराविक वेळेनुसारच व्हायला हव्यात. डेली फिक्स रूटीन ठरवल्यामुळे मुले त्यानुसार स्वतःला जुळवून घेतात आणि मग त्यानुसार वागायला शिकतात. यामुळे मुलांचा हट्टी स्वभाव आणि चिडचिडही कमी होते.
काचेसारखे चमचमणारे केस हवेत? ‘असं’ बनवा अळशीचं नॅचरल हेअर जेल-महागड्या स्पापेक्षा भारी....
४. भावना (इमोशन्स) समजावून सांगा :- मुलांना त्यांच्या भावना ओळखायला आणि व्यक्त करायला शिकवा. जर मूल रडत असेल, तर त्याला शांतपणे समजावून सांगा की ते नेमकं कोणत्या कारणामुळे नाराज किंवा दुःखी आहे आणि त्यावर उपाय नेमका काय असू शकतो. यामुळे मुलांना आनंद आणि दुःख यातील फरक समजतो तसेच स्वतःच्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करण्याची सवय लागते.
५. ओरडणे नाही, शिकवणे महत्त्वाचे :- मुलांनी चूक केल्यावर त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा प्रेमाने समजावून सांगणे अधिक गरजेचे असते. रागावून किंवा मोठ्याने बोलल्याने मुलं घाबरतात, पण शांतपणे समजावल्यास त्यांना आपली चूक समजते आणि ती पुन्हा न करण्याची सवय लागते. सकारात्मक पद्धतीने शिकवल्यास मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि पालक-मुलांमधील नातेसंबंधही अधिक मजबूत होतात. मुलांच्या कोणत्याही चुकीवर ओरडण्यापेक्षा त्याला प्रेमाने समजावून सांगणे केव्हाही अधिक चांगले असते.
