आजच्या स्पर्धेच्या युगात, प्रत्येक पालकांना असे वाटते की, आपल्या मुलाने अभ्यासात हुशार असावे आणि कायम व्यवस्थित अभ्यास करावा. मुलांचे भविष्य घडवण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा असतो, हे खरे आहे; पण अनेक घरांमध्ये अभ्यासाची वेळ आली की स्ट्रेस, चिडचिड आणि वादावाद सुरू होतात. मुलांना अभ्यास करायला लावणे हे अनेक पालकांसाठी एक मोठे आव्हानच असते. मुलांचा अभ्यास म्हटलं की बहुतांश पालकांसाठी ती एक मोठी डोकेदुखीच असते. मुलं अभ्यासाला बसत नाहीत, लक्ष केंद्रीत करत नाहीत किंवा थोड्याच वेळात कंटाळा येतो, अशा एक ना अनेक तक्रारी जवळपास प्रत्येक घरात ऐकू येतात. अनेक पालक अशा (peaceful parenting for homework success) परिस्थितीत रागाने बोलतात, ओरडतात, काहीवेळा मुलांना मारतातही. पण यामुळे मुलांचा अभ्यासामधील रस कमी होतो आणि भीतीमुळे ते अभ्यास करण्यापासून आणखी दूर जातात(5 ways to teach your kids without yelling or hitting so they’ll happily finish their homework).
प्रत्यक्षात मुलांकडून अभ्यास करून घेण्यासाठी मारणे, ओरडणे किंवा धमकावणे हा उपाय नसतो. उलट थोड्या हुशारीने आणि संयमाने त्यांना अभ्यासाची सवय लावता येते. मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करून त्यांना स्वतःचा स्वतः अभ्यास करायला शिकवणे, यासाठी काही खास उपाय प्रत्येक पालकासाठी उपयोगी ठरतील. पॅरेंटिंग कोच पुष्पा शर्मा यांनी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्सचा वापर केल्यास पालक मुलांच्या अभ्यासाला सोपे आणि मजेदार करु शकतात. या उपायांमुळे मूल आनंदाने आपला अभ्यास पूर्ण करेल.
अभ्यास करताना मुलांना ओरडणे - मारणे का टाळावे ?
पॅरेंटिंग कोच पुष्पा शर्मा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे की, मुलांना अभ्यास शिकवताना अनेकदा असे होते की, जर मुलांना समजून घ्यायला वेळ लागला किंवा एखादी गोष्ट त्याला कळली नाही, तर अनेक पालक आपला संयम सोडतात. परिणामी, ते मुलांवर ओरडू लागतात किंवा काहीवेळा मारतातही. याचा दुष्परिणाम असा होतो की, मूल अभ्यासाला घाबरू लागते आणि अभ्यासाचे नाव काढताच पळून जाते. अशी नकारात्मक परिस्थिती टाळण्यासाठी पालक काही टिप्स फॉलो करू शकतात. त्या पुढे सांगतात की, या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही मुलांच्या अभ्यासाला अधिक इंटरेस्टिंग बनवू शकता आणि त्यांना न मारता किंवा न ओरडता व्यवस्थित शिकवू शकता.
मुलांना न ओरडता - मारता अभ्यास करुन घेण्याच्या ट्रिक्स...
१. अभ्यासाचे लहान भागांमध्ये विभाजन करा :- तज्ज्ञ सांगतात की, एकाच वेळी खूप वेळ किंवा खूप जास्त अभ्यास मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी, अभ्यासाचे लहान - लहान भागांमध्ये विभाजन करा. आता, जेव्हा मूल एखादे काम पूर्ण करेल, तेव्हा त्याचे कौतुक नक्की करा. यामुळे मूल अधिक आनंदी व उत्साही होऊन अभ्यास करेल आणि त्याचे अभ्यास करण्यामध्ये मन रमेल.
२. अभ्यासाचे निश्चित वेळापत्रक तयार करा :- पॅरेंटिंग कोच यांचे म्हणणे आहे की, मुलांसाठी अभ्यासाचे एक निश्चित वेळापत्रक तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु, हे वेळापत्रक केवळ अभ्यासापुरतेच मर्यादित नसावे. एक उत्तम वेळापत्रक असे असले पाहिजे, ज्यात अभ्यासासोबतच खेळण्यासाठी आणि फ्री टाइमचा देखील समावेश असेल. असे संतुलित वेळापत्रक मुलांना वेळेचे व्यवस्थापन शिकवते आणि स्ट्रेसपासून दूर राहून अभ्यासात मन लागण्यास मदत करते.
३. अभ्यासाच्या वेळी पालकांनीही हातात फोन घेऊ नये :- पॅरेंटिंग कोच पुष्पा शर्मा म्हणतात की, जेव्हा मूल अभ्यास करत असेल, तेव्हा त्याच्या आजूबाजूला टीव्ही किंवा मोबाईल नसावा. त्याचबरोबर, अभ्यासाच्या वेळी पालकांच्या हातातही मोबाईल अजिबात नसावा. मुलांसाठी अशी जागा निवडा, जिथे कोणत्याही प्रकारचे लक्ष विचलित होणार नाही. यामुळे मूल पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेल. पालकांनी स्वतः मोबाईल टाळल्यास मुलांसमोर एक चांगला आदर्श तयार होतो आणि अभ्यासाचे वातावरण शांत व सकारात्मक राहते.
४. मुलांचे कौतुक करा :- जर मुलांनी अभ्यासादरम्यान काही चांगले केले किंवा एखादे छोटे काम पूर्ण केले, तर त्यांचे कौतुक करा आणि त्यांना बक्षीस नक्की द्या. यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळते आणि ते अधिक उत्साहाने अभ्यास करतात.
५. मूल न घाबरता प्रश्न विचारेल याची काळजी घ्या :- पॅरेंटिंग कोच सांगतात की, मुले चुका करणारच आणि एका वेळी सर्व काही शिकणार नाहीत. परंतु, या दरम्यान पालकांनी आपला संयम गमावता कामा नये. जेव्हा कधी मूल एखादा प्रश्न किंवा शंका विचारेल, तेव्हा प्रत्येक वेळी शांतपणे त्याला उत्तर द्या. असे केल्याने, मूल पुढील वेळीही न घाबरता तुमच्याशी संवाद साधेल आणि प्रश्न विचारू शकेल. मुलाला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य दिल्याने त्याची शिकण्याची प्रक्रिया सुलभ होते आणि त्याचा अभ्यासातील आत्मविश्वास वाढतो.
Web Summary : Tired of homework battles? Expert tips suggest breaking down study sessions, creating schedules with playtime, avoiding distractions, praising efforts, and encouraging questions. Build confidence and interest in learning without yelling.
Web Summary : होमवर्क की लड़ाई से थक गए हैं? विशेषज्ञ सुझाव देते हैं कि अध्ययन सत्रों को तोड़ें, खेलने के समय के साथ कार्यक्रम बनाएं, विकर्षणों से बचें, प्रयासों की प्रशंसा करें और सवालों को प्रोत्साहित करें। बिना डांटे सीखने में आत्मविश्वास और रुचि पैदा करें।