उन्हाळ्याची भली मोठी सुटी हा लहान मुलांसाठी प्रचंड मोठा आनंद असतो. मुलं कितीतरी दिवस आधीपासूनच सुटीची वाट पाहात असतात. सुटीत काय करायचं, कुठे जायचं याचं सगळं प्लानिंग चाललेलं असतं. सुरुवातीला सुटीचा उत्साह, आनंद असतो. पण काही दिवसांतच मुलं कंटाळवाणी होऊन जातात. भला मोठा रिकामा दिवस खायला उठतो आणि मग सदा सर्वकाळ त्यांच्या हातात मोबाईल दिसायला लागतो. येता जाता पालकांच्या मागे करमत नाही म्हणून भुंगा सुरू असतो.. त्यांचंही साहजिक आहे. जर खेळायला किंवा करमणुकीसाठी दुसरं काही नसेल तर ते तरी काय करणार.. पण पालक मात्र यामुळे पार वैतागून जातात आणि मुलांची सुट्टी त्यांनाच नकोशी वाटू लागते. म्हणूनच या काही टिप्स लक्षात ठेवा. मुलं सुटी छान एन्जॉय करतील...(how to keep your kids away from tv and mobile during summer vacations?)
सुटीत मुलांचं टीव्ही, मोबाईल पाहाणं कमी व्हावं म्हणून उपाय
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांची सुटी सुरू झाली की पालकांनी त्यांच्यासाठी थोडा अधिक वेळ काढणं खूप गरजेचं आहे. कारण हे दिवस मुलांच्या अधिक जवळ जाण्यासाठी, त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जास्त कनेक्ट होण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे तुम्हीही थोडं प्लानिंग करा आणि मुलांना वेळ द्या.
रोज घरचंच जेवण - जंक खात नाही तरीही शुगर आणि वजन वाढतं? डॉक्टर सांगतात, रोज एवढंच चुकतं..
२. मुलांची सकाळी उठण्याची वेळ फिक्स ठेवा. उठल्यानंतर त्यांना चक्कर मारायला घराबाहेर घेऊन जा. जवळ गार्डन असेल तर तिथे न्या. थोडावेळ त्यांना तिथे मनसोक्त खेळू द्या. यातून मुलं पळतील, खेळतील, त्यांचा व्यायाम होईल. तसेच कोवळ्या सुर्यप्रकाशात गेल्याने व्हिटॅमिन डी मिळेल. पण याला व्यायामाचं स्वरुप देऊ नका. नाहीतर हे मुलांसाठी लगेच कंटाळवाणं होऊन जातं.
३. घरातली छोटी छोटी कामं मुलांना सांगा. कपड्यांच्या घड्या घालणं, वस्तू जागच्या जागी ठेवणं, स्वत:चं कपाट आवरणं, झाडांना पाणी घालणं, भाजी निवडणं यातून मुलं कित्येक कामं शिकतील. त्यांचा वेळ जाईल. पण रागावून त्या कामांची सक्ती करू नका. किंवा अमूक वेळेतच हे काम झालंच पाहिजे अशी खूप शिस्तही नको. कारण मग मुलं ही गोष्ट नकारात्मकतेने घेतात आणि कामं ऐकत नाहीत.
मलायका अरोरा सांगते 'या' पद्धतीने खा कोरफडीचा ताजा गर, चेहऱ्यावरचं तेज कमी होणारच नाही
४. काही मुलांना स्वयंपाक घरात लुडबूड करायला आवडतं. त्यांना जमेल तशी स्वयंपाक घरातली कामं सांगा. तुम्ही त्यांच्यासेाबत करा. त्यांना मजा येईल.
५. गोष्टी वाचून दाखवा. वर्तमानपत्र वाचायची सवय लावा.
६. एखाद्या छंद वर्गाला किंवा खेळाच्या क्लासला घाला. तिथे चांगली करमणूक होईल तसेच नवनव्या गोष्टीही शिकायला मिळतील.
