मुलांचा अभ्यास घेणं किंवा त्यांना अभ्यासाला बसवणं म्हणजे पालकांसाठी मोठे कठीण कामचं. अनेक घरांमध्ये मुलांना अभ्यासाला बस म्हणून सतत पालकांनाच त्यांच्या मागे लागावे लागते अशीच परिस्थितीत असते. अभ्यासाला बसायचं म्हटल्यावर अनेक मूल उगाचच टंगळमंगळ करतात नाहीतर काही ना काही बहाणे देतात. अनेकदा पालक मुलांनी स्वतःहून अभ्यास करावा (tips to build self study habits in children) अशी अपेक्षा करतात, पण मुलांना अभ्यासाला बसवण्यासाठी त्यांना सतत सांगावे लागते किंवा त्यांच्या मागे लागावे लागते. यावरून अनेक घरात वाद होतात. मुलं स्वतःहून अभ्यासाला (parenting tips to improve child study habits) बसतच नाहीत, अशी अनेक पालकांची तक्रार असते. सतत ओरडणे, जबरदस्ती करणे किंवा समजावणे याचा फारसा फरक काही मुलांवर पडत नाही( 3 things parents should do for kids to self study).
मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये अभ्यासाची शिस्त निर्माण करण्यासाठी पालकांनी काही गोष्टी करणे खूप महत्त्वाचे असते. जर पालकांनी मुलांना योग्य सवयी लावल्या आणि थोडं स्मार्ट पद्धतीने मार्गदर्शन केलं तर मुलं फक्त स्वतःहूनच अभ्यासाला बसणार नाहीत तर तो आनंदाने करतील. आपण अशा तीन महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करू शकता आणि त्यांना अभ्यासाची आवड निर्माण करायला मदत करू शकता. काही खास गोष्टी जर पालकांनी केल्या तर मुले स्वतःहून अभ्यासाला बसतील.
मुलं स्वतःहून अभ्यासाला बसावीत म्हणून खास ३ टिप्स...
१. अभ्यासाची वेळ आणि जागा निश्चित करा :- मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी सर्वातआधी त्यांच्या अभ्यासाची निश्चित वेळ आणि जागा ठरवून देणे अतिशय आवश्यक असते. जेव्हा मुले दररोज एकाच वेळी आणि एकाच जागी अभ्यासाला बसतात, तेव्हा ही सवय त्यांच्या डेली रुटीनचा एक अविभाज्य भाग बनते. या नियमितपणामुळे त्यांच्या मेंदूलाही ठरलेल्या वेळी अभ्यासासाठी तयार होण्याची सवय लागते. यासाठी, अभ्यासाची जागा शांत, स्वच्छ आणि हवेशीर असावी. तिथे मुलांचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी, जसे की मोबाईल, टिव्ही किंवा खेळणी नसावीत. एक शांत कोपरा, जिथे फक्त अभ्यासाचे साहित्य असेल ज्यामुळे मुलांना अधिक एकाग्रतेने अभ्यास करायला मदत होईल. यामुळे त्यांना ‘आता अभ्यासाची वेळ झाली आहे’ हे आपोआप समजेल आणि त्यांना अभ्यासाला बसण्यासाठी सांगावे लागणार नाही. ही सवय एकदा लागली की मुले न सांगताच स्वतःहून अभ्यासाला बसू लागतील.
२. अभ्यास करताना ५ मिनिटांचा ब्रेक द्या :- मुलांना एकाच जागी जास्त वेळ बसून राहणे कंटाळवाणे वाटू शकते. त्यामुळे त्यांचा अभ्यासातील रस कमी होतो. यासाठीच, मुलांना सलग काही तास अभ्यासाला बसवण्याऐवजी, तुम्ही त्यांना दर २० मिनिटांनी ५ मिनिटांचा छोटा ब्रेक देऊ शकता. हा ब्रेक मुलांसाठी खूप फायदेशीर ठरतो. यामुळे त्यांना अभ्यासातून थोडा आराम मिळतो आणि ते कंटाळत नाहीत. या छोट्या ब्रेकमुळे त्यांना फ्रेश वाटते आणि ते पुन्हा नव्या उत्साहाने अभ्यास करण्यासाठी तयार होतात. अशाप्रकारे, छोटे-छोटे ब्रेक दिल्यास मुले जास्त वेळ एकाग्रतेने अभ्यास करू शकतात आणि त्यांना अभ्यासाचा कंटाळा येत नाही.
मुलांना ‘किती’ पॉकेटमनी द्यावा? लक्षात ठेवा ५ टिप्स- मुलांनाही समजेल पैशाचं महत्त्व नीट...
३. मुलांना समजत नसेल, तर अशा प्रकारे समजवा :- जर तुमच्या मुलाला अभ्यासातील एखादी गोष्ट समजत नसेल, तर त्यावर रागावणे किंवा ओरडण्याऐवजी ती त्याला सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने समजावून सांगा. यासाठी उदाहरणे देणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. जेव्हा मुलांना एखादी गोष्ट मजेशीर पद्धतीने समजावली जाते, तेव्हा त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होते. त्यामुळे पालकांनी अभ्यास मुलांसाठी सोपा आणि मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे त्यांना नवीन गोष्टी शिकण्यात आनंद वाटेल आणि ते स्वतःहून अभ्यासाकडे आकर्षित होतील आणि स्वतःच अभ्यासाला बसतील.