हवामानात बदल झाल्यावर मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ लागतो. पण जेव्हा बाळ आजारी असतं, तेव्हा आई-वडिलांना प्रत्येक गोष्टींची चिंता सतावते.(Banana during cold and cough for kids) मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्याला बरेच सल्ले ऐकायला मिळतात.(Should kids eat banana when sick) अनेकजण सांगतात मुलांना ताप, सर्दी किंवा खोकला आल्यानंतर थंड पदार्थ, केळी देऊ नका.(Banana and cold myth) पण हे खरे आहे का? जाणून घेऊया डॉक्टरांकडून (Foods to avoid in cold and cough for children)प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ पुनीत आनंद म्हणतात, सर्दी किंवा ताप आल्यानंतर मुलांना केळी देणे हानिकारक आहे.(Doctor advice banana cold cough) खरं तर केळी शरीरासाठी फायदेशीर आहे. केळीमध्ये व्हिटॅमिन बी ६, पोटॅशियम आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात.(Kids health banana myth) हे सर्व पोषक तत्व मुलांच्या शरीरातील पेशी दुरुस्त करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात.
वेट वाइप्समुळे त्वचा खराब- सुरकुत्या? मेकअप रिमूव्ह करताना 'या' चुका टाळा- त्वचेचा कोरडेपणा होईल कमी
अनेकजण असं म्हणतात की मुलांना सर्दी- खोकला झाल्यावर दही देखील देऊ नये. पण डॉक्टरांच्या मते दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया मजबूत करतात. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती आतड्यांमधून येते. म्हणून मुलांचे आतडे निरोगी असणं फायदेशीर आहे. त्यामुळे सर्दी असल्यावरही कमी प्रमाणात मुलांना दही देऊ शकता.
डॉक्टर म्हणतात केळी आणि दही कधीही थंडगार मुलांना देऊ नका. ते खोलीच्या तापमानावर असायला हवे. रेफ्रिजरेटरमध्ये थंड फळे किंवा दही खाणे योग्य नाही. कारण यामुळे घसा खवखवणे किंवा खोकला वाढू शकतो. यामुळे सर्दी- खोकला झाल्यानंतरही मुलांना केळी किंवा दही देणे हानिकारक नाही. हे दोन्ही पदार्थ तुमच्या मुलाची प्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि पोषण प्रदान करण्यास मदत करू शकतात.
Web Summary : Giving bananas and yogurt to kids with a cold or cough is safe if served at room temperature. Doctor says they boost immunity and provide nutrition, contrary to common belief.
Web Summary : सर्दी-खांसी होने पर बच्चों को केला और दही कमरे के तापमान पर देना सुरक्षित है। डॉक्टर कहते हैं कि ये रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाते हैं और पोषण प्रदान करते हैं, जो कि आम धारणा के विपरीत है।