Lokmat Sakhi >Parenting > अभ्यासाला बसताच खूप झोप येते? ७ गोष्टी करा- झोप पळून जाईल आणि भरपूर अभ्यास होईल 

अभ्यासाला बसताच खूप झोप येते? ७ गोष्टी करा- झोप पळून जाईल आणि भरपूर अभ्यास होईल 

7 Ways to Stay Awake While Studying: अभ्यासाला बसलं की बहुसंख्य विद्यार्थ्यांना झोप येते. असं होऊ नये म्हणून काय करावं पाहा..(How to get rid of sleepiness while studying?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 15:21 IST2025-02-11T15:19:35+5:302025-02-11T15:21:06+5:30

7 Ways to Stay Awake While Studying: अभ्यासाला बसलं की बहुसंख्य विद्यार्थ्यांना झोप येते. असं होऊ नये म्हणून काय करावं पाहा..(How to get rid of sleepiness while studying?)

How to stop falling asleep while studying, 7 Ways to Stay Awake While Studying, How to get rid of sleepiness while studying? | अभ्यासाला बसताच खूप झोप येते? ७ गोष्टी करा- झोप पळून जाईल आणि भरपूर अभ्यास होईल 

अभ्यासाला बसताच खूप झोप येते? ७ गोष्टी करा- झोप पळून जाईल आणि भरपूर अभ्यास होईल 

Highlightsएरवी रात्री ११- १२ वाजेपर्यंत हसतखेळत जागणारे कित्येक विद्यार्थी परीक्षेच्या दिवसांत मात्र रात्री ९- १० वाजताच डुलक्या घेऊ लागतात.

१२ वीच्या परीक्षांना नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता पुढच्या काही दिवसांतच दहावीच्या परीक्षाही सुरू होतील. दहावीच्या परीक्षा संपत आल्या की मग लहान वर्गांच्या, पदवीधर विद्यार्थ्यांच्याही परीक्षा सुरू होतात. म्हणजेच काय तर आता परीक्षेचेच दिवस आहेत. आणि हे दिवस आले की विद्यार्थ्यांना झोपसुद्धा खूप येऊ लागते (How to stop falling asleep while studying?). एरवी रात्री ११- १२ वाजेपर्यंत हसतखेळत जागणारे कित्येक विद्यार्थी परीक्षेच्या दिवसांत मात्र रात्री ९- १० वाजताच डुलक्या घेऊ लागतात (7 Ways to Stay Awake While Studying). तुमचंही असंच होत असेल तर ऐन अभ्यासाच्यावेळी झोप येऊ नये म्हणून या काही गोष्टी करून पाहा..(How to get rid of sleepiness while studying?)

 

अभ्यासाला बसल्यानंतर झोप येऊ नये म्हणून उपाय

१. सगळ्यात आधी तर तुमच्या डोळ्यासमोर तुमचे उद्दिष्ट अगदी पक्के ठेवा. तुम्ही ही परीक्षा का देत आहात, परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे या गोष्टी आठवा. जेव्हा तुमचं ध्येय तुमच्या कायम डोळ्यासमोर राहील तेव्हा झोपेला डावलून तुम्ही ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकाल.

प्रेशर कुकरचा स्फोट का होतो? रोज कुकर वापरूनही बहुतांश महिलांना माहितीच नाहीत 'ही' कारणं 

२. अभ्यासाची जागा हवेशीर आणि स्वच्छ उजेड येणारी असावी. खूप कोंदट ठिकाणी, अंधाऱ्या वातावरणात बसून अभ्यास करू नका. त्यामुळे झोप येऊ शकतो. शक्यतो खिडकीच्या शेजारी तुमचा टेबल ठेवा आणि तिथे अभ्यासाला बसा. झोप यायला लागली तर थोडं खिडकीच्या बाहेर पाहा.. पुन्हा फ्रेश वाटू लागेल. 

 

३. बेडवर, सोफ्यावर बसून वाचणे, अभ्यास करणे टाळावे. कारण तिथे बसून अभ्यास केल्यास झोप येण्याची खूप दाट शक्यता असते. कायम टेबल- खुर्चीवर बसूनच अभ्यास करा. 

प्रियांका चोप्राची वहिनी नीलमच्या खांद्यावर आले लालसर चट्टे- हळदीची झाली ॲलर्जी, डॉक्टर सांगतात....

४. रात्रीच्यावेळी अभ्यास करणार असाल तर अशा खोलीत बसू नका जिथे बाकीचे लोक झोपलेले असतील. हॉलमध्ये बसून किंवा गच्चीवर जाऊन अभ्यास करा.

५. परीक्षेच्या काळातही पुरेशी आणि शांत झोप घ्यायलाच हवी. तरच उरलेल्या वेळेत तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करू शकता.

 

६. पाण्याची बाटली, संत्र्याच्या किंवा इतर कोणत्या चघळायच्या गोळ्या, चॉकलेट जवळ ठेवा. जेव्हा झोप आल्यासारखे होईल तेव्हा पाणी प्या, चॉकलेट- गोळ्या खा. यामुळेही झोप बरीच कमी होईल.

स्टनिंग लूक देणारे ७ डिप नेक ब्लाऊज डिझाईन्स! साडी साधी असूनही दिसाल एकदम स्टायलिश

७. खूप झोप येत असल्यास कॉफी करून प्या. घरातल्या इतर सदस्यांना कॉफी करायला सांगण्यापेक्षा तुम्हीच उठा आणि कॉफी करा. कारण स्वत: कॉफी केल्यामुळे तुमचीही हालचाल होईल आणि झोप पळून जाईल. शिवाय कॉफीमधले घटकही तुमच्या अंगातला आळस, झोप घालविण्यास उपयुक्त ठरतील. 

 

Web Title: How to stop falling asleep while studying, 7 Ways to Stay Awake While Studying, How to get rid of sleepiness while studying?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.