Lokmat Sakhi >Parenting > प्रत्येक गोष्टीत मुलं आळस करतात ? ५ सवयी - मुलं होतील चपळ- कामं करतील स्वत:हून...

प्रत्येक गोष्टीत मुलं आळस करतात ? ५ सवयी - मुलं होतील चपळ- कामं करतील स्वत:हून...

How To Make Kids Active Try These 5 Simple & Effective Tips For Lazy Kids : how to make kids active : tips for lazy kids to be active : simple ways to make children energetic : how to stop laziness in kids : parenting tips to make kids active : मुलं प्रत्येक कामात अ‍ॅक्टिव्ह आणि चपळ कशी होतील आणि त्यासाठी नेमके काय करावे लागेल यासाठी ५ टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2025 14:47 IST2025-09-22T14:28:08+5:302025-09-22T14:47:24+5:30

How To Make Kids Active Try These 5 Simple & Effective Tips For Lazy Kids : how to make kids active : tips for lazy kids to be active : simple ways to make children energetic : how to stop laziness in kids : parenting tips to make kids active : मुलं प्रत्येक कामात अ‍ॅक्टिव्ह आणि चपळ कशी होतील आणि त्यासाठी नेमके काय करावे लागेल यासाठी ५ टिप्स...

How To Make Kids Active Try These 5 Simple & Effective Tips For Lazy Kids parenting tips to make kids active tips for lazy kids to be active | प्रत्येक गोष्टीत मुलं आळस करतात ? ५ सवयी - मुलं होतील चपळ- कामं करतील स्वत:हून...

प्रत्येक गोष्टीत मुलं आळस करतात ? ५ सवयी - मुलं होतील चपळ- कामं करतील स्वत:हून...

प्रत्येक पालकांना वाटते की, आपल्या मुलाने प्रत्येक कामात हुशार आणि तितकेच अ‍ॅक्टिव्ह असावे. परंतु मुले अनेकदा बऱ्याच गोष्टींमध्ये आळसपणा करतात. मुले आळशीपणामुळे महत्त्वाची कामे करायला उशीर करतात किंवा त्यांचे लक्ष लवकर विचलित होते. अनेकदा मुलं अभ्यास, खेळ किंवा डेली रुटीनमध्ये फारच (How To Make Kids Active Try These 5 Simple & Effective Tips For Lazy Kids) आळसपणा करतात आणि याचा (how to make kids active) त्यांच्या एकूणच (how to stop laziness in kids) प्रगतीवर परिणाम होतो. यामुळे पालक अनेकदा चिंतेत असतात आणि विचार करतात की, आपल्या मुलामध्ये बदल कसा घडवावा.

आपल्यापैकी बऱ्याच पालकांचे, मुलांच्या आळशीपणामुळे टेंन्शन वाढते. मुलं प्रत्येक कामात अ‍ॅक्टिव्ह आणि चपळ कशी होतील आणि त्यासाठी नेमके काय करावे लागेल असा विचार अनेक पालक करतात. परंतु, योग्य सवयी आणि छोटे-छोटे बदल करून मुलांचा आळस हळूहळू कमी करता येतो आणि त्यांना अधिक अ‍ॅक्टिव्ह व चपळ करता येते. योग्य मार्गदर्शन आणि काही सोप्या सवयी वेळीच मुलांना लावून, आळसपणा कमी करता येऊ शकतो सोबतच त्यांना प्रत्येक कामात (parenting tips to make kids active) उत्साही करता येतं. आपण काही अशा टिप्स पाहूयात, ज्यांच्या मदतीने आपण मुलांना प्रत्येक कामासाठी अ‍ॅक्टिव्ह आणि उत्साही करु शकता. 

लहान मुलांमधील आळसपणा कमी करण्यासाठी खास टिप्स... 

१. मुलांच्या आळशीपणाचे कारण समजून घ्या :- सर्वातआधी, मुलं आळसपणा का करत आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा मुले थकवा, जास्त स्क्रीन टाइम किंवा एखाद्या कामात रस नसल्यामुळे आळसपणा दाखवतात. तुम्ही मुलांसोबत बसून बोला आणि त्यांना विचारा की, कोणते काम त्याला जड वाटते किंवा कशामुळे तो लक्ष देऊ शकत नाही. योग्य कारण समजल्यानंतर तुम्ही त्यावर उपाय शोधू शकता आणि हळूहळू त्याच्या सवयींमध्ये बदल घडवून आणू शकता. 

डॉक्टर सांगतात, 'ही' ३ फळं म्हणजे मुलांसाठी सुपरफूड! बुद्धी, ताकद आणि एनर्जी वाढेल वेगाने...

२. ॲक्टिव्हिटीज करायला द्या :- मुलांना ॲक्टिव्ह करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांत सहभागी करून घेणे. धावणे, पळणे, सायकल चालवणे किंवा घरात साधेसोपे व मेंदूला चालना देणारे खेळ खेळणे यामुळे मुलांची ऊर्जा वाढते. तुम्ही मुलासाठी छोटे-छोटे टार्गेट सेट करुन देऊ शकता. जेव्हा मुलं ते टार्गेट  पूर्ण करेल, तेव्हा त्याला बक्षीस द्या, कौतुक करा. यामुळे मूल केवळ काम लवकर करणार नाही, तर त्याचा आत्मविश्वासही वाढेल.

३. अभ्यासादरम्यान छोटे ब्रेक द्या :- जर मुलाला अभ्यास करताना आळस येत असेल किंवा तो लवकर थकत असेल, तर त्याला मध्ये ब्रेक द्या. या छोट्या ब्रेकमध्ये तो पाणी पिऊ शकतो, हलका स्नॅक खाऊ शकतो किंवा थोडा वेळ बाहेर फिरून येऊ शकतो. यामुळे त्याचे मन आणि शरीर दोन्ही फ्रेश राहील आणि तो पुन्हा अभ्यासात चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो. तसेच, हेल्दी पदार्थ खाऊ घातल्यानेही मुलांमध्ये ऊर्जा टिकून राहते.

मुलं स्वतःहून बसतील अभ्यासाला! आईबाबांनी करायला हव्या ३ सोप्या गोष्टी-लागेल अभ्यासाची गोडी...

५ वर्षांपासून लहान मुलांची स्मरणशक्ती व बुद्धी होईल तल्लख! पालकांनी कराव्यात ३ गोष्टी - साध्या आणि सोप्या..

४. डेली रुटीन सेट करा :- मुलांच्या डेली रुटीनकडे पालकांनी वेळीच लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. मुलांच्या झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवा, जेणेकरून मुलांचे एक डेली रुटीन सेट होईल यासोबतच, त्याचा आहार संतुलित आणि पौष्टिक असावा. डेली रुटीन आणि योग्य पोषणामुळे मुलांना थकवा जाणवत नाही आणि त्याचा आळस हळूहळू कमी होतो.

५. रोज लहान सवयी लावा :- तुम्ही मुलांना दररोज लहान-सहान कामे करण्याची सवय लावूनही त्याला सगळ्या कामात अ‍ॅक्टिव्ह करु शकता. जसे की, दररोज थोडा वेळ घरातील कामांमध्ये मदत करणे, स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळणे आणि वेळेवर कामे पूर्ण करणे. या लहान सवयी मुलांमध्ये जबाबदारीची भावना आणि अ‍ॅक्टिव्हपणा वाढवतात. हळूहळू या सवयी त्याच्या आयुष्याचा भाग बनतील आणि तो प्रत्येक काम लवकर आणि चपळाईने करेल.

Web Title: How To Make Kids Active Try These 5 Simple & Effective Tips For Lazy Kids parenting tips to make kids active tips for lazy kids to be active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.