Join us
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांसाठी चपाती चांगली की भाकरी? डॉक्टरांचा सल्ला- मुलांच्या वाढीसाठी काय जास्त चांगलं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2025 14:11 IST

Chapati vs Bhakri for kids: Healthy Indian foods for children: चपाती, भाकरी, भाज्या कधी खाऊ घालाव्यात असे अनेक प्रश्न पालकांना सतावत असतात.

भारतातील विविध भागात चपाती, भाकरी खाल्ली जाते. काही ठिकाणी गव्हाची चपाती रोज असते तर काही ठिकाणी भाकरी.(Chapati vs Bhakri for kids) पण पालकांना लहान मुलांच्या आहाराबद्दल अनेक प्रश्न असतात. कोणत्या वयात काय खायला घालायला हवे.(Healthy Indian foods for children) कोणते पदार्थ टाळायला हवे. चपाती, भाकरी, भाज्या कधी खाऊ घालाव्यात असे अनेक प्रश्न पालकांना सतावत असतात. चपाती आणि भाकरी बाळाच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे.(Best food for child growth) पण विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत, त्यांचे पचन, त्यांच्या वाढीचा वेग, दिवसभरातील ऊर्जा आणि आहाराची आवड यांचा नीट विचार करणे गरजेचे असते.(Chapati benefits for kids) याविषयी प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप गुप्ता यांनी माहिती दिली आहे. 

ना भिजवण्याचे टेन्शन, ना आंबवण्याची झंझट! १० मिनिटांत करा कुरकुरीत हिरव्या मुगाचा डोसा, पौष्टिक रेसिपी

डॉक्टर सांगतात की पहिल्या सहा ते आठ महिन्यांत बाळांना डाळ, भात किंवा भाज्यांची प्युरी खायला द्यावी. जेव्हा बाळ पूर्णपणे आठ महिन्यांचे होते. तेव्हा चपाती खाऊ घालावी. पण चपाती खाऊ घालताना त्यांना डाळ, भाजी किंवा दुधात भिजवून मॅश करुन खाऊ घाला. चपाती जितकी मऊ असेल तितक्या लवकर मुलांना पचायला हलकी जाईल. 

चपातीमध्ये भरपूर फायबर असते. मसुर डाळ किंवा दुधासोबत खाल्ल्याने बाळाला संतुलित पोषण मिळते. फक्त चपाती मऊ आणि मॅश करुन बाळाला खाऊ घाला. तसेच डॉक्टरांच्या मते, मुलांचे पचन आणि भूक ही प्रक्रिया त्याच्या वयाप्रमाणे बदलते. त्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी यांमध्ये विविध प्रकारचे फायबर, कॅल्शियम, प्रोटीन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे रोजच्या आहारात विविध पदार्थ असायला हवे. ज्यामुळे मुलांना चांगले पोषण मिळेल. त्यांची बुद्धी तल्लख होईल. पण तज्ज्ञ सांगतात की अशा एकाच प्रकारच्या आहाराने काही वेळा मुलांमध्ये पोषणातील कमतरताही दिसू शकते.

मुलांना चपाती-भाकरी किती प्रमाणात द्यावी हा देखील मोठा प्रश्न असतो. काही पालक मुलांनी एक-दोन घास खाल्ले की जबरदस्ती जेवू घालतात. तर काही मुलांना भूक लागली म्हणून सतत चपाती देतात. या सगळ्यात मुलाच्या शरीराच्या खऱ्या गरजा कधी समजून घेतल्या जात नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Chapati or Bhakri for kids: Doctor's advice for growth

Web Summary : For children's growth, doctors recommend introducing chapati around eight months, mashed with dal or milk for easy digestion. Prioritize varied grains for balanced nutrition, avoiding forced feeding. Understanding a child's needs is crucial.
टॅग्स :पालकत्वलहान मुलंअन्न