Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचं मोबाइलचं व्यसन सोडवणाऱ्या ७ गोष्टी; मुलं मोबाइल हातातून खालीच ठेवत नसतील तर काय कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2025 14:26 IST

October Cyber Security Awareness Month: mobile addiction in children: kids phone usage control: How screen time affects children? कमी होतील डिजिटल जगातले गंभीर धोके

मुक्ता चैतन्य (संस्थापक, सायबर मैत्र)मुलांच्या डिजिटल वर्तनाकडे भिंगातून बघितलं नाही, तरी त्याकडे लक्ष असणं आवश्यक आहे.(how to reduce screen time kids) डिजिटल जगात त्यांचं जे काही सुरू असते त्याचे प्रत्यक्ष जगात काही परिणाम दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.(break smartphone addiction kids) कारण, त्यातून मुलांचे मानसिक त्रास कमी न होता वाढू शकतात.(parenting tips for mobile addiction) त्यामुळे रेड फ्लॅग्ज ओळखून योग्यवेळी पाऊल उचलणे आवश्यक आहे.(screen time management children) मोबाइलवर बंधन घालण्याऐवजी, विश्वास आणि संवादाच्या आधारावर त्यांचे डिजिटल जग अधिक सुरक्षित आणि संतुलित बनवण्याची जबाबदारी मोठ्यांच्या जगाकडे आहे. ती आपण अधिक सक्षमतेनं उचलायला हवी. आणि ते करण्याची जबाबदारी पालकांची आहे. (October- Cyber Security Awareness Month.)

मुले ऐकत नाहीत- हट्टी झाली, सतत उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचं पटेल छान

गेमिंगसाठी, चॅटिंगसाठी स्क्रीन टाइम वाढायला लागतो. शिक्षण, करमणूक, संवाद अशा अनेक गरजांसाठी मुलं स्क्रीनसमोर असतात. गेमिंगपासून डेटिंगपर्यंत मुलांच्या डिजिटल आयुष्यात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. त्यामुळे मुलांच्या हातून मोबाइलच काढून घेतल्यानं प्रश्न सुटणार नाहीत. तर पालकांना संवादाचे आणखी काही मार्ग शोधावे लागतील.

पालकांना काय करता येईल?

१. मुलांसोबत नियमित संवाद साधा. मागे न लागता, नॅगिंग न करता शांतपणे समजून घ्या, समजावून द्या.

२. मोबाइल किंवा कुठलाही स्क्रीन वापराच्या वेळा निश्चित करा. गेमिंग किती वेळ करायचं ते एकत्र बसून ठरवा आणि जे नियम ठरतील त्याचं पालन कुटुंबातील सगळे करतील याचा प्रयत्न करा.

३. फक्त मुलांना शिस्त आणि पालक-आजीआजोबा बेफाम असं असेल, तर मुलांना शिस्त लागणार नाही.

४. डिजिटल डिटॉक्सचे दिवस किंवा वेळा ठरवा – जसे की महिन्यातला एखादा रविवार.

५. रात्री किती वाजता मोबाइल बंद होईल त्याची कुटुंबाची वेळ जमल्यास ठरवा आणि पाळा.

६. मोबाइलऐवजी एकमेकांबरोबर अधिकाधिक वेळ घालावा. वाचन, खेळ, एकत्र जेवण, छंद यांच्यासाठी वेळ द्या.

७. मुलांना डिजिटल सुरक्षिततेविषयी आणि इंटरनेटच्या धोक्यांविषयी योग्य भाषेत माहिती द्या. त्यांना डिजिटल माध्यम शिक्षित करण्यासाठी प्रयत्नरत असा. मुलांना हे माध्यम वापरताना घेण्याची काळजी आणि धोके सतत समजावून सांगा. 

English
हिंदी सारांश
Web Title : 7 ways to break your child's mobile addiction.

Web Summary : Balance digital life through communication, rules, and family time. Set screen limits, promote digital safety awareness, and engage in offline activities. Parents should lead by example for effective discipline.
टॅग्स :पालकत्वलहान मुलं