Lokmat Sakhi >Parenting > वळणदार, सुंदर अक्षरांसाठी मुलांना लावा 'या' सवयी, हाताला लागेल वळण- लवकर सुधारेल अक्षर

वळणदार, सुंदर अक्षरांसाठी मुलांना लावा 'या' सवयी, हाताला लागेल वळण- लवकर सुधारेल अक्षर

improve kids handwriting : beautiful handwriting tips: handwriting improvement habits: काही सोप्या सवयी मुलांना लावल्यास आठवड्याभरात त्यांच अक्षर काही प्रमाणात सुधारेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 14:13 IST2025-09-23T14:05:44+5:302025-09-23T14:13:15+5:30

improve kids handwriting : beautiful handwriting tips: handwriting improvement habits: काही सोप्या सवयी मुलांना लावल्यास आठवड्याभरात त्यांच अक्षर काही प्रमाणात सुधारेल.

how to make your child’s handwriting neat and curvy in one week simple habits to improve kids handwriting quickly | वळणदार, सुंदर अक्षरांसाठी मुलांना लावा 'या' सवयी, हाताला लागेल वळण- लवकर सुधारेल अक्षर

वळणदार, सुंदर अक्षरांसाठी मुलांना लावा 'या' सवयी, हाताला लागेल वळण- लवकर सुधारेल अक्षर

वाटोळे सरळ मोकळे..., सुंदर अक्षर हाच खरा दागिना..! असं आपण नेहमीच म्हणतो. अगं किती घाण तुझं अक्षर, तुला तरी समजतंय का? असे टोमणे आपण खूपदा ऐकली असतील.(improve kids handwriting) पाटीवर एकच अक्षर १० वेळा गिरवून देखील आपलं अक्षर काही सुधारत नाही.(beautiful handwriting tips) वाढत्या तंत्रज्ञानानुसार अक्षर कुठे तरी लोप पावली आहे. सतत स्क्रीन स्क्रोल करण्याच्या नादात आपण लिखाणाकडे फारशा प्रमाणात लक्ष देत नाही. (handwriting improvement habits)
खरंतर अक्षर हे फक्त शब्दच नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रतिबिंब असते.(neat and curvy letters) ज्या मुलांचे अक्षर वळणदार, नीटनेटके आणि स्वच्छ असते, त्यात स्वतःवर आत्मविश्वास दिसतो. अक्षरे फक्त कागदावरती रंगीत नाहीत, ती मनाच्या शिस्तीची, संयमाची आणि सौंदर्याची ओळख आहे.(kids writing skills) अनेकदा मुलांचा अभ्यास तोंडपाठ असतो पण खराब-घाणेरड्या अक्षरांमुळे त्यांनी नेमके काय लिहिलं हे समजतं नाही. ज्यामुळे मार्क्स देखील कमी पडतात.(tips for children to develop beautiful handwriting) मुलांच्या अक्षरावरुन पालकांना नेहमी ऐकावे लागते. पालक मुलांवर अक्षर वळणदार काढण्यासाठी दबाव देखील टाकतात. पण काही सोप्या सवयी मुलांना लावल्यास आठवड्याभरात त्यांच अक्षर काही प्रमाणात सुधारेल. 

आई-वडिलांच्या 'या' चुकांमुळे मुलांचा आत्मविश्वास होतो कमी, राहतात एकेकटे- स्वभावही होतो चिडखोर

वळणदार हस्ताक्षरासाठी मुलांची बसण्याची पोझिशन आणि ते पेन्सिल कसे धरतात यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यासाठी सगळ्यात आधी मुलांना अभ्यासाच्या टेबलावर सरळ बसून लिहिण्याचा सराव करायला द्या. त्यांना पेन्सिल योग्यरित्या कशी धरायची ते शिकवा. पेन्सिल नेहमी निबच्या वर थोडीशी धरायला सांगा. खूप लहान पेन्सिल वापरणे टाळा. चांगल्या हस्ताक्षरासाठी मुलांना नेहमी चांगली पेन्सिल द्या. त्यांना हळूहळू एक दोन पाने लिहिताना सराव करायला सांगा.

प्रत्येक मुलांची क्षमता वेगळी असते. त्यांचे हस्ताक्षर किती वेगाने सुधारते हे त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते.काही मुले  फक्त १० ते १५ दिवसांत अक्षर सुधारु शकतात.तर काही एक महिना तरी लागू शकतो. जितका जास्त सराव कराल तितके जास्त आणि लवकर अक्षर सुधारेल. 

मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी त्यांना पेन्सिल योग्यरित्या कशी धरायची ते शिकवा. सुरुवातीला काही ओळींचा वहीवर सराव करायला सांगा. शब्दातील अंतर समान ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या बोटांची पकड मजबूत करायला सांगा, ज्यामुळे मेंदूचा अधिक विकास होईल. रोज थोडा वेळ कागद आणि पेन घेऊन अभ्यास करणे, बोटांची हालचाल नियंत्रित करणे, अक्षरावर लक्ष ठेवणे. या सरावामुळे हाताला वळण येते, अक्षर नीटनेटके होते. 

Web Title: how to make your child’s handwriting neat and curvy in one week simple habits to improve kids handwriting quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.