Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात सर्दीखोकल्याने मुलांचं नाक चोंदलं-ढास लागते? तूप-ओवा-कापराचा ‘हा’ उपाय, विकतच्या इनहेलरपेक्षा भारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2025 18:25 IST

How To Make Baby Vicks At Home : homemade vicks for small children : मुलांचे चोंदलेले नाक, खोकला आणि छातीतील कफ कमी करण्यास घरगुती विक्स करण्याची सोपी पद्धत...

हिवाळा ऋतू अल्हाददायक आणि आरामदायक असल्याने, गुलाबी थंडी प्रत्येकालाच आवडते. हिवाळा ऋतू जरी सगळ्यांच्याच आवडता असला तरी या ऋतूंसोबतच येणारी आजारपणं किंवा आरोग्याच्या लहान - सहान तक्रारी नकोशा वाटतात. थंडीच्या दिवसांत हवामानातील बदलामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला आणि छातीत कफ होणे ही एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, आपण औषधोपचार म्हणून सुरुवातीला काही घरगुती उपाय करून पाहतो. घरगुती उपायांमध्ये आपण मुलांचे नाक, गळा आणि छातीला बाजारांत मिळणारे विक्स लावतो(homemade vicks for small children).

बाजारांत मिळणारे हे विक्स विकत आणण्यापेक्षा आपण घरच्याघरीच देखील नैसर्गिक आणि घरातील उपलब्ध पदार्थांपासून विक्स तयार करु शकतो. मुलांसाठी घरच्याघरीच नैसर्गिक, सुरक्षित आणि मुलांच्या नाजूक त्वचेसाठी योग्य असे होममेड बेबी विक्स तयार करणे हा उत्तम पर्याय ठरतो. फक्त काही सोपे घरगुती घटक वापरून असे विक्स तयार करु शकता जे मुलांचे  चोंदलेले नाक, खोकला आणि छातीतील कफ कमी करण्यास मदत करते आणि झोपही छान लागते. हे घरगुती विक्स केवळ मुलांच्या सर्दी-कफवर त्वरित आराम देणार नाही, तर कोणत्याही दुष्परिणामांशिवाय त्यांच्या (How To Make Baby Vicks At Home) नाजूक आरोग्याची काळजी घेईल. १००% नैसर्गिक बेबी विक्स कसे तयार करायची याची सोपी पद्धत पाहूयात... 

लहान मुलांसाठी घरगुती विक्स कसे तयार करायचे ? 

लहान मुलांसाठी घरगुती विक्स कसे तयार करायचे याची सोपी पद्धत priyas_home_recipes या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. घरगुती विक्स तयार करण्यासाठी आपल्याला साजूक तूप ३ ते ४ टेबलस्पून, २ टेबलस्पून कापूर वड्या आणि १ टेबलस्पून ओवा इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात, नकोच म्हणतात? पॅरेंटिंग कोच सांगतात ७ ट्रिक्स - मुलांचे अभ्यासात मन रमेलच.... 

मुलांशी कनेक्ट होण्यासाठी काढा फक्त दिवसभरातील ९ मिनिटं ! पालकांनी ३ गोष्टी केल्यास नातं होईल आधीपेक्षा घट्ट... 

घरगुती विक्स तयार करण्यासाठी सर्वातआधी एका भांडयात थोडे साजूक तूप घेऊन ते व्यवस्थित मंद आचेवर गरम करून वितळवून घ्यावे. तूप संपूर्णपणे वितळल्यावर त्यात कापूरच्या वड्या आणि ओवा घालावा. हे मिश्रण चमच्याने कालवून थोडा वेळ हलवून घ्यावे. मग मंद आचेवर हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. थंड झालेल मिश्रण गाळणीच्या मदतीने गाळून एका काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवू शकता. ही काचेची बरणी आपण फ्रिजरमध्ये २ ते ३ तास ठेवून द्यावे, त्यामुळे ते अधिक घट्ट होईल. आपले घरगुती विक्स वापरण्यासाठी तयार आहे. 

घरगुती विक्स वापरण्याचे फायदे... 

१. साजूक तूप :- छाती, घशावर किंवा पायांच्या तळव्यांवर तूपयुक्त विक्स लावल्यास उष्णता निर्माण होते ज्यामुळे कफ सैल होतो. त्यातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स मुलांच्या घशातील खवखव आणि बंद नाक शांत करण्यास मदत करतात.शरीराला सौम्य ऊब देऊन झोपही छान लागते.

२. कापूर वड्या :- कापूरमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात त्यामुळे बंद नाक मोकळं होण्यास मदत होते. कापूराची वाफ मुलांच्या श्वसनमार्गातील जंतू कमी करण्यात उपयुक्त ठरते. खोकल्याचा त्रास कमी होऊन श्वास घेणे सोपे होते.

३. ओवा :- ओव्यातील थायमॉल कंपाउंडमुळे कफ पातळ होऊन सहज बाहेर पडतो. ओवा उष्ण असल्याने छातीवर लावल्यास थंडीमुळे होणारी खवखव, श्वासातील घरघर कमी होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade Vicks for Kids: Relief from Cold, Cough, and Congestion

Web Summary : During winter, children commonly suffer from coughs and colds. Instead of store-bought Vicks, a homemade version using ghee, camphor, and carom seeds can provide quick relief. This natural remedy helps clear congestion and ease breathing, offering a safe alternative for delicate health.
टॅग्स :पालकत्वलहान मुलंहोम रेमेडीघरगुती उपाय