Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात, नकोच म्हणतात? पॅरेंटिंग कोच सांगतात ७ ट्रिक्स - मुलांचे अभ्यासात मन रमेलच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2025 19:38 IST

How to make a child study well : How to stop child from making excuses to study : How to guide children to study without stress : मुलांची अभ्यास करण्याची आवड वाढवण्यासाठी किंवा त्याच्या मनात अभ्यासाबद्दल रुची तयार करण्यासाठी नेमकं काय करावं...

मुलांचे अभ्यासात मन लागत नाही, अभ्यास करायचा कंटाळा येतो किंवा अभ्यास टाळण्यासाठी मुलं वरचेवर काही ना काही बहाणे सांगतात, अशा अनेक तक्रारी जवळपास प्रत्येक घरांतील पालकांच्या असतात. आजच्या डिजिटल युगात आणि वाढत्या स्पर्धात्मक वातावरणात, मुलांचे लक्ष अभ्यासांतून विचलित होऊ न देणे  आणि एकाग्रता टिकवून ठेवणे हे थोडे अवघडच काम आहे. मुलं अभ्यास करत नाही म्हणून पालकांनी मुलांवर ओरडणे किंवा जबरदस्ती करणे हा कधीच उपाय नसतो; उलट त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलून, समजावून सांगून किंवा अभ्यास करण्याचे वातावरण तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असते(How to stop child from making excuses to study).

थोडेसे स्मार्ट प्लॅनिंग, योग्य सवयी आणि पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे मुलांचे मन अभ्यासाकडे नैसर्गिकपणे वळवता येते. प्रसिद्ध पेरेंटिंग कोच रिद्धी देवरहा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, तज्ज्ञांनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. रिद्धी देवरहा म्हणतात की, या टिप्सचे पालन केल्यास तुम्ही तुमच्या मुलाची अभ्यासातील(How to make a child study well) आवड वाढवू शकता. मुलांची अभ्यास करण्याची आवड वाढवण्यासाठी किंवा त्याच्या मनात अभ्यासाबद्दल रुची तयार करण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहूयात. 

मुलांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून नेमकं काय करावं ? 

१. कारण समजून घ्या :- पॅरेंटिंग कोच सांगतात की, रागावून, चिडून किंवा मुलांवर ओरडून बोलल्याने मूल आणखी चिडचिडे होऊ शकते. त्यामुळे, सर्वात आधी शांत रहा आणि मुलाशी बोलून त्याचे अभ्यास का करत नाही याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बहुतेकवेळा मूल स्ट्रेस, दबाव, भीती किंवा मग कंटाळा यांमुळे व्यवस्थित अभ्यास करू शकत नाही. अशावेळी मुलांना जवळ घेऊन शांतपणे प्रश्न विचारा. तुम्ही असे विचारू शकता की, "मी पाहिले की तू हल्ली कमी अभ्यास करत आहेस. मला राग आलेला नाही, पण काळजी वाटतेय. आपण याबद्दल थोडं बोलू शकतो का?" अशा प्रकारचे संभाषण मुलांना  सुरक्षित आणि समजून घेतल्याचा अनुभव देते. त्याचबरोबर तुम्हालाही मूल अभ्यास का करत नाही, याचे खरे कारण कळते.

२. मुलांना काही प्रश्न विचारा :- मुलांना असे प्रश्न विचारा, ज्यामुळे त्यांच्या मनातील गोष्टी बाहेर येतील. जसे की, आत्ता तुला सर्वात कठीण काय वाटत आहे?कोणत्या वेळेस तुझे अभ्यासात सर्वात जास्त मन लागते? शाळा तुला आवडते की फक्त एक ओझं वाटते? या प्रश्नांमुळे बऱ्याचदा समस्या नेमकी काय आहे, हे कळते. मूल कंटाळ्यामुळे अभ्यास करत नाहीये, त्याला कशाची भीती आहे, मित्रांचा ताण आहे, झोपेची कमतरता आहे की, मुलाचे लक्ष लागत नाहीये, हे समजून येण्यास मदत होईल. 

मॉडर्न पॅरेंटिंगचा नवा दावा, म्हणे डायपर बदलण्यापूर्वी बाळाची परवानगी घ्या, कन्सेंटचा करा विचार कारण...

३. मुलांसाठी छोटे - छोटे गोल्स तयार करा :- मुलासाठी एक वेळापत्रक तयार करा. उदाहरणार्थ, पहिल्या दिवशी तुम्ही मुलाला फक्त २० मिनिटे एक विषय शिकवू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडा अधिक जास्त वेळ मुलाला शिकवा आणि अभ्यासाशी संबंधित प्रश्न विचारा. याप्रमाणे छोटी-छोटी पाऊले मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात आणि यामुळेच हळूहळू मुलांच्या अभ्यासात आवड तयार होते. 

४. शॉर्ट स्टडी सेशन पद्धत वापरा :- शॉर्ट स्टडी सेशन पद्धतीमध्ये, सलग दोन ते तीन तास अभ्यास न घेता मध्ये - मध्ये छोटे ब्रेक द्या. २५ मिनिटे अभ्यास करा आणि नंतर ५ मिनिटांचा ब्रेक द्या किंवा ४५ मिनिटे अभ्यास करा आणि मग १५ मिनिटांचा ब्रेक द्या. यामुळे मुलांना अभ्यास कंटाळवाणा वाटणार नाही तसेच सलग तासंतास अभ्यास करण्यापेक्षा मध्ये - मध्ये ब्रेक घेऊन अभ्यास केल्यास मुलांना अभ्यासाचा कंटाळा देखील येणार नाही. 

५. सोप्या स्टडी स्किल्स शिकवा :- मुलांना अ‍ॅक्टिव्ह रिकॉल करायला लावा, जसे की पुस्तक बंद करून स्वतःला ३ प्रश्न विचारा. मुलाला २ मिनिटांत कोणताही विषय समजावून सांगायला लावा. त्यानंतर त्यांची पुन्हा उजळणी करून घ्या. वारंवार उजळणी केल्यास मुलांना विषय अधिक नीट समजून अभ्यासाची आवड निर्माण होईल. यासोबतच, मुलांना अभ्यास सोपा वाटावा यासाठी काही सोप्या स्टडी स्किल्स शिकवा. 

मुलांशी कनेक्ट होण्यासाठी काढा फक्त दिवसभरातील ९ मिनिटं ! पालकांनी ३ गोष्टी केल्यास नातं होईल आधीपेक्षा घट्ट... 

६. शाब्बासकी आणि कौतुक करा :- जर मुलाने फक्त २५ मिनिटे जरी अभ्यास केला, तरी त्याचे कौतुक करा. तुम्ही मुलाला शाब्बासकी देऊन कौतुक करु शकता. जसे की, मुलाला एखादा आवडीचा पदार्थ किंवा वस्तू देणे किंवा ब्रेकमध्ये थोडं चालण्यासाठी बाहेर घेऊन जाणे.

७. चुकूनही या गोष्टी करु नका...

१. मुलांची कधीही दुसऱ्या मुलांशी तुलना करू नका.

२. मुलांवर ओरडू नका, अभ्यास न केल्याबद्दल घाबरवू नका किंवा मारु नका.

३. मुलावर फक्त इतके मार्क मिळालेच पाहिजे असा दबाव टाकू नका.

४. याशिवाय, प्रत्येक मिनिटाला मुलांना स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू नका. 

पॅरेंटिंग कोच म्हणतात की, जेव्हा मुलांना सुरक्षित आणि सपोर्टिव्ह असल्याचा अनुभव येतो, तेव्हा त्याचे अभ्यासात मन आपोआप लागू लागते. पालकांचे शांत आणि समजूतदार वर्तन हेच मुलाच्या वागणुकीत सर्वात मोठा बदल घडवून आणते.

English
हिंदी सारांश
Web Title : Parenting coach's 7 tricks to make children love studying.

Web Summary : Struggling to get your child to study? Parenting coach Riddhi Deverha shares seven tricks, including understanding the root cause of avoidance, setting small goals, using short study sessions, and offering praise to foster a love for learning.
टॅग्स :पालकत्वलहान मुलं