Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > मुलांच्या हातांतून मोबाईल हिसकावून घेता, सतत ओरडता ? थांबा, ५ पर्याय - मुलांचा स्क्रीन टाईम होईल कमी...

मुलांच्या हातांतून मोबाईल हिसकावून घेता, सतत ओरडता ? थांबा, ५ पर्याय - मुलांचा स्क्रीन टाईम होईल कमी...

how to reduce screen time for kids : tips to decrease screen time of children : ways to reduce kids screen time : मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी किंवा स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी आरडाओरडा किंवा न मारता त्यांना कसे समजवावे ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2025 16:41 IST2025-11-10T16:39:36+5:302025-11-10T16:41:47+5:30

how to reduce screen time for kids : tips to decrease screen time of children : ways to reduce kids screen time : मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी किंवा स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी आरडाओरडा किंवा न मारता त्यांना कसे समजवावे ते पाहा...

how to reduce screen time for kids tips to decrease screen time of children ways to reduce kids screen time | मुलांच्या हातांतून मोबाईल हिसकावून घेता, सतत ओरडता ? थांबा, ५ पर्याय - मुलांचा स्क्रीन टाईम होईल कमी...

मुलांच्या हातांतून मोबाईल हिसकावून घेता, सतत ओरडता ? थांबा, ५ पर्याय - मुलांचा स्क्रीन टाईम होईल कमी...

आजच्या डिजिटल युगात, मोबाईल फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप हे फक्त मोठेच नव्हे, तर लहान मुलांच्या आयुष्याचाही अविभाज्य भाग बनले आहेत. आजकाल आपण प्रत्येक लहान मुलाच्या हाती मोबाईल फोन पाहतोच. मुलांना जर लहान वयातच सतत मोबाईल फोन पाहण्याची सवय लागली तर पुढे देखील ती सवय अंगवळणीच पडते. लहान मुलं तासंतास फोन पाहत बसतात, यूट्यूब, गेम्स किंवा व्हिडिओमध्ये गुंग होतात हे आता जवळपास प्रत्येक घरातलं चित्र झालं आहे. ही सवय मुलांच्या फक्त डोळ्यांसाठीच नव्हे, तर त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी देखील अत्यंत हानिकारक असते(ways to reduce kids screen time).

वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, अभ्यासात लक्ष न लागणे आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. मुलं सतत फोन किंवा लॅपटॉप पाहात बसली तर, अशावेळी मुलांच्या हातातून फोन हिसकावून घेणे हा यावरचा उपाय नाही. मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे किंवा स्क्रीनपासून त्यांना दूर करणे हा पालकांसाठी एक खूप मोठा चॅलेंजिंग टास्क असतो. सतत स्क्रीन पाहिल्यामुळे मुलांचे डोळे, मेंदू, झोप आणि वागण्या - बोलण्यावर देखील परिणाम होतो. अभ्यास, खेळ आणि संवाद या गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष होत. या गोष्टीची पालकांना काळजी वाटते, पण अनेकदा काय करावं हे समजत नाही. अशा वेळी काही सोपे, घरगुती आणि व्यावहारिक उपाय करून मुलांची ही स्क्रीनची सवय हळूहळू कमी करता येऊ शकते. मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी किंवा स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी आरडाओरडा (tips to decrease screen time of children) किंवा न मारता त्यांना कसे समजवावे ते पाहूयात. 

मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी उपाय... 

१. स्क्रीन टाईमची लिमिट सेट करा :- सर्वातआधी तुम्ही मुलांसाठी फोन पाहण्याची लिमिट सेट करा. लक्षात ठेवा, मुलांसाठी जास्तीत जास्त स्क्रीनटाईम (फोन, टीव्ही, टॅब हे सर्व मिळून) फक्त २ तास असायला हवा. मुलं जर स्क्रीन पाहात असतील तर मुलांकडून अचानक मोबाईल, लॅपटॉप हिसकावून घेऊ नका. त्याऐवजी, त्यांना प्रेमाने याचे नकारात्मक परिणाम समजावून सांगा.

२. तुम्हीच मुलांसाठी उत्तम उदाहरण सेट करा :- पालक हे लहान मुलांसाठी आदर्श असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही जसे वागाल, मुलेही तसेच शिकतील. पालकांनी स्वतः मुलांसमोर जास्त वेळ फोन वापरणे टाळावे. त्याऐवजी, तुम्ही मुलांसोबत खेळू शकता किंवा त्यांच्याशी गप्पा मारून तुमचा वेळ घालवू शकता.

रात्री मुलं सतत लघवीसाठी उठतात-गादी ओली करतात? असू शकतात ५ गंभीर समस्या, पाहा काय करायचं..

३. मोबाईलचे आमिष दाखवू नका :- अनेक पालक मुलांना असे आमिष देतात की, जर त्यांनी जेवण केले किंवा अभ्यास केला, तर त्यांना फोन वापरण्यासाठी मिळेल. यामुळे मुलांना मोबाईल फोन सतत पाहण्याची वाईट सवय लागू शकते. असे केल्याने, मुलांचे लक्ष जास्त वेळ फोन वापरण्याकडे केंद्रित होईल यासाठीच, मुलांना हे केलस तरच मोबाईल फोन देईन असे आमिष दाखवणे टाळा. 

४. मुलांसोबत वेळ घालवा :- अनेक पालक स्वतः इतर कामांमध्ये व्यस्त असतात आणि त्या कामात मुलांचा व्यत्यय किंवा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या हातात मोबाईल फोन देतात. ही सवय सर्वात जास्त चुकीची असू शकते. त्याऐवजी, तुम्ही मुलांना काही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी करायला सांगू शकता. याव्यतिरिक्त, जर तुमचे काम जास्त महत्त्वाचे नसेल, तर मुलांसोबतच वेळ घालवा आणि त्यांना एकटे सोडू नका. 

ट्युशन- क्लासेसचा भार मुलांवर कशाला, घरीही अभ्यास होईल सोपा-५ सोपे उपाय! लागेल अभ्यासाची गोडी!

५. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये बिझी ठेवा :- पालकांनी मुलांना आपल्यासोबतच इतर फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घ्यावे. जसे की, मैदानी खेळ, चित्रकला, हस्तकला, स्केटिंग, स्विमिंग शिकवावे. यामुळे मुलांचे शारीरिक आरोग्य चांगले राहील आणि मुले फिट देखील राहतील.

 

Web Title : बच्चों का स्क्रीन टाइम कम करें: डांटने के बजाय 5 विकल्प आजमाएं।

Web Summary : बच्चों का स्क्रीन टाइम कम करने और उनके स्वास्थ्य को बेहतर बनाने के लिए स्क्रीन टाइम सीमित करें, उदाहरण पेश करें, फोन के लालच से बचें, साथ समय बिताएं और शारीरिक गतिविधियों को प्रोत्साहित करें।

Web Title : Reduce kids' screen time: 5 alternatives to scolding, phone snatching.

Web Summary : Limit screen time, set examples, avoid phone rewards, spend time together, and encourage physical activities to reduce children's screen time and improve their well-being.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.